नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार येथिल न ता वी समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी एड 2021-23 च्या विद्यार्थी शिक्षकांनी महाविद्यालयात विविध वृक्ष लावून कुंडी मध्ये वृक्षरोपण करून 5 जून पर्यावरण दिवस उत्साहात साजरा केला तत्पूर्वी यावेळी संस्थेचे समन्वयक माजी प्राचार्य डॉ एम एस रघुवंशी सरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम एस रघुवंशी सर बी एड चे समन्वयक प्रा मोईन शेख प्रा डॉ युवराज पाटील सर यांनीही वृक्षरोपण केले. व पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षलावणेच नव्हे तर ते वाढविणे व वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज आहे अशी भावना व्यक्त केली . सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी शिक्षक उमाकांत सोनार सर संगीता वाघ मेम कमलेश पाटील सर व सर्व विद्यार्थी शिक्षकांनी परिश्रम घेतले