नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार तालुक्यातील तिलाली (शनिमांडळ) ग्रामपंचायत सरपंच पदावर महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ. स्मिता मधुकर पाटील यांची निवड झाली आहे, पालकमंत्री अँड. के. सी. पाडवी, माजी आमदार चंद्रकांतजी रघुवंशी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजितदादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली व माजी कृ.उ.बा.समिती चेअरमन डॉ. सयाजी मोरे, माजी जि.प. उपाध्यक्ष शंकरराव मोरे व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष उत्तम पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सोमूभैय्या गिरासे, माजी जि.प. सदस्य प्रविण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लाला माला भिल, प्राचार्य डॉ.सी.पी.सावंत, जगन पाटील, दिपक पाटील यांच्या सहकार्याने ही निवडणूक संपन्न झाली. यावेळी तिलाली ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते, सरपंच पदावर झालेल्या निवडीबद्दल सर्वांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.