Author: Ramchandra Bari

कोरोना बाधित मयतावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार

नंदुरबार :- जिल्ह्यातील शहादा येथील कोरोना संसर्ग झालेल्या इसमाचा बुधवारी रात्री नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. शासनाच्या परिपत्रकानुसार मयतावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.बुधवारी रात्री साडेदहा वाजता बाधित रुग्ण मयत झाल्याबद्दल माहिती येथील स्थानिक प्रशासनास प्राप्त झाली. माहिती मिळाल्यानंतर एका रुग्णवाहिकेद्वारे मयत रुग्णाचे तीन नातेवाईक पीपी किट आणि अन्य आवश्यक उपाययोजनेसह नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्यविधीबाबत असलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार तहसीलदार नंदुरबार, पोलीस निरीक्षक नंदुरबार आणि अन्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच अंत्यविधीसाठी आणलेल्या नातेवाईकांना त्याच रुग्णवाहिकेने परत पाठवण्यात आले. तोपर्यंत शहादा येथील प्रांत अधिकारी डॉ.चेतन गिरासे, पोलीस उपअधीक्षक पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, मुख्याधिकारी राहुल वाघ आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, नंदुरबार येथील अधिकार्‍यांच्या संपर्कात होते.शहाद्यात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर चिंतेचे वातावरण पसरले असतांना बाधित 31 वर्षीय इसमाचा बुधवारी मृत्यू झाल्याने शहादेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. शहादा येथ बंदच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत घरातच राहणे पसंत केले. प्रशासनातर्फे नागरिकांना खबरदारीचे उपाय म्हणून घरात राहण्यासंदर्भात वारंवार ध्वनीक्षेपकाद्वारे सुचना देण्यात येत...

Read More

अक्कलकुवा व शहादा येथील तीन व्यक्तींना संसर्ग प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू

नंदुरबार दि.22 : अक्कलकुवा येथील 32 वर्षीय महिला आणि शहादा येथील 45 वर्षीय महिला व 32 वर्षीय युवकाला कोविड-19 चा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने दोन्ही शहरात प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारीच्या उपाययोना सुरू करण्यात आल्या असून संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे.जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. साधारण 170 गावांना लागून वेगवेगळ्याजिल्ह्यांच्या सीमा आहेत. त्यामुळे कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी इतरांना स्पर्श न करणे, वारंवार साबणाने हात धुणे, बाहेरून आल्यावर कपडे स्वच्छ धुणे, दोन व्यक्तीत किमान सहा फुटाचे अंतर ठेवणे आदी उपाययोजनांवर भर द्यावा. प्रशानाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. शहादा शहरातील भाग क्र. 7 परिसर प्रतिबंधीत क्षेत्र शहादा उपविभागीय दंडाधिकारी चेतन गिरासे यांनी भाग क्र. 7 मधील जनता चौक, बागवान गल्ली, इकबाल चौक, क्रांती चौक, पिंजार गल्ली, दातार चौक, गुजर गल्ली, मेन रोड, तुप बाजार, जवाई पुरा, भावसार गढी, सोनार गल्ली, साळी गल्ली, जुना प्रकाशा रोड, न. पा. दवाखाना हॉस्पीटल, गांधी नगर, भाजी मार्केट, बस स्टॉप परिसर, शास्त्री मार्केट, तुलसी मार्ग, अंबाजी मंदीर परिसर, हाजी इसहाक मेमन मिल कंपाऊंड परिसर, काका का ढाबा परिसर, आंबेडकर चौक, चांभारवाडा परिसर, पाणी टाकी चार रस्ता, नगरपालिका परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या क्षेत्रीच्या उत्तरेकडील बसस्थानकापासून ते चावडी चौकापर्यंत, पश्चिमेकडील चावडीचौकीपासून ते जुना प्रकाशा रस्त्यापर्यंत व तेथून न.पा. दवाखान्यापर्यंत, दक्षिणेकडून न. पा. दवाखान्यापासून ते व्हॉलंटरी शाळेलगत भाजी मार्केट पावेतो व पुर्वेकडील भाजीमार्केट पासून ते बसस्थानकापर्यंत...

Read More

कोरोनाबाधिताच्या कुटूंबातील तिघांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’

नंदुरबार (जिमाका) : शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील इतर तीन व्यक्तींना संसर्ग झाला असून त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तिघा व्यक्तींमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नसून (असिम्प्टमॅटीक) त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे. तिघांपैकी एक 65 वर्षाची महिला, 15 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा तरुण आहे. या तिन्ही व्यक्तींना यापूर्वीच क्वॉनंटाईन करून आवश्यक उपचार सुरू करण्यात आले होते. आज आलेल्या अहवालापैकी 11 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्ण रहात असलेला भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात साधारण साडेनऊशे कुटुंब असून 4632 नागरिक रहातात. या क्षेत्राला 18 उपक्षेत्रात विभागण्यात आले असून प्रत्येक विभागासाठी ए पथक कार्यरत करण्यात आले आहे. प्रत्येक उपक्षेत्रात नगर पालिका कर्मचारी किंवा शिक्षकांच्या नेतृत्वाखाली दोन स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक  सकाळी 8 ते 10 या वेळेत येथील रहिवाशांकडून आवश्यक वस्तूंची माहिती घेईल आणि सायंकाळी 5 ते 7 च्या दरम्यान या वस्तू घरपोच पोहोचविण्यात येतील. दूधाचे वितरण घरोघरी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बँकेतून पैसे काढण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे सहकार्य घेण्यात येत आहे. प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी घाबरून जावू नये आणि कोणत्याही कामासाठी बाहेर पडू नये. त्यांना समस्या असल्यास मंडळ अधिकारी झेड.एम. पठाण यांना 9145202205  या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले...

Read More

कोरोना मदत निधीसाठी खापर ग्रामस्थांकडून 55 हजार

अक्कलकुवा (प्रतिनिधि) :- तालुक्यातील खापर ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री सहायता निधि मध्ये ५५,५५५ रु मदत म्हणून देण्यात आले आहेत. जगभरासह देशात व राज्यात कोरोना विषाणूचा पादुर्भाव वाढला आहे. या विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राबरोबरच राज्य शासनाद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्याअनुषंगाने अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ग्रामस्थांना मुख्यमंत्री सहायता निधिसाठी सोशल मिडिया व्हाट्सएप्प व फेसबुकच्या माध्यमानतुन निधि संकलनासाठी माजी उपसरपंच ललित जाट व लक्ष्मण वाडिले यांनी आवाहन केले होते. यावेळी खापर गावातील सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, जेष्ठ, युवक व महिलांनी सकारत्मक प्रतिसाद देत मोलाच्या हातभार लावला व आपल्या यथाशक्ति निधि संकलन करण्यात आली. ग्रामस्थान कडून एकूण ५७,९१५रु एवढी निधि जमा झाली होती. त्यातून ५५,५५५रु (पंचवान हजार पाचशे पंचवान रूपये) मुख्यमंत्री सहायता निधि मध्ये आरटीजीएस च्या माध्यमाने देण्यात आली. तसेच उर्वरित रक्कम २३६०रु खापर येथील विलगिकरण केंद्रातील लोकांच्या जेवणाच्या व्यवस्थेत मदत करण्यात आली आहे.ग्रामस्थांनी केलेल्या या निधी संकलनाबाबत निवासी नायब जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या कड़े मुख्यमंत्री सहायता निधिची व दात्यांची संपूर्ण माहिती सोपवण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच ललीत जाट, लक्ष्मण वाडिले, अक्षय सोनार आदि उपस्थित...

Read More

नंदुरबारकरांसाठी शुभवार्ता 21 संशयित व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह

नंदुरबार – कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या 21 संशयित व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यापैकी 4 व्यक्ती कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील आहेत, या सर्व व्यक्तींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्याचे वृत्त संस्थांनी प्रसिद्धीस दिले आहे.नंदुरबार येथून एकूण 35 संशयित व्यतींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 21 निगेटीव्ह आले आहेत. निगेटीव्ह रुग्णापैकी जिल्ह्यातील वडफळी आणि अंबाबारी येथील 7 व्यक्ती असून, नंदुरबार शहरातील अलीसाहाब मोहल्ला भागातील इतर दोन व कोरोना बाधिताने तपासणी केलेल्या खाजगी रुग्णालयातील तीन व्यक्तींचा यात समावेश आहे. 14 संशयित व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. संशयित रुग्णांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून, त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी होत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णावर निर्धारीध पद्धतीनुसार उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. प्रशासनातर्फे शहरातील प्रभाग क्र.10 सील करण्यात आला असून, या भागात दिवसातून पाचवेळा फवारणी करण्यात आली आहे.कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून, शहरातील सर्व व्यवहार तीन दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहेत. मात्र भाजीपाला, फळे विक्रीवर 20 तारखेपर्यंत बंदी राहणार आहे. 20 एप्रिलनंतर काही निर्बंध शिथिल होणार असले तरी कंटेंटमेंट झोनमधील कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाण्याची अनुमती असणार नाही, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले असल्याचे वृत्त संस्थांनी म्हटले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!