नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :- आगामी दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस जिल्ह्यात प्रतिबंध करण्यात आला आहे. विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्याची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनीय आहे. त्यामुळे विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जर कोणी बाळगत असेल, त्याचा साठा करत असेल किंवा विक्री करत असल्यास नागरिकांनी त्याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन अप्पर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.