Author: Ramchandra Bari

सहकार विभागाच्या पदभरतीसाठी 14 व 16 ऑगस्ट रोजी होणार ऑनलाईन परिक्षा

नंदुरबार (जिमाका वृत्त) : सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदांच्या भरतीसाठी  6 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या  उमेदवारांची  टी.सी.एस. कंपनीमार्फत 14 ऑगस्ट व 16 ऑगस्ट 2023 रोजी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. अशी माहिती सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक भारती ठाकूर यांनी दिली आहे. परिक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना उमेदवारांना त्यांनी अर्ज सादर करतेवेळी नोंदणी केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांवर व ई-मेल यावर पाठविण्यात आल्या आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करावयाची लिंक आणि सूचना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. वरील संकेतस्थळावरून उमेदवारांनी परिक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे, परिक्षेस येतांना प्रवेशपत्राची रंगीत प्रत सोबत ठेवावी. त्याचप्रमाणे प्रवेशपत्रात नमूद सुचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक भारती ठाकूर यांनी  केले...

Read More

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ – जी.पी. मस्के

नंदुरबार : (जिमाका वृत्त) जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या वर्गासाठी शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी होणारी निवड चाचणी प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास 17 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुव्याचे प्राचार्य जी.पी. मस्के यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. या परीक्षेसाठी उमेदवार https://cbseitms.nic.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज  नि: शुल्क भरू शकतात तसेच www.navodaya.gov.in वरही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे तेथील मुख्याध्यापकांचा सही शिक्यानिशी संपूर्ण भरलेले स्कॅन केलेले प्रमाणपत्र  विद्यार्थी व पालकांची स्कॅन केलेली सही आणि विद्यार्थ्यांचा स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो अर्ज भरताना अपलोड करावे.  परीक्षेसाठी विद्यार्थी सन २०२३-२४ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुआ, तळोदा, शहादा, धडगाव, नवापुर, आणि नंदुरबार शासकीय/शासन मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता ५ वी च्या वर्गात शिकत असावा. विद्यार्थ्यांचा जन्म 01 मे 2012 पूर्वी व 30 जुलै 2014 नंतर झालेला नसावा.  विद्यार्थी हा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी सलग उत्तीर्ण असावा. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुवाचे प्राचार्य जी.पी. म्हस्के दूरध्वनी क्रमांक 0257-252260,  परिक्षा प्रभारी वी.बी. पाटील मोबाईल क्र. 9359940543 यांच्याशी संपर्क...

Read More

खरीप पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत सहभागी व्हावे – राकेश वाणी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): कृषि विभागामार्फत खरीप हंगाम 2023 पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत  शेतकऱ्यांनी  31 ऑगस्ट, 2023 पर्यंत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी यांनी केले आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पीक स्पर्धा राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर स्वतंत्रपणे आयोजित न करता एकाच वर्षात तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील पीक स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी शेतकऱ्यांची उत्पादकता आधारभूत मानून विजेत्या शेतकऱ्यांची राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भूईमुग व सुर्यफुल या पिकांचा समावेश आहे. स्पर्धेसाठीची बक्षिसे ▪️ तालुका पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास रूपये 5 हजार, व्दितीय क्रमांकास रूपये 3 हजार, व तृतीय क्रमांकास रूपये 2 हजार असे स्वरूप आहे.  ▪️जिल्हा पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास रूपये 10 हजार, व्दितीय क्रमांकास रूपये 7 हजार व तृतीय क्रमांकास रूपये 5 हजार असे स्वरूप आहे.  ▪️राज्य पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास रूपये 50 हजार, व्दितीय क्रमांकास रूपये 40 हजार व तृतीय क्रमांकास रूपये 30 हजार असे स्वरूप आहे.  अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी  किंवा कृषि विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा. असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!