Author: Ramchandra Bari

नंदुरबार जिल्ह्यात संकलित मूल्यमापनाला सुरुवात

नंदुरबार (प्रतिनिधी) स्टार प्रकल्पांतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या नियतकालिक मूल्यमापन चाचण्यांना (PAT) आज जिल्हाभरात सुरुवात झाली. जिल्हाभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी अनुदानीत शाळांतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या संकलित मूल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या नियोजनानुसार राज्यातील इयत्ता तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी क्र. 1 चे आयोजन करण्यात आले आहे. दि. 30 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर 2023 या तीन दिवसात राज्यभरातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी या चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!