नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यात 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली असल्याने विभागीय आयुक्त कार्यालयात महिन्याचा दुसरा सोमवार, 14 सप्टेंबर 2020 या दिवशी होणारा विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी. असे  निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले आहे.