Category: कोरोना

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत जीम व व्यायामशाळेस परवानगी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जीम व व्यायामशाळा सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे. जीम व व्यायामशाळेच्या ठिकाणी कोविड-19 संदर्भात प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. जीम व व्यायामशाळेत कमीत कमी 6 फूट अंतर राखणे पाहिजे. जीम, व्यायामशाळा व परिसरामध्ये मास्क व सॅनिटायझर वापर करणे आवश्यक राहील. खोकतांना किंवा शिंकताना नाक पूर्ण झाकले जाईल यांची खबरदारी घेणे बंधनकारक राहील. व्यायाम परिसरामध्ये थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. सर्वांना आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे बंधनकारक असेल. येथे येणाऱ्यांनी स्वत:ची आरोग्य निरीक्षणे करणे व आजारी असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनास कळविणे बंधनकारक असेल. जीम व व्यायामशाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीस 4 चौ.मीटरवर आधारीत मजला क्षेत्राचे नियोजन करावे. सामाजिक अंतर राखण्याच्यादृष्टीने उपकरणे किमान 6 फूट अंतरावर ठेवावीत. श्वासाची गती वाढविणाऱ्या व्यायामासाठी असलेल्या उपकरणादरम्यान 12 फूट अंतर राखले जावे. संपर्क न येणाऱ्या ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छ हवा आत येण्यास जागा असावी व वातानुकूलन उपकरणांचे तापमान 24 ते 30 डिग्री सेल्सिअस असावे. कचराकुंडी नेहमी झाकलेली असावी. लागू असेल तिथे स्पा, सौना, स्टीम बाध व जलतरण तलाव बंद राहतील. 65 वर्षांवरील नागरिक, व्याधीग्रस्त नागरिक, गर्भवती महिला आणि 10 वर्षांखालील मुलांना जीम , व्यायामशाळेच्या परिसरात व्यायाम करता येणार नाही. जीम, व्यायामशाळा सुरु करणेपूर्वी योग्य प्लेसमेंट किंवा उपकरण तसेच व्यायामशाळा  आणि परिसर निर्जतुकीकरणे करणे बंधनकारक राहील. सदस्य आणि कर्मचारी यांना व्यायामाचे उपकरण, व्यायामापूर्वी आणि नंतर निर्जतुकीकरण करणे बंधनकारक असेल. जीम व व्यायामशाळेत...

Read More

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम दुसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणात 33 कोरोनाबाधित आढळले

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात आजाराची लक्षणे आढळलेल्या  259 व्यक्तिंची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 33 कोरोना बाधित आढळले आहेत.  या टप्प्यातील सर्वेक्षणात जे कुटुंब बाहेरगावी गेले होते त्यांचीदेखील आरोग्य तपासणी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील  सर्वेक्षण केलेल्या नागरिकांपैकी 6913 व्यक्तींना रक्तदाब, 105  कर्करोग, 4972 मधुमेह,  इतर आजार 989 आणि 218 व्यक्तींना खोकला असल्याचे आढळून आले. 212 व्यक्तींना ताप, 12 घसादुखी तर 2 व्यक्तींमध्ये एसपीओ-2 चे प्रमाण 95 पेक्षा कमी आढळले. यापैकी 355 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आणि यापैकी 73 टक्के व्यक्तिंची स्वॅब चाचणी करण्यात आली. सर्वेक्षणात आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील 3 लाख 66 हजार  721 घरांना भेटी दिल्या. एकूण  18 लाख 72 हजार 775 लोकसंख्येपैकी 16 लाख 95 हजार 625 नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. यात अक्कलकुवा 2 लाख 47 हजार 183, धडगाव 2 लाख 30 हजार 709, नंदुरबार 3 लाख 48 हजार 169, नवापूर  2 लाख 84 हजार 243, शहादा 4 लाख 9 हजार 855 आणि तळोदा तालुक्यातील 1 लाख 75 हजार 466 नागरिकांचा समावेश...

Read More

मास्कच्या किंमत निश्चितीचा शासन निर्णय जाहीर

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून  योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर करून मास्कचे दर निश्चित केले आहेत. आता एन 95 मास्क  19 ते 49 रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क 3 ते 4 रुपयांना मिळणार आहे. विविध दर्जाच्या मास्कची विहित केलेली अधिकतम विक्री मुल्य मर्यादा ही साथरोग कायदा अंमलात असेपर्यंत लागू राहणार आहे. ही अधिकतम विक्री मुल्य मर्यादा राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेते यांना लागू राहील. राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेते यांनी मास्कचा दर्जा व त्याची निर्धारित कमाल विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील. एनआयओएसएच सर्टीफाईड एन-95 व्हीशेप मास्क 19 रुपये, एन-95 थ्रीडी मास्क 25 रुपये, एन-95 व्ही विदाऊट वॉल्व्ह 28 रुपये, मॅग्नम एन-95 एमएच कप मास्क 49 रुपये, व्हीनस सीएन एन-95 प्लस कप शेप मास्क विदाऊट वॉल्व्ह 29 रुपये, व्हीनस-713 डब्ल्यु-एन95-6 डब्ल्युई कप स्टाईल विदाऊट वॉल्व्ह 37 रुपये, व्हीनस-723 डब्ल्यु-एन95-6 आरई कप स्टाईल विदाऊट वॉल्व्ह 29 रुपये, एफएफपी 2 मास्क आयएसआय सर्टीफाईड 12 रुपये, 2 प्लाय सर्जिकल विथ  लूप 3 रुपये, 3 प्लाय सर्जिकल विथ मेल्ट ब्लोन 4 रुपये, डॉक्टर्स कीट 5 एन-95 मास्क 3 प्लाय मेल्ट ब्लोन मास्क 127 रुपये अशा किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. सॅनिटायझर व मास्कचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने उत्पादकाची किंमत,  त्यावरील किंमत तसेच प्रत्येकी विक्रेता व वितरकाचा नफा गृहीत धरून दर्जानुसार मास्कचे अधिकतम...

Read More

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत आठवडे बाजार व वाचनालयास परवानगी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासकीय आणि खाजगी वाचनालये, स्थांनिक आठवडे बाजार आणि जनावराचे बाजार सुरु करण्यास परवानगी देण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी निर्देश दिले आहेत. या सर्व ठिकाणी कोविड-19 संदर्भात प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. यापूर्वी मार्केट व दुकानांना सायंकाळी 7 पर्यंत परवानगी देण्यात आली होती. आता सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहतील. औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास अनुमती राहील. सर्व दुकाने व आस्थापनांनी मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन आदी बंधने पाळणे आवश्यक आहे. करमणुकीसाठी बागा,उद्याने आणि सार्वजनिक खुल्या ठिकाणी एकत्र येण्यास तसेच बिझनेस टू बिझनेस विषयक प्रदर्शनासदेखील परवानगी देण्यात आली आहे. सर्व शाळा, महाविद्यालये ,शैक्षणिक आणि कोचिंग संस्था बंद राहतील. ऑनलाईन, अंतराचे, दुरस्थ शिक्षणास परवानगी असेल. सर्व शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण तसेच दुरध्वनीद्वारे मार्गदर्शन आणि यासंबंधित सर्व कामकाज करण्यासाठी 50 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गास उपस्थित राहण्यास परवानगी राहील. राष्ट्रीय कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास अभियान किंवा भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांचेकडील नोंदणीकृत असलेले अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रे सुरू राहतील. राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था, भारतीय उद्योजक संस्था आणि त्यांच्या प्रशिक्षण प्रदात्यांनादेखील परवानगी असेल. त्यांनी आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय यांचेकडील निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. उच्च शिक्षण संस्थामध्ये दुरस्थ शिक्षण हे प्राधान्य प्राप्त अध्यापनाचे साधन म्हणून सुरू राहील, त्याचबरोबर उच्च शिक्षण संस्थामध्ये  संशोधन अभ्यासकासाठी (पीएचडी) विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील...

Read More

जिल्ह्यात 20 हजार नागरिकांची कोरोना चाचणी

नंदुरबार – जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधीक नागरिकांची स्वॅब चाचणी करण्यावर भर देण्यात येत असून आतापर्यत  20 हजार 104 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब सुरू झाल्यानंतर स्वॅब चाचणीचा वेग वाढविण्यात आला. नंदुरबार तालुक्यात 8869, शहादा 6359, तळोदा 1677, नवापूर,1620, अक्कलकुवा 853, धडगाव 130 आणि इतर जिल्ह्यातील 596 व्यक्तिंची चाचणी करण्यात आली आहे त्यापैकी 5534 व्यक्तिंचे अहवाल पॉझिटीव्ह आले  आहेत. 4900 कोरोनाबाधित उपचाराअंती बरे झाले आहेत तर 492 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना बाधित व्यक्ती असलेल्या भागात शिबिराच्या माध्यमातून स्वॅब चाचणी घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांचे समुपदेशनही करण्यात येत आहे. काही ठिकाणी गावातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन स्वॅब  चाचणीसाठी नागरिकांना प्रोत्साहीत केले. धडगाव येथे संसर्गाचे प्रमाण तर शहादा आणि नंदुरबार येथे जास्त आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गतदेखील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून आजाराची लक्षणे असलेल्या नागरिकांची स्वॅब चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत लक्षणे आढळलेल्या साधारण 800 व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात आली आहे. त्यातील पॉझिटीव्ह आढळलेल्या व्यक्तिंवर त्वरीत उपचारदेखील सुरू करण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी खाजगी रुग्णालयात आलेल्या तापांच्या रुग्णांचीदेखील तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. जास्त कोरोनाबाधित असलेल्या गावातील नागरिकांची स्वॅब चाचणी करण्याचे निर्देशदेखील त्यांनी दिले आहेत. कोरोना चाचणीसाठी 10 फिरत्या पथकांची सुविधादेखील करण्यात आली आहे. स्वॅब चाचणींची संख्या वाढल्याने संसर्ग वाढीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यादृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न...

Read More

कोरोना उपचारासाठी जिल्ह्याला 10 हाय फ्लो मशिन प्राप्त

 नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना उपचारात व्हेंटीलेटरला जोडण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाला एनएसई फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून 10 हाय फ्लो नेझल कॅन्युला मशिन (एचएफएनसी) प्राप्त झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची अधिक प्रमाणात आवश्यकता असते. अशावेळी व्हेंटीलेटर्सद्वारे मिळणारा ऑक्सिजनही कमी पडू शकतो. व्हेंटीलेटरला एचएफएनसी जोडल्याने ऑक्सिजनचा प्रवाह अधिक प्रमाणात होतो व रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन मिळाल्याने त्याचे प्राणदेखील वाचविता येतात. जिल्हा शासकीय रुग्णालीयात पीएम केअर फंडातून प्राप्त झालेल्या 48 व्हेंटीलेटर्ससाठी ही सुविधा होती. रुग्णालयातील इतर 10 व्हेंटीलेटर्ससाठी एनएसई फाऊंडेशनने एका संयंत्रासाठी 4 लाख 31 हजार याप्रमाणे 43 लाख रुपये किंमतीचे एचएफएनसी उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हा रुग्णालयात कोरोना आजारावर उपचार...

Read More

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम 734 व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने सुरू केलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम उपयुक्त ठरत असून त्याअंतर्गत 1100 व्यक्तींना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. यापैकी 734 व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्यातील 82 व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात  18 लाख 72 हजार लोकसंख्येपैकी 16 लाखाहून अधिक नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यात अक्कलकुवा 2 लाख 34 हजार, धडगाव 2 लाख 21 हजार, नंदुरबार 3 लाख 41 हजार, नवापूर  2 लाख 47 हजार, शहादा 3 लाख 85 हजार आणि तळोदा तालुक्यातील 1 लाख 70 हजार नागरिकांचा समावेश आहे. त्यासाठी 3 लाख 53 हजार घरांना आरोग्य पथकांनी भेटी दिल्या. जिल्ह्यातील दुर्गम भागातही  पथकांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली आणि कोरोनाबाबत दक्षतेच्या सूचना दिल्या. सर्वेक्षण केलेल्या नागरिकांपैकी 7689 व्यक्तींना रक्तदाब, 159 कर्करोग, 5585 मधुमेह,  इतर आजार 1231 आणि 296 व्यक्तींना खोकला असल्याचे आढळून आले. त्यांना कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. 274 व्यक्तींना ताप, 34 घसादुखी तर 72 व्यक्तींमध्ये एसपीओ-2 चे प्रमाण 95 पेक्षा कमी आढळले. या सर्वांपैकी 1100 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.  स्वॅब चाचणीसाठी मोबाईल पथकांचे सहकार्य घेण्यात आले. जिल्ह्याने ऑनलाईन नेांदणीतही चांगली कामगिरी केली असून 70 टक्के  नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. या कामगिरीच्या बाबतीत जिल्हा नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. आरोग्य पथकांनी अनेक अडचणीतून मार्ग काढत कोरोना प्रतिबंधासाठी घरोघरी जावून नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. वेळीच नागरिकांना संदर्भित केल्याने आणि त्यांची कोरोना चाचणी केल्याने संसर्ग बऱ्याच अंशी...

Read More

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत पाचव्या टप्प्याला सुरुवात

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत पाचव्या टप्प्यात काही शिथीलतेसह जिल्ह्यात 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी निर्गमित केले आहेत. नंदुरबार जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट बंद राहतील, तथापि ऑनलाईन शिक्षणास परवानगी राहील. चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्समधील ) सभागृह, असेंब्ली हॉल यासारख्या इतर सर्व जागा  बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या संख्येने लोक प्रमाणात घेण्यात येणारे मेळावे किंवा कार्यक्रम प्रतिबंधीत असतील. दुकाने व मार्केट रविवारीदेखील  सुरू मॉल आणि व्यावसायिक संकुल (मार्केट कॉम्प्लेक्स), दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये पुर्णवेळ सुरू राहतील. पाचपेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास किंवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करण्यात येतील. रविवारीदेखील दुकाने, मार्केट, आस्थापना निर्धारीत वेळेत सुरू राहतील.यापूर्वी परवानगी दिलेल्या बाबी पूर्ववत सुरू राहतील. 5 ऑक्टोबरपासून हॉटेल/रेस्टॉरंट्स  सुरू 5 ऑक्टोबर 2020 पासून हॉटेल्स, फूट कोर्ट्स, रेस्टॉरंट्स आणि बार 50 टक्के क्षमतेसह किंवा स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या  निकषाप्रमाणे सुरू राहतील. या आस्थापनांसाठी पर्यटन विभागाकडून स्वतंत्र आदर्श कार्यप्रणाली देण्यात येईल, तिचे पालन करणे बंधनकारक राहील. ऑक्सिजन उत्पादन व वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या हालचालीस जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे वेळेचे अथवा इतर बंधन असणार नाही. सार्वजनिक ठिकाणी दारु,पान,तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई असेल. मास्कचा वापर अनिवार्य कामाचे व इतर सर्व ठिकाणी आणि प्रवास करताना चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य आहे. सार्वजनिक ठिकापणी दोन...

Read More

तहसिलदार थोरात यांनी ग्रामस्थांशी साधला संवाद आरोग्य तपासणीस सहकार्य करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी नंदुरबार तालुक्यातील सुजालपूर, नाशिंदे, बोराळे, आणि कोरीट या गावांना भेट देवून माझे ‘कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेबाबत ग्रामस्थाचे समुपदेशन केले आणि त्यांना आरोग्य तपासणीस सहकार्य करण्याचे आवाहन केले.             जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ग्रामस्थांमध्ये मोहिमेबाबत गैरसमज असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार श्री.थोरात यांनी या गावातील सरपंच आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. आरोग्य तपासणीमुळे कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार लक्षात आल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतील. तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यास स्वॅब चाचणी होईल, अन्यथा केवळ माहिती घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थानीदेखील आरोग्य तपासणीत सहकार्य करण्याचे मान्य केले.             यावेळी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि गावातील प्रतिष्ठीत नागरीका  समवेत बैठक घेवून त्यांना मोहिमे विषयी माहिती देण्यात...

Read More

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम जिल्हाधिकाऱ्यांनी नवापूर येथे घेतला आढावा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा ) : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी नवापूर येथे भेट देऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा आढावा घेतला.               यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी महेश सुधळकर, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार सुनिता जऱ्हाड,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशीकांत वसावे, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत उपस्थित होते.               जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीची पाहिणी केली आणि सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी उपजिल्हा रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील सुविधांची माहिती घेतली. त्यांनी बेडकी पाडा येथे मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणाला भेट दिली व नागरिकांशी संवाद साधला.               डॉ.भारुड यांनी सर्वेक्षणाचे...

Read More

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेतंर्गत जिल्ह्यात 10 लाख 22 हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत सर्व सहा तालुक्यात आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत असून बुधवारी 1 लाख 6 हजार 259 नागरिकांची आरोग्य  तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 10 लाख 22 हजार 82 घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आरोग्य तपासणी आणि कोरोनाविषयक जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी कोरोना चाचणी शिबिराचे आयोजनदेखील करण्यात येत आहे. आरोग्य तपासणीत कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत स्वॅब तपासणी करून संबधित व्यक्तीस उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक माहितीदेखील देण्यात येत आहे. एकूण  482 पथकामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत असून बुधवारी 23 हजारापेक्षा अधिक घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. आतापर्यंत 2 लाख 28 हजार 385 घरांना भेटी देण्यात आल्या. नंदुरबार तालुक्यातील 2 लाख 2 हजार 61, अक्कलकुवा 1 लाख 35 हजार 6, धडगाव 1 लाख 62 हजार 260, नवापूर 1 लाख 75 हजार 490, शहादा 2 लाख 47 हजार 597 आणि तळोदा तालुक्यातील 99 हजार 668 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.  मोहिमेला गती देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी स्वत: सर्वेक्षणाच्या ठिकाणी भेट देत आहेत. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणीचे सूक्ष्म नियोजन केले असून सर्वेक्षणाची माहिती ऑनलाईन नोंदविण्यात येत आहे. सर्वेक्षणात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवकांचे सहकार्य घेण्यात येत...

Read More

कोळदा येथे स्वॅब तपासणी शिबीर संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :   ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत शहादा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लहान शहादा येथे कोरोना स्वॅब चाचणी शिबीराचे आयोजन करण्यात आले .             यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.आर.तडवी, सरपंच जिजाबाई पाडवी, ग्राम विस्तार अधिकारी संजय देवरे, डॉ.सुनिल वळवी, डॉ.किर्ती सुर्यवंशी, डॉ.अश्विनी देसले, डॉ.मनिष नार्दे उपस्थित होते. यावेळी डॉ.तडवी यांनी स्वॅब तपासणी शिबीरास भेट देऊन कामाची पाहणी केली. गावातील नागरिकांशी संवाद साधताना मास्कचा वापर, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ धुण्याबाबत आवाहन करण्यात आले. स्वॅब चाचणीबाबत नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी शिबिराला चांगला प्रतिसाद दिला. गावातील  70 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. गावात घरोघरी जाऊन नागरिकांच्या...

Read More
Loading

सुंदर विचार

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – ११६१ 〇 🎵
═══════ 🦋;🦋 ═══════

प्रत्येक चांगल्या विचाराची
पहील्यांंदा चेष्टाच होते,
मग त्याला विरोध होतो,
आणि
शेवटी त्याच विचारांचा
स्वीकार होतो !
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Every good thought
is mocked at first,
then it is opposed,
and in the end
the same thought
is accepted !

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
मास्कचा नियमित वापर करा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
७ ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय
त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना
जागरूकता दिन !
१८६६: मराठी काव्याचे प्रवर्तक
कृष्णाजी केशव दामले
तथा केशवसुत,
(मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५)
१९१४: गझल, ठुमरी गायिका
बेगम अख्तर,
(मृत्यू: ३० ऑक्टोबर १९७४)
१९१७: बालकुमार साहित्यिक
विनायक महादेव
तथा वि. म. कुलकर्णी,
(मृत्यू: १३ मे २०१०)
१९६०: शास्त्रीय गायिका
आश्विनी भिडे-देशपांडे,
१९७८: क्रिकेटपटू
जहीर खान
यांचा जन्मदिन !
१७०८: शिखांचे १० वे गुरू
गुरू गोबिंद सिंग,
(जन्म: २२ डिसेंबर १६६६)
१९७५: कवी, विचारवंत
देवनहळ्ळी गुंडप्पा
तथा डी. व्ही. जी.,
(जन्म: १८ जानेवारी १८८९)
१९९८: महसूलमंत्री, काँग्रेस नेते
पद्मश्री भाऊसाहेब वर्तक,
१९९९: बाल साहित्यिक
उमाकांत निमराज ठोमरे
(जन्म: १५ ऑगस्ट १९२९)
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0046287
Visit Today : 104
error: Content is protected !!