नंदुरबारप्रतिनिधी पंकज – जिल्हा परिषद अंतर्गत काम करणा-या कर्मचा-याच्या दिर्घकालावधी पासुन प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य होत नसल्याने आज रोजी 10वाजेला पासुन पंचायत समितीचे कर्मचारी यांनी पंचायत समिती गेटवर आदोलन केले. या आंदोलनात महिला कर्मचारीही सहभागी झाले होते. सदर आंदोलन हे शासनाचे लक्ष वेधण्यात करीता करण्यात येत आहे.तरी शासनाने प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा आदोलकांनी केली आहे.
सदर मागण्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर कोषाध्यक्ष श्री.रामदास सोनार, कार्याध्यक्ष श्री.राजीव वसावे,सरचीटनीस श्री.इंद्रसिग राजपुत,अध्यक्ष.श्री. गणेश व्ही.भामरे आदी.सही आहेत.