नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : करपात्र निवृत्तीवेतन असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी जुना कर पर्याय (ओल्ड टॅक्स रिजीम) किंवा नवा कर पर्याय (न्यू टॅक्स रिजीम) पैकी एकाची निवड करून जिल्हा कोषागार कार्यालयास  to.nandurbar@zillamahakosh.in  या ईमेल पत्त्यावर पाठवावे.

आर्थि‍क वर्ष 2020-21 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या आयकर सेक्शन 115बीएसी  नुसार आर्थिक वर्ष 2020-21 च्या आयकर गणनेसाठी (ओल्ड टॅक्स रिजीम) किंवा नवा कर पर्याय (न्यू टॅक्स रिजीम) असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत.

निवृत्तीवेतन धारकांनी या दोन प्रकारापैकी  योग्य असणारा पर्याय निवडावा. याकरीता आवश्यक असल्यास आपल्या नजीकच्या सनदी लेखापालांचीही मदत घ्यावी. आपण निवडलेले पर्याय या वरील ईमेल पत्त्यावर आपल्या नाव, पीपीओ क्रमांक, बँकेचे नाव , शाखेचे नाव सहित 30 सप्टेंबर 2020 पूर्वी कळविण्यात यावा, जेणेकरुन आपण निवडलेल्या पर्यायानुसार देय होणारी  टीडीएस वजाती करता येईल.

जे निवृत्तीवेतन धारक टॅक्स रिजीमची निवड वेळेत कळविणार नाहीत त्यांची पूर्वीप्रमाणेच टीडीएस वजावट करण्यात येईल याची नोंद घ्यावी,  असे  जिल्हा कोषागार अधिकारी  देविदास पाटील यांनी कळविले आहे.