नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार यांच्यामार्फत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता झुमॲपवर वेबिनार आयोजित करण्यात आले आहे.

या वेबिनारमध्ये जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कामकाजात येणाऱ्या अडीअडचणी बाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. मीटिंगचा आयडी-96173634174 व पासवर्ड -813902 असा असून प्राचार्य, कर्मचारी,मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालकांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार यांनी केले आहे.