Author: Ramchandra Bari

गुटखा, सिगारेट विक्रेत्यांची चंगळ चार पट भावात विक्री – जनतेची लूट

नंदुरबार (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला धुडकावत जिल्हाभरात गुटखा तंबाखू व सिगरेटची तब्बल चार ते पाच पट दराने विक्री होत असल्याने सामान्य जनतेच्या व्यसनापोटी प्रचंड लूट होत असल्याचे दिसत असून, याप्रकरणी संबंधित विभागाने दूर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात सर्व पण तंबाखू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे टपऱ्या सील करण्यात आल्या. मात्र, यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेली काही तरूण मंडळी गुटखा, बार, तंबाखू, सिगारेटसाठी आतूर झालेली पहायला मिळाले. त्यामुळे गैरफायदा घेण्यात पटाईत असलेल्या काही गुटखा किंग मंडळी अव्वाच्या सव्वा भावात गुटखा व तंबाखू विक्री करतांना दिसत आहेत. काही व्यवसायीक तर चक्क व्हाॅटसपवर यादी मागवून पानपट्टी माल म्हणजे गुटखा पुड्या, तंबाखू पुड्या व सिगारेट थेट घरी पोहच करत असल्याचे बोलले जात आहे. काही किराणा दुकानदार व्हि.आय.पी. ग्राहकालाच गुटखा विक्री करत आहेत. या साऱ्या प्रकारामुळे कोरोना विषाणूचे गांभीर्य कुणालाही नसल्याचे प्रदर्शित होत असून, व्यवसायीकांनी मात्र चंगळ करून घेतली आहे.काही तरूण मुले लॉकडाऊनच्या काळात चौका चौकात गुटखा, तंबाखू, सिगारेट विक्री करतांना दिसत आहेत. 3 तारखेला दुकाने उघडल्यानंतरही पण सिगारेटची दुकाने उघडतील अशी शक्यता नाही. त्यामूळे ही बेकायदा गुटखा तंबाखू विक्री कोणत्या स्तरावर पोचेल, हे सांगणे कठीण आहे. याप्रकरणी एफ.डि.ए. विभागाने लक्ष घालणे गरजेचे असून, कारवाई होणे महत्वाचे...

Read More

विनाकारण फिरणाऱ्या चौघांना दोन हजार रुपये दंडाची शिक्षा

नंदुरबार; (प्रतिनिधी) :- येथील उपनगर पोलीस ठाणे परीसरात कोरोना लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणान्या ४ इसमांना न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचे आदेश पारीत केले असतांना, या काळात दि . १४ / ०४ / २०२० रोजी संध्याकाळी ०७ . ०० वाजता नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस ठाणे हद्यीतील मिशन हायस्कुल ते सिंधी कॉलनी दरम्यान सायंकाळी फिरणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत विनाकारण शहरात फिरणारे मनोज अशोक गायकवाड वय – ५३, सुधीर डेव्हीड साने, वय – ४४, राकेश शलमोन पंजाबी वय – ४०, भिवसन अशोक नाईक वय – ४० सर्व रा . बेथेल कॉलनी नंदुरबार ता . जि . नंदुरबार असे सर्व जण जाणीवपुर्वक मनाई प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करत नाकातोंडावर कोणतेही मास्क तोंड झाकणेसाठी न लावता विनाकारण रस्त्यावर फिरतांना मिळुन आले होते. म्हणुन त्याच्याविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात भा . द . वि . कलम २६८ , २६९ , २९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्यांना मा . श्रीमती एस . ए . विराणी, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नंदुरबार यांचे कोर्टात हजर केल्याने प्रत्येकी रुपये २००० / – दंड तसेच दंड न भरल्यास ५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा दिली आहे. नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि तपास अधिकारी सपोनि धनराज निळे यांचे पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत व अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत गवळी यांनी अभिनंदन केले...

Read More

जिल्हा परिषदेतर्फे कोविड १९ बाबत स्वच्छाग्रहींना ऑनलाईन प्रशिक्षण

नंदुरबार (प्रतिनिधी ) :- कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील ग्रामपातळीवर काम करीत असलेल्या स्वच्छाग्रही व इतर स्वयंसेवकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले . प्रशिक्षणात एकूण 988 स्वच्छाग्रहीनी सहभाग नोंदवला.राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू आहे. त्याच अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) अंतर्गत कार्यरत असलेले स्वच्छाग्रही तसेच इतर ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आले.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा तसेच इतर विभाग प्रमुख व जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून विविध उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविले जात आहेत.कोरोना विरुद्धच्या या लढाईत ग्रामपंचायत स्तरावर पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, पंचायत समितीचे सर्व गटविकास अधिकारी, जिल्हा व तालुका कक्षातील कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताग्रही सक्रिय झालेले असून, त्यांचेमार्फत ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामस्तरावर कोरोनाबाबत जाणीव जागृती केली जात आहे. ग्रामपातळीवर काम करीत असलेल्या स्वच्छाग्रही, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक व इतर स्वयंसेवकांना कोविड 19 याविषयी अधिकची माहिती मिळावी व या स्वयंसेवकांचा ग्रामपातळीवर सहभाग आणखी वाढावा, या उद्देशाने त्यांच्यासाठी आज दिनांक २ मे 2020 रोजी ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्यावतीने कोविड 19 या विषयी आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणाचा अनरद तालुका शहादा जिल्हा नंदूरबार येथे...

Read More

रघुवंशी परिवारातर्फे पीपीई किटचे वाटप

नंदुरबार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात घालून जनसेवा करणाऱ्या यंत्रणेसाठी येथील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या परिवारातर्फे पीपीई किटचे वाटप करण्यात आले.शहरातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, नंदुरबार नगरपरिषदेचे अधिकारी, सफाई कामगार हे अत्यंत युध्द पातळीवर कोविङ – 19 या महाभयंकर रोगाशी आपला जिव धोक्यात टाकुण जिल्हयाच्या व शहराच्या जनतेला वाचविण्याच्या प्रयत्न करत आहेत. त्यांच्याही सरंक्षणाची व सर्वतोपरी सहकार्याची भूमिका जनतेने व सर्व लोकप्रतिनीधींनीसुध्दा घेतलीच पाहिजे. किंबहूना ते आपले कर्तव्यच आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालय हेसुध्दा कोविड – 19 या आजारावर यशस्वीपणे काम करत आहे आणि तेथील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांचे कोविड – 19 आजारापासुन सरंक्षण होण्यास मदत व्हावी म्हणून माजी आमंदार चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबारच्या नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी, नंदुरबार नगरपरिषदेचे नगरसेवक किरण रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी व रघुवंशी परिवाराच्या वतीने जिल्हा रुग्णालयाला चांगल्या प्रतीचे धुवुन परत वापरता येतील ( वॉशेबल ) असे 50 PPE किट आज 1 में महाराष्ट्र दिनी भेट देण्यात आले. तसेच धुळे येथिल भाऊसाहेब हिरे वैद्यकिय महाविद्यालय येथे सुध्दा 50 PPE किट देण्यात आले. नंदुरबार नगरपरिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 25 PPE किट रघुवंशी परिवाराच्या वतीने देण्यात आले...

Read More

रुहानी केंद्रातर्फे बचाव साहित्य वाटप

नदुरबार :-  विश्व रुहानी मानव केंद्र नवानगर  (वासधरा) नंदुरबार तर्फे आज  जिल्हा रुग्णालयात कोरोना आजारापासुन बचाव व सुरक्षेसाठी पिपिइ किटचे १०० नग, सॅनिटायझर ५ लीटरच्या १० नग , N-95 मास्क 100 नग , थ्री लेअर मास्क 1000 नग, मेडिक्लोर सोडिअम हायपोक्लाराईड 5 लिटर 50 नग असे साहित्य  देण्यात आले . तसेच पोलीस विभागालादेखील अशाच पद्धतीने मदत करण्यात आली...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!