Category: गणेशोत्सव

गणेश मंडळांनी एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी बॅनर्स लावावेत- मनीषा खत्री

नंदुरबार : (जिमाका वृत्तसेवा) सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये सर्व गणेश मंडळांनी एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी 8 बाय 8 आकाराचे 2 बॅनर्स गणेश मंडळाच्या प्रदर्शनी भागात स्वखर्चाने लावावेत, असे आवाहन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9822343863 व 9421480675 यावर संपर्क साधावा असेही श्रीमती खत्री यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले...

Read More

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत- जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्त) -राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून जिल्ह्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तातडीने नावनोंदणी करुन यामध्ये 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. राज्यात 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या ई- मेल आयडीवर अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज htttp://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. स्पर्धेसाठीचे निकष व विषय या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी असलेल्या विविध निकषांनुसार, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत), ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखावा, गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्य, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेले...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading

All

Latest
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!