Author: Ramchandra Bari

वाळुच्या डंपरमध्ये विमल गुटख्याची वाहतुक चौघे ताव्यात , ३४ लाखाचा गुटखा जप्त

नंदुरबार :- गुजरात राज्यातून महाराष्ट्रात आणलेला सुमारे 34 लाख रुपयांचा गुटखा नंदुरबार पोलिसांनी हस्तगत केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी सुरू केलेल्या “ऑपरेशन वॉश आउट” चे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून, पोलिसांनी ही कार्यवाही सुरू केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे .सध्या संपुर्ण जगभरासह भारतात थैमान घातलेल्या कोराणा विषाणुचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने संपुर्ण भारतात लॉकडाऊन घोषीत केलेले आहे . नंदुरबार जिल्हात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून खबरदारीच्या सर्व उपाय योजना राज्य शासन युध्द पातळीवर करीत आहे. यातच महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा गुजरात राज्यातुन नंदुरबार जिल्ह्यात आणुन लॉकडाऊनचा फायदा घेवुन त्याची जास्त दरात विक्री होत होता. त्यानुसार आज दिनांक १६ एप्रिल २०२० रोजी गुजरात राज्यातुन निझरमार्गे नंदुरबार येथे मोठया प्रमाणात विमल गुटखा वाहतुक होणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दिनांक १५ रोजी रात्री ११ वाजेपासुन निझर रोडवर मन्सुरी टेन्ट हाऊसजवळ सापळा लावला. आज दि . १६ रोजी सुमारे पहाटे ०१ . ३० वाजेच्या सुमारास निझर गावाकडुन एक हायवा डंपर नंदुरबारच्या दिशेने येताना दिसला. म्हणुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी बॅटरीच्या सहाय्याने वाहनास उभे करण्याचा इशारा दिला असता संशयीत वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघुन गेला , म्हणुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची खात्री झाल्याने सदर वाहनाचा पाठलाग करुन शिताफीने वाहनाला थांबवुन डंपरमध्ये चालक व सोबत ३ इसम बसलेले दिसले. त्यात आकेश काशिनाथ नाईक वय – २४, २ ) मनिष...

Read More

ज्ञानदेव राजपूत यांनी पीएम फंडासाठी केले २१ हजारचे सहाय्य

नंदुरबार (प्रतिनिधी) -येथील पालिकेचे निवृत्त आरोग्य निरीक्षक तथा िनवृत्त प्रभारी जकात अधिक्षक ज्ञानदेव जयसिंग राजपूत यांनी पंतप्रधान सहाय्य निधीत २१ हजार रूपयांचा धनादेश देऊन आर्थिक सहाय्य केले.राजपूत हे १९९८ रोजी पालिकेतून निवृत्त झाले आहेत. कोरोनाशी मुकाबला करतांना राज्य व केंद्र शासनाकडे निधींची कमतरता आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी देण्याचे आवाहन केले हाेते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्ञानदेव राजपूत यांनी २१ हजाराचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपुर्द केला. जिल्हाधिकारी डॉ भारूड यांनी  राजपूत यांचे आभार मानले.देशाने आपल्यावर खूप उपकार केलेत, एक कृतज्ञता म्हणून निधी देत आहे, असे राजपूत यांनी सांगितले.मुख्यमंत्री सहाय्ता निधी व पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते पुढे येत...

Read More

महाराष्ट्र दिनाबाबत शासनाचे निर्देश

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन साजरा करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, त्यासाठी शासनाने नियमावली बनवली आहे. १ मे २०२० रोजी आपल्या राज्याच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु कोरोनाचे थैमान आणि ३ मे पर्यंत असलेला लॉकडाऊन यामुळे महाराष्ट्र दिन कसा साजरा होणार या बाबत संभ्रमावस्था होती. परंतु राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रसिध्द केलेल्या शासन निर्णयाने त्यामध्ये सुस्पष्टता आली आहे. या शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेला दिनांक १ मे, २०२० रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी, यावर्षी राज्यात ” महाराष्ट्र दिन ” हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने काही निर्देश देण्यात आले आहेत.१. राज्यातील मंत्रालय व सर्व जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालये या ठिकाणी एकाच वेळी सकाळी ८.०० वा. फक्त ध्वजारोहण करण्यात यावे.२. या ठिकाणी केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद एवढयाच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे.३. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये.४. कवायतीचे आयोजन करण्यात येवू नये.५. विधीमंडळ, मा.उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे.६. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे.असे निर्देश देण्यात आले आहेत. या शासन निर्णयात शाळांमध्ये साजरा होणारे झेंडावंदन या बाबत मात्र कुठलाही स्पष्ट उल्लेख...

Read More

अक्कलकुवा तालुक्यात जीवनावश्यक साहित्याचे वाटप

अक्कलकुवा :- (प्रतिनिधी) कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बागलाण सेवा समिती, व तेरे देस होम्स फ्रान्स/जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमानेअक्कलकुवा तालुक्यातील निवडक गावातील गरीब व गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले. बागलाण सेवा समिती, व तेरे देस होम्स फ्रान्स/जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकुवा तालुक्यातील तोडीकुंड, बेडाकुंड, भरकुंड, उमटी, साकलीउमर, वाडीबार, बोखाडी, सल्लीबार, उमरागव्हाण, चिवलउतार या सातपुडा पर्वत रांगेतील 10 गावात सुमारे 1000 कुटुंबांना जीवनावश्यक साहीत्याचे वाटप करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी दि.10 व 11 तारखेला तोडीकुंड, चिवलउतार, उमरगव्हाण, भरकुंड, सल्लीबार, बेडाकुंड या गावात 500 कुटुंबांना खाद्यतेल, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, दाळ, साखर, चहा पावडर, साबण अशा साहीत्याचे किट बनवुन 500 किटचे वाटप करण्यात आले. साहीत्याचे वाटप करतांना सोशल डिस्टंसिंगचे जाणिवपुर्वक पालन करण्यात आले. यावेळी आरोशि प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक पुष्पलता ब्राम्हणे यांनी उपस्थितांना कोरोना विषाणु पासुन बचावासाठी सोशल डिस्टंसिंग, वारंवार साबणाने हात धुणे, चेहऱ्याला व नाका – तोंडाला हात न लावणे आणि महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, या प्रकारच्या सुचना तथा माहीती दिली. जीवनावश्यक वस्तूं वाटपाचे नियोजन व वितरण संस्थेचे सचिव राजु शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अक्कलकुव्याचे प्रभारी तहसीलदार विजय कच्छवे यांनी यासाठी सहकार्य केले. पुष्पलता ब्राम्हणे, श्रीमती आशालता पिंपळे, सुधिरकुमार ब्राम्हणे, संजय पिंपळे, स्वप्निल पवार, बाज्या वसावे, मोतीराम पाडवी, जमुनाबाई वळवी, कालुसिंग वळवी, सुभाष पाडवी, रमेश पाडवी यांनी प्रत्यक्ष लोकांपर्यत मदत पोहचविण्यासाठी परिश्रम घेतले. Posted by NsevenNews Ndb on Wednesday, 15 April...

Read More

नंदुरबारात विद्यार्थी घेतायेत तंत्रस्नेही शिक्षण

नंदुरबार ( प्रतिनिधी) – आजच्या युगात तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व शाळा बंद आहे मात्र, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आज तांत्रिकदृष्ट्या शक्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नंदुरबारच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलने जबाबदारी घेत शिक्षकांना प्रशिक्षण दिले. तंत्रस्नेही शिक्षक आता विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभव देत आहेत.नंदुरबारच्या पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत विद्यार्थ्यांना घरी बसल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. शाळेचे प्राचार्य श्री.मुकुंद इंगळे यांनी या उपक्रमाबाबत बोलतांना सांगितले की, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण वर्षाचे नियोजन केले असून, त्यांना विविध शैक्षणिक अनुभव गूगल व झूम फीचर्स द्वारे तसेच विविध सोशल मिडियाच्या माध्यमातून देत असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थांना संकल्पना समजण्यासाठी त्यांना लागणारी ई पुस्तके,पीपीटी, व्हिडिओ आणि कार्यपत्रक देत असतो. यात शिक्षक थेट विद्यार्थ्यांशी संपर्क करीत त्यांना शिकवत असतात. या वर्चुअल लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान आत्मसात होत आहे. याखेरीज 1 एप्रिलला विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्षाचा कारकीर्दीचा आढावाही वर्चुअल (वास्तविक) लर्निंगद्वारे घेण्यात आला. शिक्षकांनी पालकांशी थेट वर्चुअल (वास्तविक) लर्निंगद्वारे संवाद साधत विद्यार्थ्यांचा गुणपत्रकाची माहिती दिली. यात पालकांशी साधलेल्या चर्चेत थेट वर्चुअल (वास्तविक) लर्निंगद्वारे पालकांनीही शाळेच्या विलक्षण नियोजनाचे कौतुक केले. या स्तुत्य उपक्रमासाठी प्राचार्य श्री.मुकुंद इंगळे यांनी पोदार संस्थेचे विश्वस्त श्री.पवन पोदार, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख श्री.आनंद चावला तसेच शाळेला नाविन्यपूर्ण शैक्षणिक योजना हस्तांतरित करणाऱ्या श्रीमती. रेनी बिजलानी व सर्व टीमचे आभार मानले आहेत. या अनोख्या वर्चुअल (वास्तविक) लर्निंग पद्धतीने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक सुसंवाद साधला जात असून, लॉकडाऊनचा काळातही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत नसून...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!