Category: कृषी

पावसाळ्यापूर्वीच आवश्यक धान्य व औषधांचा साठा करून ठेवावा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मोसमी पावसाच्या आगमनास आता महिनाभराचा कालावधी राहिला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागासह सर्वच ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, अन्नधान्य व औषधांचा आतापासूनच पुरेसा साठा करून ठेवावा. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करावा, 24 तास कार्यरत राहील असा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज दुपारी मान्सून पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीद खांदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. आपापल्या विभागावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. नैसर्गिक आपत्तीबाबत मागविलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी. गावनिहाय आराखडे तयार करावेत. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील रहिवाशांसाठी स्वस्त धान्य वेळेत उपलब्ध होईल यासाठी आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवण्याची दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंश प्रतिबंधक लशीसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची निगा राखावी. आपत्कालिन उपयोगासाठी पथके तयार ठेवावीत. वीज वितरण कंपनीने वीज वाहक तारांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्व नगरपालिकांनी पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिनचा किमान सहा महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध करुन ठेवावा. गावांमध्ये जलशुद्धीकरणासाठी...

Read More

जिल्ह्यातील सुरेश गावीत व पुंजू भोये यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील कृषी, फलोत्पादन आणि  संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन- उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने राज्यातील 198 शेतकऱ्यांना सन 2017,2018 व 2019 या तीन वर्षांचे विविध कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.             त्यात नंदुरबार जिल्ह्यातील सुरेश अर्जुन गावीत, रा.करंजी बु, ता.नवापूर व पुंजू चिंधा भोये, रा.अजेपूर ता.जि.नंदुरबार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2017 (आदिवासी गट ) जाहीर झाला असून त्यांना २ मे रोजी सकाळी 11 वाजता नाशिक येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम कृषी विभागाच्या यू ट्यूब चॅनलवर https://youtube/gPHbtqCsTbc वर प्रसारित होणार असल्याने जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमास सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी केले...

Read More

खरीप हंगामासाठी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते,कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषि निवष्ठा सनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी त्याबोलत होत्या. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी  एल.डी.भोये, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक बी.जी.कोटकर, मोहिम अधिकारी महेश विसपुते, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी, पंचायत समितीचे कृषि अधिकारी योगेश हिवराळे, एकनाथ कदम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, खरीप हंगाम 2022-2023 साठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन येणाऱ्या बियाणे चांगल्‍या दर्जाची असावेत. प्रत्येक विक्रेत्याने साठा तसेच...

Read More

वैरणीकरिता शेवगा लागवडीसाठी अनुदान उपलब्ध

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियांन (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी, पशुपालकांना वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यासाठी प्रती हेक्टरी 30 हजार प्रती लाभार्थी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यास 15 हेक्टर क्षेत्राकरिता 4 लाख 50 हजाराचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. वैरणीसाठी शेवगा लागवड योजनेअंतर्गत प्रती हेक्टरी 7.5 किलो शेवगा (पीकेएम-1) बियाण्याची किंमत 6 हजार 750 व उर्वरित 23 हजार 250 अनुदान लाभार्थ्यांनाहे दोन टप्प्यांमध्ये वितरीत करण्यात येईल. यात पशुपालकांना बियाण्याचा थेट पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्चासाठी देण्यात येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी  शेतकरी, पशुपालक यांनी संबंधित जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ,जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती आणि नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले...

Read More

रब्बी हंगामातील भरडधान्य खरेदीकरिता पोर्टलवर नोंदणी  करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  रब्बी  हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने मका,ज्वारी,बाजरी आदी भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांची NeML पोर्टलवर 13 एप्रिल ते 30 एप्रिल 2022  या कालावधीत नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी एम. एस. सोनवणे यांनी केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुढील ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करता येईल. शेतकरी सहकारी संघ लि.नंदुरबार.  नोंदणीचे  ठिकाण संघ कार्यालय, नंदुरबार (कृष्णा पाटील 97632 86860), शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.शहादा ‍जि.नंदुरबार नोंदणीचे  ठिकाण संघ कार्यालय, शहादा (सागर पटेल 7770074177 ) नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी  खरीप हंगाम 2021-2022 मधील ऑनलाईन पीकपेरा नमूद असलेला सातबारा उताऱ्यांची  मूळ प्रत, आधार कार्ड, बॅक खाते बुक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहितीची नोंदणी वरील ठिकाणी नोंदवावी. संयुक्त खात्यातील क्र.2 नंबर खातेदाराने नोंदणी करीता खातेचा तपशिल दिल्यास पीएफएमएस पोर्टलवरुन पेमेंट पडणार नाही यांची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. शासनाचे खरेदी आदेश मिळाल्यावर शेतकऱ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएसएसद्वारे शेतमाल घेवून येण्याचा दिनांक कळविण्यात येईल. प्रत्येक शेतकऱ्यांकडून फक्त त्यांच्या कुटूंबातीलच (आई, वडील, मुलगा,मुलगी, पत्नी,पती)  सातबारा उतारा ओळख पटविल्यानंतर स्विकारण्यात येईल. असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading

All

Latest

क्राईम

Latest

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 19 एप्रिल 2022 च्या रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले...

नंदूरबार जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी सहकार्याचे प्रशासनाचे आवाहन

नंदूरबार (जिमाका) – अक्षय तृतीयेच्या दिवशी भारतातील काही भागात मोठ्या प्रमाणावर विवाह आयोजित केले जातात. यावेळी बालविवाह सुद्धा होण्याची शक्यता असते. नंदूरबार जिल्ह्यातही यादिवशी बालविवाह होणार नाही, यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात लागू करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात बालविवाह होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पोलीस विभाग, बालकल्याण समिती, बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती, जिल्हा बाल संरक्षण समिती, चाईल्ड लाईन, ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक, पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका इत्यादी यंत्रणेची मदत घेण्यात येईल. बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 च्या कलम 9 नुसार प्रौढ पुरुषाने अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यास दोन वर्षे पर्यंत सक्षम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. कलम दहा नुसार बाल विवाह जुळवून आणणे किंवा जबरदस्तीने बालविवाह लावण्यास प्रवृत्त करणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. कलम 11 नुसार बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्या किंवा बालविवाहास परवानगी देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत, होत असल्यास याविषयी नागरिकांनी प्रशासनास सूचित करावे. असे आवाहन श्री. वंगारी यांनी केले...

Read More

जिल्हा परिषद व पंचायत समिती, पोट निवडणूक 2022 प्रारुप मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर

नंदुरबार, (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा परिषदेतील निवडणूक विभाग क्र.52 चितवी ता.नवापूर व अक्राणी पंचायत समितीमधील निर्वाचक गण क्रमांक 29 असली ता.अक्राणी मधील रिक्त जागेच्या पोटनिवडणूकीसाठी  मा.राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीत प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. असे नायब तहलिसदार (सामान्य) रामजी राठोड  यांनी कळविले आहे.             सदर कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयातील सूचना फलकावर व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयातील संकेतस्थळावर 28 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीवर काही चूका असतील तर त्यासंदर्भात 28 एप्रिल 2022 ते 5  मे 2022 पर्यंत संबंधितांकडून हरकती व सूचना तहसिल कार्यालयात मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकती व सूचना विचारात घेऊन अधिसूचित केलेल्या तारखेस 11 मे 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात...

Read More
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0150566
Visit Today : 106
error: Content is protected !!