नंदुरबार :- जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, आज शहरातील २५ रुग्णांसह जिल्ह्यातील तब्बल ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १४५ एवढी झाली आहे. आठवडाभरात जिल्ह्यात कोरोनाचा बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज आढळुन आलेल्या रुग्णांमध्ये तळोदा येथील मीना कॉलनीतील २ जण त्यात १ पुरुष ५८, १ महिला ५२, शहादा येथील गणेश नगरमधील २ रुग्ण त्यात १ पुरुष ४०, १ महिला १० यांचा समावेश आहे. तसेच नंदुरबार शहरामध्ये २७ रुग्ण आढळले आहेत. त्यात ज्ञानदीप सोसायटी २ पुरुष ३१, ६१ गिरीविहार सोसायटी ५ पुरुष ८,२४,३७,३८,६७ तर १ महिला ६७ यांचा समावेश आहे. तसेच मंगळ बाजार सिद्धिविनायक चौक परिसरातील १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात ४ पुरुष २०,४८,४९,५९ तर ६ महिला २,३८,३८,४३,१६,४५ यांचा समावेश आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यात ४ पुरुष २८,३१,४२,४४ व १ महिला २५ यांचा समावेश आहे. नंदुरबार तालुक्यातील सैताणे येथील ७ रुग्णांचाही आजच्या अहवालांत समावेश आहे. त्यात ५ पुरुष १८,१९,२३,४३,७० तर २ महिला ३५,६० यांचा समावेश आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्नांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असून, ती आता १४५ एवढी झाली आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतराचे नियम पाळून अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, परगावाहून आलेल्या व्यक्तींबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.