Author: Ramchandra Bari

‘हिरा एक्झीक्युटीव्ह’ हॉटेल कोरोना योध्यांसाठी नि:शुल्क

नंदुरबार (प्रतिनिधी) :- कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिश्रम करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, स्थलांतरीत अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी या योध्यांसाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथील ५० रुम्सची व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी या संदर्भातील संमती पत्र प्रशासनाला दिले आहे. संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातला आहे. भारतातही या विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण वाढत आहे. अश्या परिस्तिथीत पोलीस, डॉक्टर, नर्सेससाठी अहोरात्र काम करत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांसाठी स्वतःच्या घराबाहेर राहत आहेत. थोडासा विसावा घ्यायचा तर कुठे घ्यावा ? हा प्रश्न नित्याचाच झाला आहे. अश्या परिस्थितीत अनेक दानशूर व्यक्ती काही न काही योगदान देतांना दिसत आहेत.माजी आमदार शिरीष चौधरी यांनी यापूर्वी अमळनेर येथील त्यांचे निवासस्थान होमक्वारंटाईन व्यक्तींसाठी प्रशासनाला उपलब्ध करून दिले आहे. आता नंदुरबार येथील त्यांच्या मालकीचे हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथे अधिकारी-कर्मचाऱ्याना भोजनाची सेवा करण्याची देखील त्यांनी तयारी दर्शविली आहे. जिल्ह्यात विविध स्तरातून प्रशासनाला मिळत असलेल्या सहयोगाबाबत समाधान व्यक्त करत, कोविड-१९ संदर्भातील उपाययोजना करताना आपण प्रशासनासोबत असल्याचे चौधरी यांनी यावेळी...

Read More

शासनातर्फे मोफत तांदळाचे वितरण सुरू जिल्ह्यात साडेपाच हजार क्विंटल तांदळाचे मोफत वाटप

नंदुरबार (प्रतिनिधी) -‍  प्रधान मंत्री गरीब कल्याण येाजनेअंतर्गत दोन दिवसात जिल्ह्यातील 22 हजार 305 कार्डधारकांना 5461 क्विंटल मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. तर सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत आतापर्यंत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील 2 लाख 28 हजार 141 कार्डधारकांना 56 हजार 193 क्विंटल धान्य वाटप करण्यात आले आहे. शिधापत्रिकेवर नमूद दोन्ही येाजनेतील सुमारे 11 लाख 25 हजार नागरिकांना 5 किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना वेळेवर धान्य वितरण करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नियोजन करण्यात  आले आहे. जिल्ह्याला नियमित वितरणासाठी एकूण गव्हाचे 26 हजार 840 क्विंटल आणि तांदुळाचे 37 हजार 820  क्विंटल नियतन प्राप्त झाले आहे. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 57 हजार 10 क्विटल तांदळाचे नियतन प्राप्त झाले आहे. ई-पॉस मशिनने धान्य वितरीत करताना दुकानदाराला स्वत:चे बायोमेट्रीक उपयोगात आणून वितरण करण्याची अनुमती देण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यास 15 किलो गहू 2 रुपये प्रति किलो दराने व  20 किलो तांदूळ 3 रुपये प्रति किलो दराने दिला जातो. तर 20 रुपये दराने एक किलो साखर देण्यात येते. प्रधान्य कुटुंबातील लाभार्थ्यास 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ देण्यात येतो.  अक्कलकुवा तालुक्यातील 34 हजार 294 शिधापत्रिका धारकांना ( 8446 क्विंटल), अक्राणी 20 हजार 281 (5150 क्विंटल),  नंदुरबार 56 हजार (13640 क्विंटल), नवापूर 42 हजार 554 (10340 क्विंटल), शहादा 49 हजार 950 (12267 क्विंटल) आणि  तळोदा तालुक्यातील 25 हजार 62 कार्डधारकांना 6350 क्विंटल धान्याचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 87 टक्के...

Read More

वाळुच्या डंपरमध्ये विमल गुटख्याची वाहतुक चौघे ताव्यात , ३४ लाखाचा गुटखा जप्त

नंदुरबार :- गुजरात राज्यातून महाराष्ट्रात आणलेला सुमारे 34 लाख रुपयांचा गुटखा नंदुरबार पोलिसांनी हस्तगत केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी सुरू केलेल्या “ऑपरेशन वॉश आउट” चे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून, पोलिसांनी ही कार्यवाही सुरू केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे .सध्या संपुर्ण जगभरासह भारतात थैमान घातलेल्या कोराणा विषाणुचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने संपुर्ण भारतात लॉकडाऊन घोषीत केलेले आहे . नंदुरबार जिल्हात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून खबरदारीच्या सर्व उपाय योजना राज्य शासन युध्द पातळीवर करीत आहे. यातच महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा गुजरात राज्यातुन नंदुरबार जिल्ह्यात आणुन लॉकडाऊनचा फायदा घेवुन त्याची जास्त दरात विक्री होत होता. त्यानुसार आज दिनांक १६ एप्रिल २०२० रोजी गुजरात राज्यातुन निझरमार्गे नंदुरबार येथे मोठया प्रमाणात विमल गुटखा वाहतुक होणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दिनांक १५ रोजी रात्री ११ वाजेपासुन निझर रोडवर मन्सुरी टेन्ट हाऊसजवळ सापळा लावला. आज दि . १६ रोजी सुमारे पहाटे ०१ . ३० वाजेच्या सुमारास निझर गावाकडुन एक हायवा डंपर नंदुरबारच्या दिशेने येताना दिसला. म्हणुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी बॅटरीच्या सहाय्याने वाहनास उभे करण्याचा इशारा दिला असता संशयीत वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघुन गेला , म्हणुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची खात्री झाल्याने सदर वाहनाचा पाठलाग करुन शिताफीने वाहनाला थांबवुन डंपरमध्ये चालक व सोबत ३ इसम बसलेले दिसले. त्यात आकेश काशिनाथ नाईक वय – २४, २ ) मनिष...

Read More

ज्ञानदेव राजपूत यांनी पीएम फंडासाठी केले २१ हजारचे सहाय्य

नंदुरबार (प्रतिनिधी) -येथील पालिकेचे निवृत्त आरोग्य निरीक्षक तथा िनवृत्त प्रभारी जकात अधिक्षक ज्ञानदेव जयसिंग राजपूत यांनी पंतप्रधान सहाय्य निधीत २१ हजार रूपयांचा धनादेश देऊन आर्थिक सहाय्य केले.राजपूत हे १९९८ रोजी पालिकेतून निवृत्त झाले आहेत. कोरोनाशी मुकाबला करतांना राज्य व केंद्र शासनाकडे निधींची कमतरता आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी देण्याचे आवाहन केले हाेते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्ञानदेव राजपूत यांनी २१ हजाराचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपुर्द केला. जिल्हाधिकारी डॉ भारूड यांनी  राजपूत यांचे आभार मानले.देशाने आपल्यावर खूप उपकार केलेत, एक कृतज्ञता म्हणून निधी देत आहे, असे राजपूत यांनी सांगितले.मुख्यमंत्री सहाय्ता निधी व पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते पुढे येत...

Read More

महाराष्ट्र दिनाबाबत शासनाचे निर्देश

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन साजरा करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, त्यासाठी शासनाने नियमावली बनवली आहे. १ मे २०२० रोजी आपल्या राज्याच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु कोरोनाचे थैमान आणि ३ मे पर्यंत असलेला लॉकडाऊन यामुळे महाराष्ट्र दिन कसा साजरा होणार या बाबत संभ्रमावस्था होती. परंतु राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रसिध्द केलेल्या शासन निर्णयाने त्यामध्ये सुस्पष्टता आली आहे. या शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेला दिनांक १ मे, २०२० रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी, यावर्षी राज्यात ” महाराष्ट्र दिन ” हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने काही निर्देश देण्यात आले आहेत.१. राज्यातील मंत्रालय व सर्व जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालये या ठिकाणी एकाच वेळी सकाळी ८.०० वा. फक्त ध्वजारोहण करण्यात यावे.२. या ठिकाणी केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद एवढयाच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे.३. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये.४. कवायतीचे आयोजन करण्यात येवू नये.५. विधीमंडळ, मा.उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे.६. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे.असे निर्देश देण्यात आले आहेत. या शासन निर्णयात शाळांमध्ये साजरा होणारे झेंडावंदन या बाबत मात्र कुठलाही स्पष्ट उल्लेख...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!