Author: Ramchandra Bari

जिल्ह्यात प्रवेशासाठी व बाहेर जाण्यासाठी दिशानिर्देश

नंदुरबार : कोविड-19 प्रतिबंधासाठी नंदुरबार जिल्ह्यातून परराज्यात जाणारे व इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिशानिर्देश जारी केले आहेत. मुळ गावी जावू इच्छिणाऱ्या व्यक्ती किंव व्यक्ती समूहाची माहिती त्या तालुक्यातील तहसीलदार एकत्रित करतील. या माहितीत आधार क्रमांक, दूरध्वनी क्रमांक व पत्ता, ज्या ठिकाणी जायचे आहे ते स्थळ आणि वाहनाच्या प्रकाराचा स्पष्ट उल्लेख असावा. गटाच्या बाबतीत गटप्रमुख एकत्रित अर्ज करू शकतील. वैद्यकीय अधिकाऱ्याचे शीतज्वर नसल्याचे प्रमाणपत्र व्यक्तीनिहाय आवश्यक असेल. ई-पाससाठी http://covid-19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल. नोडल अधिकारी राज्यनिहाय आणि जिल्हानिहाय यादी तयार करून ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात जायचे आहे तेथील नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून व्यक्तींना पाठविण्याची कार्यवाही करतील. तत्पूर्वी त्या राज्याने किंवा जिल्ह्याने स्विकृतीची व्यवस्था केली असल्याची खात्री करतील व तसे पत्र प्राप्त करून घेतील. स्वत:च्या वाहनाने जावू इच्छिणाऱ्या व्यक्तींनाबाबत नोडल अधिकारी समन्वय साधून जाण्याची परवानगी देतील. वाहनासाठी परवाना तयार करून त्यावर प्रवासी व्यक्तीचे नाव व मार्गाचा उल्लेख असेल. वाहतूकीपूर्वी वाहनाचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. प्रत्येक वाहनासोबत वाहन परवाना, प्रवाशांची यादी, प्रत्येक प्रवाशाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, प्रत्येक प्रवाशाचे बंधपत्र, वाहन प्रमाणपत्र, वाहतूक आराखडा असणे आवश्यक आहे. या प्रवासादरम्यान वाहन कमीत कमी ठिकाणी थांबणे अपेक्षित राहील. राज्यांतर्गत बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्रात ये-जा करण्याची परवानगी नसेल. रेड झोनमधून नंदुरबारला येणाऱ्या व्यक्तीला परवानगी देण्यासंदर्भात काळजीपूर्वक निर्णय घेण्यात येईल. व्यक्तीला जिल्ह्यातून बाहेर जाण्याची अनुमती देताना त्याच्याजवळ शीतज्वर नसल्याचे नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिाकचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. नोडल अधिकारी संबंधित जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्याशी समन्वय साधून परवानगी...

Read More

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही बाबींना शिथीलता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश

नंदुरबार : कोविड-19 प्रतिबंधासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य शासनाच्या सुचनांनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यात काही बाबीत शिथीलता देण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येत असल्याने ही शिथीलता देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे- • चालक व दोन प्रवाशांसह टॅक्सी व कॅब सुरू राहील. आवश्यक परवानगी घेऊन जिल्ह्यातल्या जिल्ह्यात व्यक्ती आणि वाहनांना फिरण्यास परवानगी असेल.• अनुज्ञेय कामासाठी वाहन नेण्यास परवानगी असेल. चारचाकी वाहनासाठी वाहनचालकाच्या मागील बाजूस केवळ दोन व्यक्तींना अनुमती असेल. दुचाकी वाहनावर सहप्रवाश्यास बंदी असेल. त्यासाठी इन्सिडंट कमांडर पासेस देतील.• अत्यावश्यक सेवा देणारे व सतत मशीन सुरू ठेवणाऱ्या औद्योगिक आस्थापना सुरू राहतील. तसेच यापूर्वी परवानगी दिलेल्या आस्थापना योग्य खबरदारी घेवून सुरू राहतील.• ग्रामीण भागातील सर्व बांधकामे सुरू राहतील.• ग्रामीण भागातील सर्व औद्योगिक आस्थापना सुरू राहतील.• बाहेरून कामगार आणण्याची आवश्यकता नसलेली शहरी भागातील बांधकामे सुरू राहतील.• शहरी भागातील एकाकी दुकाने, संकुलाजवळील तसेच निवासी संकुलातील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असेल. आवश्यक व अनावश्यक असा कोणताही भेद न करता एका रांगेत किंवा एका रोडवर (लेनमध्ये) केवळ पाच दुकाने पूर्वपरवानगीने सुरू राहीतल. पाचपेक्षा अधिक दुकाने असल्यास केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू राहतील.• ग्रामीण भागात मॉल वगळून सर्व दुकाने सुरू राहतील.• अत्यावश्यक वस्तू, औषधी, वैद्यकीय साधनांची दुकाने सुरू राहतील.• ई कॉमर्स सेवेला अनुमती राहील.• खाजगी आस्थापना 33 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील.• शासकीय कार्यालयेदेखील 33 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील.• आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत सर्व कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू...

Read More

तिनही क्षेत्रात मद्य विक्रीस मुभा पहा कशी ?

मुंबई (वृत्तसंस्था):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या 17 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत लागू करण्यात आला असला तरी देशातील सर्व जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अशा तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. 4 मेपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील केश कर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. आता आणखी एक मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे. रेड झोनमध्ये सुद्धा दारुविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, पुण्यातील तसेच कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी यासंदर्भात माहिती दिली. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र) राहणाऱ्या मद्यप्रेमींना मात्र तूर्तास आणखी काही काळ वाट पहावी लागेल.मात्र असे असले तरी रेड झोनमध्ये असलेले सलूनचे दुकानं उघडण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच तीनही क्षेत्रातील बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांसाठी ही परवानगी देण्यात आली आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून 6 फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. कोरोनाच्या संकटात संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्यानं सरकारचा मोठा महसूल बुडत असल्यानं मद्यविक्रीची दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. रेड झोनमध्येही काय सुरु राहणार? मद्यविक्री दुकानं क्लिनिक, ओपीडीफोर व्हिलर (1+2)टू व्हिलर (1 जण)शहरी उद्योगइतर दुकानं एका लेनमध्ये फक्त पाचअत्यावश्यक वस्तूंच्या ई-कॉमर्स सुविधाखासगी ऑफिस – 33 टक्के कर्मचाऱ्यांसहसरकारी ऑफिस – 33 टक्के कर्मचाऱ्यांसहकुरिअर, पोस्टल ऑफिसबँक आणि फायनान्सशेतीला परवानगी रेड झोन (14) :मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, नागपूर,...

Read More

महिला जनधन खातेधारकांसाठी महत्वाची बातमी

नवी दिल्ली (वृत्तसेवा) : लॉकडाऊमध्ये महिला जनधन खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आली आहे. देशातीन महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात ५०० रुपयांचा दुसरा टप्पा सोमवारपासून मिळण्यास सुरुवात होईल.कोरोनाच्या संकटात गरीबांच्या मदतीसाठी २६ मार्चपासून महिला जनधन खातेधारकांना दरमहा ५०० रुपये मदतीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केली होती.प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत महिला खातेधारकांना बॅंक खात्यात मे पर्यंतचा पहिला टप्पा दिला गेल्याचे अर्थ मंत्रालयाचे सचिव देवाशीष पांडा यांनी सांगितले. लाभार्थ्यांनी हे पैसे काढण्यासाठीचे नियम जारी करण्यात आले आहेत. जनधन खातेधारक आपल्या बॅंकेची शाखा किंवा ग्राहक सेवा केंद्रात जाऊन पैसे काढू शकतात. हे पैसे एटीएममधून देखील काढता येऊ शकतात.बॅंकेमध्ये गर्दी होऊ नये यासाठी ही रक्कम पाच दिवसांच्या टप्प्यांमध्ये मिळणार आहे.ज्या महिलांच्या जनधन खात्याचा शेवटचा अंक शून्य किंवा एक आहे त्यांच्या खात्यात ४ मेला पैसे जमा होतील. ज्यांच्या अकाऊंटचा शेवटचा अंक दोन आणि तीन आहे त्यांना ५ मेला पैसे मिळतील. ६ मेला अकाऊंटचा शेवटचा नंबर चार आणि पाच तर सहा आणि सात शेवटचा अंक असलेल्यांना ८ मेला पैसे मिळतील. ज्यांच्या खात्याचा शेवटचा नंबर आठ आणि नऊ आहे त्यांना ११ मेला पैसे मिळतील.कोणत्याही आपत्कालिन स्थितीत महिलांना हे पैसे काढता येणार आहेत. ११ मेनंतर आपल्या सोयीनुसार कधीही पैसे काढता येऊ शकतील. नंतरही तुम्ही ती रक्कम काढू शकता असी माहिती देण्यात आली...

Read More

दिलासादायक वृत्त 48 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

नंदुरबार दि.2- कोविड-19 चाचणीसाठी पाठविलेले 48 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 594 पैकी 510 अहवाल निगेटिव्ह आले असून 18 व्यक्तींना या आजाराचा संसर्ग झालेला आहे. 65 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान नंदुरबार शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नगरपालिका हद्दीतील भाग क्रमांक 10 मधील सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी हा निर्णय घेतला आहे. शहरात शेती व शेतीशी निगडित वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल विक्री सुरू राहील. दुकाने व इतर आस्थापना पूर्ववत वेळेनुसार सुरू राहतील. इतर अत्यावश्यक सेवा पूर्ववत सुरू राहतील नागरिकांनी बाहेर पडताना मास्क घालणे, सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे व कोरोना प्रतिबंधाबाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ग्रामस्तरीय दक्षता समितीची स्थापनाबाहेरील राज्यातून अथवा जिल्ह्यातून परतणाऱ्या मजुरांना कोरोना प्रतिबंधाच्यादृष्टीने होमक्वॉरंटाईन करणे गरजेचे असल्याने त्यासाठी ग्रामस्तरीय दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत सरपंच अध्यक्ष असतील तर ग्रामसेवक आणि पोलीस पाटील सदस्य असतील. सदर समिती बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या हातावर होमक्वॉरंटाईनचा शिक्का असल्याचे पाहिल.गावात पथक स्थापन करून अशा व्यक्तींची नियमित तपासणी करण्यात येईल. त्या 14 दिवस घराबाहेर पडणार नाही याची दक्षता घेईल. अशी व्यक्ती बाहेर पडत असल्यास तहसीलदार किंवा पोलीस निरीक्षक याना माहिती देईल. तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडून वैद्यकीय तपासणी करून आजाराची लक्षणे आढळल्यास जिल्हा प्रशासनाला कळवेल आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!