Category: समाजकारण

बालकल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या बालशक्ती व बाल कल्याण पुरस्कार 2021 साठी 15 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावयाचे आहे.  बालशक्ती पुरस्कार पाच पेक्षा अधिक व 18 वर्षांपर्यंत वयाच्या आणि शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नावीण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य, शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेल्या मुलांना दिला जातो. बालकल्याण पुरस्कार हा मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी भावनेतून किमान सात वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. तसेच बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला देखील हा पुरस्कार दिला जातो. ही संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान दहा वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी. बालशक्ती पुरस्कार 2021 व बाल कल्याण पुरस्कार 2021 पुरस्कारासाठी www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सु.शं.इंगवले यांनी केले...

Read More

‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ साठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यासाठी 11 महिनाच्या कालावधीकरीता ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ सुरु करण्यात येत असून युवकाना 27 जुलै 2020 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ अंतर्गत  आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमासाठी  नीती आयोगद्वारे निर्धारीत करण्यात आलेले उद्दिष्ट आणि संकेतांक प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासाठी या युवाशक्तीचा उपयोग करुन घेणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या फेलोशिपचे नियोजन व संचालन करण्यासाठी पिरामल फाऊंडेशन या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. फेलोशिपच्या माध्यमातून प्रतिभावंत युवकांना जिल्हास्तरावर  काम करण्याची संधी मिळणार आहे. फेलोशिपचा अर्ज करण्यासाठी युवक भारतीय नागरीक असावा. महाराष्ट्रातील युवकांना प्राधान्य देण्यात येईल. अर्जदार 21 ते...

Read More

आश्रमशाळा मुख्याध्यापकांकडून सैनिक सहायता निधीसाठी 1 लाखाचा निधी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : देशातील सैनिकाच्या कल्याणासाठी शासकीय आश्रमशाळा तोरणमाळ  येथील मुख्याध्यापक प्रदीप गणेश पाटील यांनी स्वत:च्या वैयक्तिक पगारातून 1 लाखाचा निधी  जिल्हा सैनिक कार्यालयास सैनिक सहायता निधीसाठी दिला आहे. त्यांनी पत्नी सुजाता व कन्या मधुरा यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचेकडे धनादेश सुपूर्द केला. श्री.पाटील यांची कृती इतरांसाठी आदर्श व प्रेरक असल्याचे डॉ.भारुड म्हणाले. देशासाठी आपल्याला काही देणे लागते.आपण दिलेल्या निधीतून देशासाठी शहीद झालेल्यांच्या विधवा पत्नी व पाल्यांना मदत होईल होईल अशी भावना श्री.पाटील यांनी व्यक्त...

Read More

गरीब व गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

अक्कलकुवा(प्रतिनिधी) :कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील निवडक गावातील सुमारे 1000 गरीब व गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. बागलाण सेवा समिती नंदुरबार/नाशिक व ग्रेट ईस्टर्न सी.एस.आर.फाऊंडेशन मुंबई यांच्या सयुंक्त विद्यमाने अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार,उमटी,बोखाडी,बेडाकुंड,चिवलउतार,तोडीकुंड,वाडीबार,भरकुंड,साकलीउमर या गावातील गरीब व गरजु कुटुंबांना तसेच रोजगार गमावून गुजरात राज्यातुन आपल्या मूळगावी परत आलेल्या सुमारे 500 कुटुंबांना जीवनावश्यक साहीत्याचे वाटप करण्यात आले.यात खाद्यतेल,मिरची पावडर,हळद पावडर,मीठ,तुरदाळ,साखर,चहा पावडर,आंघोळीचे साबण, कपडे धुण्याचे साबण आदी साहीत्याचे किट बनवुन वाटप करण्यात आले.या आधी देखील बागलाण सेवा समितीने तेरे देस होमम्स या संस्थेच्या सहाय्याने 500 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले आहे.आता पर्यंत 1000 कुटुंबांना साहित्याचे वितरण करण्यात आलेले आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण वेळी सोशल डिस्टनसिंग चे पालन करुन आरोशि प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक पुष्पलता ब्राम्हणे यांनी उपस्थितांना कोरोना विषाणु पासुन बचावासाठी फिजिकल डिस्टंसिंग,वारंवार साबणाने हात धुणे,चेहऱ्याला,नाका – तोंडाला हात न लावणे,आणि महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे.आदी प्रकारच्या सुचना देऊन कोरोना बाबत माहीती दिली.जीवनावश्यक वस्तुंची वेगवेगळ्या संस्था कडुन मदत मिळविण्यासाठी राजु शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले तर वस्तूंच्या वितरणासाठी तहसीलदार विजय कच्छवे यांनी सहकार्य केले.श्रीमती पुष्पलता ब्राम्हणे,श्रीमती आशालता पिंपळे,सुधिरकुमार ब्राम्हणे, स्वप्निल पवार,यांनी परिश्रम घेऊन गरिब व गरजु कुटुंबांपर्यत मदत पोहचविण्याचे काम यशस्वीरित्या पार...

Read More

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांचे रक्तदान

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि नंदुरबार जिल्हा राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी रक्तदान करून  शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा रुग्णालयाचे रक्त संकलन अधिकारी, डॉ.एस.ए.सांगळे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र चव्हाण, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, जयेश सोनवणे, हेमंत माळी आदी उपस्थित होते. शिबिरात निवासी उपजिल्हाधिकारी  धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उल्हास देवरे, सहायक उपनिबंधक निरज चौधरी या अधिकाऱ्यांनी रक्तदान केले. शिबिरास विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात 28 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. त्या सर्व रक्तदात्यांना राज्य रक्त संक्रमण परिषदचे प्रमाणपत्रही यावेळी वितरीत करण्यात आली. नागरिकांनी रक्तपेढीत जावून रक्तदान कराव, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आले. नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हेमत देवकर, उपाध्यक्ष मिलिद निकम, सहायक चिटणीस, हेमत मरसाळे आदींनी या शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम...

Read More

पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त अन्नधान्य वाटप

नंदुरबार (प्रतिनिधी) – मे रोजी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९५ व्या जयंतीनिमित्त धनगर समाज युवा मल्हार सेनेतर्फे नवापूर चौफुली भागातील गरजू व्यक्तींना अन्नधान्य वाटप करण्यात आले. देशात कोरोना विषाणुचे संकट लक्षात घेता संपूर्ण देशात अहिल्याबाई होळकर जयंती अत्यंत साधेपणाने मात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्याबाई होळकर अत्यंत दानधर्मी, प्रजावत्सल व लोककल्याणकारी शासनकर्त्या होत्या. त्यांच्या सेवाभावी व दानधर्मी या गुणांचा आदर्श घेत धनगर समाज युवा मल्हार सेनेतर्फे शहरातील नवापूर चौफुली भागातील गरीब गरजू लोकांना धान्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या प्रदेशाध्यक्षा धनश्री आजगे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर धनगर, योगेश बोरसे, लक्ष्मण धनगर, प्रकाश धनगर, किसन धनगर, मुकेश आजगे, प्रमोद रजाळे, उज्वल धनगर, दिपक धनगर, विकास बोरसे, मनोज महाले, भुषण महाले आदी समाज बांधव उपस्थित...

Read More

नंदुरबार जिल्हा परिषदेतर्फे स्वच्छाग्रहींना सॅनिटाईझर, मास्कचे वाटप

नंदुरबार (प्रतिनिधी ) – कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामपातळीवर काम करीत असलेल्या स्वच्छाग्रहीच्या सुरक्षिततेसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲङ. सिमा पद्माकर वळवी यांचे हस्ते सॅनिटाईझर, मास्क व हॅन्डग्लोज यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी. सी., जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रतनदादा पाडवी, बांधकाम सभापती अभिजित पाटील उपस्थित होते.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख व जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून विविध उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविले जात आहेत.कोरोना विरुद्धच्या या लढाईत ग्रामपंचायत स्तरावर पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ ,पंचायत समितीचे सर्व गटविकास अधिकारी, जिल्हा व तालुका कक्षातील कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताग्रही सक्रिय झालेले असून त्यांचेमार्फत ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामस्तरावर कोरोनाबाबत जाणीव जागृती केली जात आहे.ग्रामपातळीवर काम करीत असलेल्या स्वच्छाग्रहींची सुरक्षितता व त्यांचे आरोग्य जपणे यासाठी राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दि.20 एप्रिल 2020 च्या शासननिर्णयादवारे ग्रामपंचायत स्तरावर कोरोना आजाराच्या प्रतिबंधसाठी काम करणाऱ्या स्वच्छाग्रहींना जागतिेक बँक प्रोत्साहन अनुदान अंतर्गत हँन्डग्लोज, सॅनिटाईझर तसेच मास्क आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देणेबाबत सूचित केले होते.त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कोरेानाचा प्रादुर्भाव झालेल्या ग्रामपंचायती व शहराजवळील असलेल्या ग्रामपंचायतीतील एकूण 310 स्वच्छाग्रही यांचेसाठी हँन्डग्लोज, सॅनिटाईझर तसेच मास्क वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार आज दि.22 रोजी जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲङ. सिमा पद्माकर वळवी यांचे हस्ते नंदुरबार तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीतील स्वच्छाग्रहींना सॅनिटाईझर, मास्क व हॅंन्डग्लोज यांचे वाटप करण्यात आले....

Read More

कोविड संकटाच्या काळात एक नवी ‘उमेद’

नंदुरबार  – कोविड संकटाच्या काळात रोजगाराचे प्रश्न निर्माण होत असताना जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समूहांनी ‘उमेद’ अभियानांतर्गत संसर्ग पसरू नये यासाठी वापरण्यात येणारे मास्क तयार करण्याचा उपक्रम हाती घेऊन रोजगार निर्मितीचा एक चांगला पर्याय निवडला आहे. याशिवाय घरपोच किराणा माल पोहोचविणे आणि भाजीपाला विक्रीतूनही समूहांनी उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे.  राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या माध्यमातून ‘उमेद’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात  अभियानाची अंमलबजावणी प्रभाविपणे करण्यात येत आहे. एप्रिल 2020 अखेर एकूण 14 हजार 966 महिला स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून 1 लाख 47 हजार 961 कुटूंबाचा समावेश या अभियानात करण्यात आलेला आहे. समूहांना गावस्तरावर मार्गदर्शन करण्यासाठी अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून स्थानिक गावातील 1000 महिला कार्यरत आहेत. कोविड संकटाचा सामना विविध स्तरावर करावा लागत असताना त्याचे संधीत रुपांतर करण्याचा प्रयत्न अभियानाच्या माध्यमातून समूहातील महिलांनी केला. त्यातून मास्क तयार करण्याची कल्पना पुढे आली. आतापर्यंत 13 हजार मास्क तयार करून त्यातील आरोग्य विभागाला 10 हजार व इतर विभागांना 3 हजार देण्यात आले आहे. मास्क तयार करताना आरोग्य विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालनदेखील करण्यात येत आहे. 16 समूहांच्या 13 म‍हिलांनी हे काम सुरू केले.  काही महिला घरातच वैयक्तिक स्वरुपात व काही सामुहिक स्वरुपात कोरोनापासून सुती कापडाचे मास्क तयार करीत आहे. मास्कची किंमत 10 ते 30 रुपये एवढी आहे. उत्पन्नासोबत कोविडशी लढण्यासाठी आवश्यक वस्तूची निर्मिती करण्याचे समाधानही मिळत असल्याची महिलांची भावना आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा तालुक्यातील ग्रामपंचायत, व नंदुरबार ,नवापुर व शहादा तालुक्यातील विविध शासकीय विभागाकडूनही त्यांच्याकडे मास्कची मागणी होत...

Read More

जिप अध्यक्षा कु. सीमा वळवी यांच्या कडून एक लक्ष रुपये मदत

नंदुरबार :- येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कु. सीमा वळवी व त्यांचे वडील माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी या दोघांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये प्रत्येकी एक लक्ष रुपये रक्कमेचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द केला.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कु. सीमा वळवी यांनी त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य मानधनाच्या रकमेतून एक लक्ष रुपये एवढी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याबरोबरच त्यांचे वडील माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनीदेखील यांच्या मानधनातून एक लक्ष रुपये एवढी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे. देश संकटात असतांना प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने देशसेवा, समाजसेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड ज्यांच्याकडे सुपूर्द केल्याचे यावेळी माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी...

Read More
Loading

सुंदर विचार

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – ११२१ 〇 🎵
═══════ 🦋;🦋 ═══════

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन
सूचना देतात ते सामान्य
आणि
स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात
ते असामान्य !
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
It is normal to
give instructions to
the drowning people
from the shore
and it is unusual to
save them by risking
their own lives !

➖➖➖➖➖➖➖➖➖
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
सकस आहाराचे सेवन करा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
२८ ऑगस्ट
१८९६: उर्दू शायर
रघुपती सहाय
ऊर्फ फिराक गोरखपुरी,
(मृत्यू: ३ मार्च १९८२)
१९०६: रंगभूमी अभिनेते
चिंतामणी गोविंद
तथा मामा पेंडसे,
१९१८: प्रसिद्ध संगीतकार
राम कदम,
(मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)
१९२८: पदार्थवैज्ञानिक
एम. जी. के. मेनन,
१९२८: सुप्रसिद्ध सतारवादक
उस्ताद विलायत खाँ,
(मृत्यू: १३ मार्च २००४)
१९३४: न्यायमूर्ती, राष्ट्रीय
मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा
सुजाता मनोहर,
१९६६: माजी खासदार
प्रिया दत्त
यांचा जन्मदिवस !
१६६७: जयपूर चे राजे
मिर्झाराजे जयसिंग,
(जन्म: १५ जुलै १६११)
१९६९: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत
रावसाहेब पटवर्धन,
२००१: लेखक, चित्रकार
व्यंकटेश माडगूळकर
(जन्म: ६ जुलै १९२७)
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0038729
Visit Today : 194
error: Content is protected !!