नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा ता. नवापूर या निवासी शाळेत सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेशासाठी 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

इयत्ता पाचवीच्या प्रवेश परीक्षेस बसणारे विद्यार्थी, विद्यार्थीनी हे सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथीत शासकीय, अनुदानित किंवा जिल्हा परिषद शाळेत शिकणारा असावा. अर्जासोबत विद्यार्थ्यांचे बोनाफाईड प्रमाणपत्र, इयत्ता चौथीचे प्रथम सत्र परीक्षा गुणपत्रक, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा अधिक नसावे. सोबत आर्थिक वर्ष 2022-2023 चा उत्पन्नाचा दाखला अर्जासोबत जोडावा.

प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा, गट शिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र पंचायत समिती तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत विनामुल्य मिळतील. परीपुर्ण भरलेले प्रवेश अर्ज 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा येथे शिक्षण शाखेत येथे स्विकारण्यात येतील त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले  जाणार नाहीत. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. पत्की यांनी कळविले आहे.