Author: Ramchandra Bari

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

नंदुरबार : अक्कलकुवा येथील आणखी एक व्यक्तीचा स्वॅब अहवाल कोवडि-19 पॉझिटीव्ह आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. डॉ.भारुड यांनी अंबाबारी चेकनाक्यालाही भेट दिली आणि अक्कलकुवा येथील प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली. त्यांनी नवोदय विद्यालय येथे क्वॉरंटाईन केंद्राचीदेखील पाहणी केली. त्यांच्यासमवेत अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, उपविभागीय अधिकारी अविश्यांत पंडा, उपजिल्हाधिकारी महेश सुधळकर आणि तहसीलदार  विजय कच्छवे होते. डॉ.भारुड यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे राबविण्याच्या सुचना दिल्या. ते म्हणाले, जिल्ह्याच्या सीमेबाहेरील व्यक्तीला कोणत्याही प्रकारे प्रवेश देऊ नये. वैद्यकीय कारणासाठी जिल्ह्याच्या सीमेत येणाऱ्या व्यक्तीला क्वॉरंटाईन करण्यात यावे. प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व सेवा घरपोच मिळतील याचे निट नियोजन करावे. प्रतिबंधीत क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती बाहेर जाणार नाही व बाहेरील व्यक्ती आत येणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. कोविड-19 बाधीत व्यक्तीची संपर्क साखळी त्वरीत शोधून त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना त्वरीत क्वॉरंटाईन करण्यात यावे व त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. क्वॉरंटाईन केंद्रात आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक दक्षता घेण्यात याव्यात. नागरिकांना जीवनावश्यक धान्य व जीवनावश्यक व्सतू मिळण्यात कोणताही त्रास होणार नाही आणि वैद्यकीय सुविधा तात्काळ मिळतील याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी...

Read More

व्हीएसटीएफ आणि प्लॅन इंडियातर्फे पीपीई किट्सची मदत

नंदुरबार : कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांसाठी पोषण इंडिया कार्यक्रमांतर्गत व्हीएसटीएफ आणि प्लॅन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पीपीई किट्स आणि इतर साहित्य जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी प्रातिनिधीक स्वरुपात हे साहित्य स्विकारले. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. साहित्यात 250 पीपीई किट्स, 250 एन-95 मास्क, 3000 ट्रीपल लेयर मास्क, अल्कोहल हँड रब (500 मिली) 500, अल्कोहल हँड रब (100 मिली) 500,  1 लाख साबण, 5 थर्मल स्कॅनर आदींचा समावेश आहे. कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या साहित्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने चांगली मदत होईल, असा विश्वास डॉ.भारुड यांनी यावेळी व्यक्त...

Read More

संपर्क साखळीतील व्यक्तींच्या वैद्यकीय तपाणीवर भर द्या-खासदार हिना गावीत

नंदुरबार : कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून जास्त जोखिमीच्या व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात यावेत, असे प्रतिपादन खासदार डॉ.हिना गावीत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. श्रीमती गावीत म्हणाल्या, राज्य सीमेवर नाकाबंदी अधिक कडक करण्यात यावी. बाहेरील जिल्ह्यातील नागरीक येणार नाही याची दक्षता घ्यावी. बाहेरच्या राज्यातून आलेल्या जिल्ह्यातील मजूरांना क्वॉरंटाईन करण्यात यावे. आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्यात येऊन त्यांना आवश्यक सुरक्षा साधने देण्यात यावीत. बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देण्यात यावे. बँकेतने गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धती सुरू करावी,  असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात 5 व्हेंटीलेटर असून आणखी 10 व्हेंटीलेटर लवकरच उपलब्ध होतील. सॅनिटायझार आणि एन-95 मास्क पुरेशा प्रमाणात आहेत. कोविड-19 बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.  मनरेगाच्या माध्यमातून 282 ग्रामपंचायतींनी कामे सुरू केली असून 8 हजार मजूर कामावर आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांच्या रोजगारावर प्रभाव पडू नये यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. गतवर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट 40 टक्के पूर्ण झाले असताना यावर्षी विशेष मोहिमेच्या माध्यामातून ते 80 ते 90 टक्क्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मोहिमेअंतर्गत्‍ एकही वेळेस कर्ज न घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रस्त्यांच्या व रुग्णालय दुरुस्तीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक...

Read More

57 हजार नागरिकांनी डाऊनलोड केले ‘आरोग्य सेतू’

नंदुरबार : कोविड-19 च्या संसर्ग ओळखण्यासाठी व त्यापासून बचावासाठी तयार करण्यात आलेले ‘आरोग्य सेतू’ ॲप  जिल्ह्यातील 57 हजार 627 नागरिकांनी डाऊनलोड केले आहे. केंद्र सरकारने हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. या ॲपवर आपली माहिती भरल्यास गर्दीच्या ठिकाणी कोरोनाची लक्षणे असलेली व्यक्ती असल्यास ॲपद्वारे पूर्वसुचना मिळू शकते. त्यासोबत कोरोनापासून बचाव कसा करावा याची माहितीदेखील या ॲपवर देण्यात आली आहे. नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत या अॅपचा वापर करणे आवश्यक आहे. विशेषत: बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांनी ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. कोरोना बाधिकताची संपर्क साखळी ओळखण्यासाठीदेखील या ॲपचा उपयोग होणार असल्याने नागरिकांनी ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले...

Read More

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात तरुणाईचा प्रतिसाद ‘ॲण्टी कोविड फोर्स’साठी 3 हजारावर नोंदणी

नंदुरबार : कोविड-19 विरुद्धच्या लढ्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तरुणाईने ‘जोश-ए-वतन बढाए जा’ या भावनेने मोठ्या प्रमाणत ‘ॲण्टी कोविड फोर्स’साठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. सोबत एनसीसी विद्यार्थी, शिक्षक आणि नेहरु युवा केंद्राच्या सदस्यांनीदेखील यात सहभाग घेतला आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादीत असल्याने सुरक्षेवर बराच ताण पडतो. शिवाय या संकटाच्या काळात अनेक ठिकाणी मदतीसाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी एसीएफची संकल्पना राबविण्याचे ‍निश्चित केले. त्याला नेहरु युवा केंद्र आणि शिक्षकांकडून तात्काळ प्रतिसाददेखील मिळाला. एनवायकेचे 183 सदस्य, 161 शिक्षक आणि एनसीसीच्या 61 विद्यार्थ्यांनी एसीएफमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली. गावपातळीवरदेखील मनुष्यबळची आवश्यकता असल्याने तिथल्या युवकांना सहभागी करून घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा करून देण्यात आली. नोंदणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी फेसबुक संवादाद्वारे केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 2 हजार 847 स्वयंसेकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यात सर्वाधिक 1154 नंदुरबार, 786 शहादा, 368 नवापूर, 301 तळोदा, 167 अक्कलकुवा आणि 71 व्यक्तीं तळोदा तालुक्यातील आहेत. यातील बहुतेक 20 ते 30 वयोगटातील तरुण आहेत. पोलीसांना मदतीसाठी 1498, क्वॉरंटाईन केंद्राची देखरेख 48, निवारा केंद्र 52, स्वच्छता कार्य 88,  नगरपालिकेला सहकार्य 82 आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासाठी 341 स्वयंसेवकांनी तयारी दर्शविली आहे. फेसबुकच्या माध्यमातूनदेखील अनेक तरुणांनी आपले मोबाईल क्रमांक देऊन सहकार्याची तयारी दर्शविली आहे. देशभक्तीच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन आपण काही वाटा उचलू इच्छितो अशा आशयाच्या प्रतिक्रीया युवकांनी दिल्या आहेत. काहींनी वाहन सुविधा, जीवनावश्यक वस्तू देण्याची तयारी दर्शविली आहे. तर लॉकडाऊनमुळे गावाकडे आलेल्या सुरक्षा रक्षकांनीदेखील यात सहभाग घेण्याचे मान्य केले आहे....

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!