नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :   ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत शहादा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लहान शहादा येथे कोरोना स्वॅब चाचणी शिबीराचे आयोजन करण्यात आले .

            यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.आर.तडवी, सरपंच जिजाबाई पाडवी, ग्राम विस्तार अधिकारी संजय देवरे, डॉ.सुनिल वळवी, डॉ.किर्ती सुर्यवंशी, डॉ.अश्विनी देसले, डॉ.मनिष नार्दे उपस्थित होते.

यावेळी डॉ.तडवी यांनी स्वॅब तपासणी शिबीरास भेट देऊन कामाची पाहणी केली. गावातील नागरिकांशी संवाद साधताना मास्कचा वापर, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ धुण्याबाबत आवाहन करण्यात आले. स्वॅब चाचणीबाबत नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी शिबिराला चांगला प्रतिसाद दिला. गावातील  70 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. गावात घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेण्यात आली आणि आरोग्य तपासणी करण्यात आली.