नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री सूक्ष्म उन्नयन योजना या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूची तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

संसाधन व्यक्ती पदासाठी नामांकित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, संस्था यांचेकडील अन्न तंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी मधील पदविका, पदवी अथवा ज्या व्यक्तींना अन्न प्रक्रिया उद्योग, बँकींग, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, व प्रशिक्षणाचा अनुभव आहे अशी व्यक्ती सदर पदासाठी पात्र असेल. तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन, वृध्दी नविन उत्पादन विकसीत करणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी, अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भातील 3 ते 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक राहील.

सदर पदाकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम 27 जानेवारी 2021 असून योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमूना, सविस्तर पात्रता परिश्रमिक (मानधन) व इतर अटी व शर्ती कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनंत पोटे यांनी कळविले आहे.