Author: Ramchandra Bari

9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन सचिव डि. व्ही. हरणे

नंदुरबार : (जिमाका वृत्त): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, नंदुरबार येथे व सर्व तालुकास्तरावर शनिवार 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डि.व्ही. हरणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात दावे, कौटुंबिक हिंसाचार, चलनक्षम दस्तऐवज प्रकरणे, किरकोळ स्वरुपाची दिवाणी प्रकरणे, भूसंपादनाशी संबंधित असणारी प्रलंबित प्रकरणे या अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर दाखलपुर्वक प्रकरणांमध्ये सर्व प्रकारचे तडजोडक्षम प्रकरणे, उदा. बँक कर्ज, पाणीपट्टी, दूरध्वनी देयक, वीजबिल इत्यादी थकबाकी वसुलीची प्रकरणे ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांनी त्यांच्या अखत्यारीतील थकबाकी बाबतची दाखलपूर्वक प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवावयाची असल्यास जिल्ह्यातील कार्यालयांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार येथे, तर  तालुकास्तरावरील कार्यालयांनी तालुका विधी सेवा समितीकडे संपर्क साधावा.  जास्तीत जास्त नागरिकांनी राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. हरणे यांनी केले...

Read More

न्युक्लिअस बजेट योजनेसाठी 18 ऑगस्ट पर्यंत अर्ज स्विकारले जातील -चंद्रकांत पवार

नंदुरबार (जिमाका वृत्त) : नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्पित न्यूक्लिअस बजेट योजनेत ‘अ’ गटात-उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या व ‘क’ गटात- मानव साधन संपत्ती विकासाच्या आदिवासी कल्याणात्मक योजनांचा लाभ देण्यात येणार असून या योजनेचे अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, 18 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील, असे नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. ‘अ’ गटात उत्पन्न निर्मितीच्या किंवा वाढीच्या योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना बिगर यांत्रिकी बोट व मत्स्यजाळेसाठी, तसेच युवकांना सामुहिक युवक गटांना बॅन्ड संच, इतर साहित्य तसेच शेतकऱ्यांना पावर विडर मशिन घेण्यासाठी प्रत्येकी 85 टक्के अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ‘क’ गटात मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणत्मक योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या ग्रामपंचायतींना सार्वजनिक कार्यक्रमासाठी  भांडी संच, युवकांना क्रिकेट खेळ खेळण्यासाठी क्रिकेट साहित्य संच, सार्वजनिक कार्यक्रमासाठी भजनी साहित्य, सार्वजनिक कार्यक्रमासाठी मंडप, खुर्ची व इतर साहित्य, परंपरागत कलापथक व प्रबोधनकार यांना समाजात जनजागृती करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे तसेच अनुसूचित जमातीच्या बचत गटाचे सक्षमीकरण करण्यासाठी  बचतगटांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.  या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी योजनेच्या आवश्यकतेनुसार जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, ग्रामसभा ठराव, रहिवासी दाखला, आधारकार्ड, बँक पासबुक, तसेच यापूर्वी सदर योजनेतून लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्रांची छायांकित प्रत अर्जासोबत जोडून अर्ज 18 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावे, असेही प्रसिध्दी पत्रकान्वये श्री. पवार यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!