अक्कलकुवा(प्रतिनिधी) :कोरोना लॉकडाऊनच्या  पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील निवडक गावातील सुमारे 1000 गरीब व गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
    बागलाण सेवा समिती नंदुरबार/नाशिक व ग्रेट ईस्टर्न सी.एस.आर.फाऊंडेशन मुंबई यांच्या सयुंक्त विद्यमाने अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार,उमटी,बोखाडी,बेडाकुंड,चिवलउतार,तोडीकुंड,वाडीबार,भरकुंड,साकलीउमर या गावातील गरीब व गरजु कुटुंबांना तसेच रोजगार गमावून गुजरात राज्यातुन आपल्या मूळगावी परत आलेल्या सुमारे 500 कुटुंबांना जीवनावश्यक साहीत्याचे वाटप करण्यात आले.यात खाद्यतेल,मिरची पावडर,हळद पावडर,मीठ,तुरदाळ,साखर,चहा पावडर,आंघोळीचे साबण, कपडे धुण्याचे साबण आदी साहीत्याचे किट बनवुन वाटप करण्यात आले.या आधी देखील बागलाण सेवा समितीने तेरे देस होमम्स या संस्थेच्या सहाय्याने 500 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले आहे.आता पर्यंत 1000 कुटुंबांना साहित्याचे वितरण करण्यात आलेले आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण वेळी सोशल डिस्टनसिंग चे पालन करुन आरोशि प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक पुष्पलता ब्राम्हणे

यांनी उपस्थितांना कोरोना विषाणु पासुन बचावासाठी फिजिकल डिस्टंसिंग,वारंवार साबणाने हात धुणे,चेहऱ्याला,नाका – तोंडाला हात न लावणे,आणि महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे.आदी प्रकारच्या सुचना देऊन कोरोना बाबत माहीती दिली.जीवनावश्यक वस्तुंची वेगवेगळ्या संस्था कडुन मदत मिळविण्यासाठी राजु शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले तर वस्तूंच्या वितरणासाठी तहसीलदार विजय कच्छवे यांनी सहकार्य केले.श्रीमती पुष्पलता ब्राम्हणे,श्रीमती आशालता पिंपळे,सुधिरकुमार ब्राम्हणे, स्वप्निल पवार,यांनी परिश्रम घेऊन गरिब व गरजु कुटुंबांपर्यत मदत पोहचविण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले.