Author: Ramchandra Bari

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती 30 एप्रिलपर्यंत भरण्याचे आवाहन

नंदुरबार : सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व आस्थापना तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना (ज्यांच्याकडे 25 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी ) कार्यरत आहेत अशा  उद्योग आस्थापना, व्यापार, व्यावसायिक, कारखाने इत्यादी यांनी त्यांच्याकडील कार्यरत  मुनष्यबळाची त्रैमासिक माहिती 30 एप्रिल 2020 पर्यंत विभागाचा www.mahaswayam.gov.in  संस्केतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रा. म. कोल्हे यांनी केले. जानेवारी ते मार्च या कालावाधीचे आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र इ-आर-1 या विभागाचा संस्केतस्थळावरील रोजगार या ऑप्शनमधील नियुक्तेवर क्लिक करुन युजर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने अंतिम दिनांक 30 एप्रिल 2020 पर्यंत भरावयाची आहे . या बाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक 02564/210026 वर संर्पक साधावा आणि रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणारा कायदा 1959 नियमावली 1960 च्या अधिनियमातील तरतुदीचे पालन करावे, असेही श्री. कोल्हे यांनी कळविले...

Read More

आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र आदिवासींना मदत करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

नंदुरबार : आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. के सी पाडवी यांनी  केंद्रीय आदिवासी  कार्य मंत्री  अर्जुन मुंडा  यांना पत्र लिहून कोविड -19 विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या या आव्हानात्मक काळात आदिवासी जमातींना तातडीने दिलासा मिळावा यासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. केंद्र शासनाकडून 2020-21 या आर्थिक वर्षासाठी कलम 275(1) आणि विशेष केंद्रीय अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत मिळणारा 1000 कोटींचा निधी राज्यांना लॉकडाऊनमुळे बाधित झालेल्या आदिवासींसाठी योजना राबविण्यासाठी उपलब्ध करून द्यावा.  राज्यात सध्या सुरू असलेल्या किंवा सुरू करावयाच्या कलम 275(1) आणि विशेष केंद्रीय अर्थसहाय्य अंतर्गत योजनांचा आढावा घेऊन आदिवासींची उपजिवीका आणि अन्न सुरक्षा  संबंधित मदतकार्यांसाठी राज्यातील अखर्चित रक्कम  पुनर्नियोजन करून  वापरण्यासाठी  परवानगी देण्यात यावी. गरजूंना तातडीने मदत करण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत आवश्यक बाबी पोहोचविण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. आदिम जमाती आणि  पारधीसारख्या सामाजिकरित्या अत्यंत मागासलेल्या जमाती शिधापत्रिकेसाठी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. अशा जमातीतील नागरिकांना  कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांशिवाय रेशनकार्ड  देण्याबाबत केंद्र सरकारने दिशानिर्देश द्यावेत. यातील बहूतेक स्थलांतरीत मजूर असून त्यांना शिधापत्रिका दिल्यास सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे त्यांना अन्नधान्य उपलब्ध होऊ शकेल. आदिम  आणि  पारधी जमातीला अंत्योदय येाजनेअंतर्गत शिधापत्रिका देण्यात याव्यात.   रेशनकार्डसाठी अर्ज प्रलंबित असलेल्या सर्व  आदिवासी अर्जदारांनाही या वेळी अन्न सुरक्षेअंतर्गत धान्याचा लाभ देण्याची आवश्यकता आहे. तसेच यासाठी भारत सरकारने पुरेसे अन्नधान्य  देणे आवश्यक आहे.  आदिवासी कार्य मंत्रालयाने संबंधित मंत्रालयाच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी. भारत सरकारचे सध्याच्या परिस्थितीत  गौण वन उपज योजनेसाठी आधारभूत किमतीच्या व्यापक उपयोगाचे धोरण असून  त्याकरिता मात्र विशेष...

Read More

महाराष्ट्र दिन साधेपणाने आयोजित होणार

नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र दिन हा 1 मे 2020 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे अत्यंत साधेपनाने आयोजित करण्यात येणार आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार या दिवशी फक्त जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार या ठिकाणी वर्धापन दिन समारंभ करण्यात येणार असल्याने इतर कुठल्याही कार्यालयात  महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये.  कार्यक्रमाच्या ठिकाणी केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी असे निवडक अधिकारी उपस्थित राहतील, असे उपजिल्हाधिकारी कैलास कडलग यांनी कळविले...

Read More

कोरोना बाधित मयतावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार

नंदुरबार :- जिल्ह्यातील शहादा येथील कोरोना संसर्ग झालेल्या इसमाचा बुधवारी रात्री नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. शासनाच्या परिपत्रकानुसार मयतावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.बुधवारी रात्री साडेदहा वाजता बाधित रुग्ण मयत झाल्याबद्दल माहिती येथील स्थानिक प्रशासनास प्राप्त झाली. माहिती मिळाल्यानंतर एका रुग्णवाहिकेद्वारे मयत रुग्णाचे तीन नातेवाईक पीपी किट आणि अन्य आवश्यक उपाययोजनेसह नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्यविधीबाबत असलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार तहसीलदार नंदुरबार, पोलीस निरीक्षक नंदुरबार आणि अन्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच अंत्यविधीसाठी आणलेल्या नातेवाईकांना त्याच रुग्णवाहिकेने परत पाठवण्यात आले. तोपर्यंत शहादा येथील प्रांत अधिकारी डॉ.चेतन गिरासे, पोलीस उपअधीक्षक पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, मुख्याधिकारी राहुल वाघ आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, नंदुरबार येथील अधिकार्‍यांच्या संपर्कात होते.शहाद्यात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर चिंतेचे वातावरण पसरले असतांना बाधित 31 वर्षीय इसमाचा बुधवारी मृत्यू झाल्याने शहादेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. शहादा येथ बंदच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत घरातच राहणे पसंत केले. प्रशासनातर्फे नागरिकांना खबरदारीचे उपाय म्हणून घरात राहण्यासंदर्भात वारंवार ध्वनीक्षेपकाद्वारे सुचना देण्यात येत...

Read More

अक्कलकुवा व शहादा येथील तीन व्यक्तींना संसर्ग प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू

नंदुरबार दि.22 : अक्कलकुवा येथील 32 वर्षीय महिला आणि शहादा येथील 45 वर्षीय महिला व 32 वर्षीय युवकाला कोविड-19 चा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने दोन्ही शहरात प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारीच्या उपाययोना सुरू करण्यात आल्या असून संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे.जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. साधारण 170 गावांना लागून वेगवेगळ्याजिल्ह्यांच्या सीमा आहेत. त्यामुळे कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी इतरांना स्पर्श न करणे, वारंवार साबणाने हात धुणे, बाहेरून आल्यावर कपडे स्वच्छ धुणे, दोन व्यक्तीत किमान सहा फुटाचे अंतर ठेवणे आदी उपाययोजनांवर भर द्यावा. प्रशानाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. शहादा शहरातील भाग क्र. 7 परिसर प्रतिबंधीत क्षेत्र शहादा उपविभागीय दंडाधिकारी चेतन गिरासे यांनी भाग क्र. 7 मधील जनता चौक, बागवान गल्ली, इकबाल चौक, क्रांती चौक, पिंजार गल्ली, दातार चौक, गुजर गल्ली, मेन रोड, तुप बाजार, जवाई पुरा, भावसार गढी, सोनार गल्ली, साळी गल्ली, जुना प्रकाशा रोड, न. पा. दवाखाना हॉस्पीटल, गांधी नगर, भाजी मार्केट, बस स्टॉप परिसर, शास्त्री मार्केट, तुलसी मार्ग, अंबाजी मंदीर परिसर, हाजी इसहाक मेमन मिल कंपाऊंड परिसर, काका का ढाबा परिसर, आंबेडकर चौक, चांभारवाडा परिसर, पाणी टाकी चार रस्ता, नगरपालिका परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या क्षेत्रीच्या उत्तरेकडील बसस्थानकापासून ते चावडी चौकापर्यंत, पश्चिमेकडील चावडीचौकीपासून ते जुना प्रकाशा रस्त्यापर्यंत व तेथून न.पा. दवाखान्यापर्यंत, दक्षिणेकडून न. पा. दवाखान्यापासून ते व्हॉलंटरी शाळेलगत भाजी मार्केट पावेतो व पुर्वेकडील भाजीमार्केट पासून ते बसस्थानकापर्यंत...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!