प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महिलांना गावातच मिळणार रक्कम
नंदुरबार दि.18- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात पुढील दोन महिने 500 रुपये अनुदान जमा होणार असून प्रत्येक महिन्यात जमा होणारी रक्कम त्यांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक व बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राद्वारे घरपोच मिळणार आहे.योजनेअंतर्गत जनधन बँक खातेधारक महिलांना एप्रिल महिन्याचे अनुदान वितरीत करण्यात आले असून मे आणि जून महिन्यातदेखील अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून बँकेतील गर्दी टाळणे आवश्यक असल्याने प्रशासनामार्फत सर्व इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून गावपातळीवर व शहरात वॉर्डनिहाय सेवा देण्यात येत आहे.जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकची 150 सेवा केंद्र आहेत. तसेच बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्रांची संख्या 172 आहे. या सर्वांची यादी तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी यांचेकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर गावातील व वॉर्डातील लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पैसे वाटपाचे वेळापत्रक ठरविण्यात येईल.ग्राहकांना जाहीर दवंडीद्वारे पैसे मिळण्याचा दिवस कळविण्यात येईल. कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत आधार लिंक खाते असलेले सर्व ग्राहक या दोन्ही सेवांच्या माध्यमातून पैसे काढू शकतात. त्यासाठी ग्राहकांनी आपले आधार कार्ड आणि मोबाईल सोबत न्यावे. ग्राहकांना पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नसल्याने त्यांचा वेळ व श्रम वाचणार आहे. धुळे-नंदुरबार पोस्टाचे वरीष्ठ अधीक्षक अनंत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट पेमेंटचे काम होणार आहे. पैसे वाटप करताना एकावेळी 4 ते 5 ग्राहकांना परवानगी देण्यात येईल व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येईल. ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकांना काऊंटरपासून 1 मीटर दूर उभे रहावे. ग्राहक सेवा केंद्रांना आपली यंत्रे वेळोवेळी स्वच्छ करण्याच्या आणि सॅनिटायझरची व्यवस्था...
Read More