विरोधी भाजपाने काँग्रेसला दिले समर्थन, हात उंचावून झालेले मतदान
नंदुरबार (जगदीश ठाकुर)-
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सीमा पद्माकर वळवी यांना काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपानेही समर्थन दिल्यामुळे काँग्रेसच्या सीमा वळवी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. यावेळी विरोधी भाजपाच्या सर्व सदस्यांनी हात उंचावून काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.