Author: Ramchandra Bari

अडीच हजार नागरीक विशेष रेल्वेने उत्तर भारताकडे रवाना सोशल‍ डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन

नंदुरबार : आज सतत दुसऱ्या दिवशी प्रशासनातर्फे बिहारला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. या गाड्यांनी अररिया येथे 1210 आणि पुर्णिया येथे 1290 नागरिक आपल्या गावाकडे रवाना झाले. कालप्रमाणेच आजही चोख पोलीस बंदोबस्तात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पंडा, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते. रेल्वेने गेलेल्या नागरिकात नवापूर, शहादा, येथील मजूर व अक्कलकुवाच्या जामिया संकुलातील आणि शहादा येथील एका संस्थेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.  सकाळपासून विविध वाहनाने या सर्वांना रेल्वे स्थानकात आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दोन व्यक्तीत  विशिष्ट अंतर ठेऊन त्यांना रेल्वे गाड्यात बसविण्यात आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक  करण्यात आले होते. पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक सुनिल नंदावळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जाफर तडवी आणि उप शिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी रेल्वे स्थानक परिसरातले नियोजन उत्तमरितीने केले. दोन्ही दिवस मिळून चार रेल्वे गाड्यांद्वारे आतापर्यंत 4514 नागरिकांना बिहारच्या विविध भागात पाठविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासन बिहारच्या प्रशासनाशी सातत्याने संपर्कात होते. जिल्ह्याच्या इतर भागात अडकलेल्या स्थलांतरीत नागरिकांना त्यांच्या गावाकडे पाठविण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक कार्यवाही करण्यात येत...

Read More

नंदुरबारकरांसाठी दिलासा दायक बातमी

नंदुरबार जिल्ह्यातुन आज दिलासा दायक बातमी मिळाली असुन पहिल्या चार कोरोणा बाधीतांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात एका ७१ वर्षीय आजी बाईचा समावेश असुन एकाच कुटुंबातील असलेल्या या चारही जणांनी उपचाराबाबत समाधान व्यक्त केले आहे. इतकच नव्हे तर कोरोणावर मात करणाऱया या चारही जनांनी गरज भासल्यास आपला प्लाझमा देखील देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. १७ तारखेला नंदुरबार शहरातील अलीसाहब मोहल्ला मधील एकाचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता आणि त्यांनतंर त्याच्या संपर्कातील आणखीन तीन कुटुंबीय देखील पॉझीटीव्ह आले होते. दरम्यान जिल्ह्यातील १९ कोरोणा बाधीतांपैकी एकाचा मृत्यु झाला असुन आता चार जण उपचार घेवुन घरी परतल्याने उपचार घेणाऱया कोरोणा बाधीतांची संख्या आता १४ इतकी राहीली...

Read More

जिल्ह्यातील आदिवासी मजूरांना आणण्यासाठी नियत्रंण कक्षाची स्थापना

नंदुरबार :  आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या  निर्देशानुसार राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या आदिवासी मजूर आणि विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहणार असून तेथून मिळालेल्या आदिवासी व्यक्तींच्या माहितीच्या आधारे वाहन व्यवस्था करून त्यांना जिल्ह्यातील त्यांच्या गावी पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी तळोदा आणि नंदुरबार प्रकल्प कार्यालय परस्पर समन्वयाने कार्य करीत आहे. राज्यातील तसेच परराज्यात असलेल्या जिल्ह्यातील  आदिवासी नागरिकांची माहिती संकलनाचे कामदेखील करण्यात येत आहे. पुणे येथून 480 व्यक्तींना  परत आणण्यात येत असून त्यापैकी जिल्ह्यातील 409 मजूर नंदुरबारकडे 17 बसेसद्वारे येत आहेत. त्यात नंदुरबार 45,नवापुर 15,शहादा 88,तळोदा 32,धडगाव 120 तर अक्कलकुवा तालुक्यातील 109 व्यक्तींचा समावेश आहे. सध्याच्या लॉकडाऊन स्थितीत स्थलांतरीत मजूर राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेला असून या कालावधीत रोजगार नसल्याने त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी व स्थलांतरित ठिकाणाहून मूळगावी येण्यासाठी पैसे उपलब्ध नाही. या आपत्तीच्या कालावधीत मजुराना मूळ गावी परतण्यासाठी आदिवासी विकास विभागाने 17 बसेस उपलब्ध करुन दिल्या आहे. सदर बसेस संपुर्ण सॅनेटायझ करण्यात आल्या प्रत्येक बसमध्ये 12 मजूर बसविण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. प्रवासादरम्यान  भोजनाची सोयही आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात येत आहे.             सर्व 409 मजूराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असुन त्यांना जिल्ह्यात आल्यावर होम क्वॉरटाईन करण्यात येणार आहे. त्या सर्व मजूरांना जिल्हा क्रिडा संकुल,नंदुरबार येथे आणण्यात येणार आहे. या ठिकाणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,नंदुरबार व तळोदा यांच्या समन्वयातुन तालुका निहाय सहा कक्षाची स्थांपना करण्यात आलेली आहे. त्यासाठी दोन्ही...

Read More

…..आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले!

नंदुरबार : जिल्ह्यात कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आणि त्याच्या घराजवळील क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर झाले. या क्षेत्रात काही रुग्ण आणि वृद्ध व्यक्तीदेखील होते. त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा याकडे लक्ष देण्याची गरज असताना पोस्ट खाते मदतीला धावून आले आणि अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. कोविड-19 विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन अहोरात्र काम करत आहे. संपूर्ण देशभर लॉकडाउन सुरुच आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत असल्याने प्रतिबंधीत क्षेत्रेदेखील वाढते आहे. अशा परिस्थितीत अधिकारी, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून या लढाईमध्ये आपले मोलाचे योगदान देत आहेत. या सर्व कोरोना योद्धासोबतीने पोस्टमन काम करीत आहे. सध्याच्या परिस्थितीत कौतुक करावे तेवढे कमी ..  केंद्र सरकारने पोस्ट खात्याची सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून सुरु ठेवल्याने देशातील सर्व पोस्टमन या लॉकडाउन काळामध्ये आपली सेवा देत  आहे. नागरीकाचे स्पीड पोस्ट,रजिस्टर तसेच महत्वाचे टपाल, वृद्धांचे पेन्शन पेपर, पार्सल वितरण करणे, सरकारच्या विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांना घरपोच देणे, इत्यादी अंत्यत महत्वाचे कामे पोस्टमन करत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे गरजेची औषधे घरपोच पोहोचविण्याचे कामदेखील पोस्टमनमार्फत होत असल्याने अनेक वयोवृद्धांचे आशिर्वाद त्यांना मिळत आहेत. देश आणि राज्याच्या विविध भागातून पार्सल नंदुरबार मध्ये वितरीत करण्यासाठी आली होती. त्यामध्ये अत्यंत महत्वाची औषधे होती. त्यामुळे ती त्वरीत पोहाचविणे निकडीचे होते. धुळे डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक अनंत रसाळ यांनी विशेष व्यवस्था करुन त्वरीत सदरची पार्सल नंदुरबार येथे पोहोच केली. नंदुरबार मध्ये संचारबंदी असताना देखील पोस्टमास्तर भालचंद्र जोशी तसेच त्याचे सहकारी पोस्टमन सतीश शिंदे, सिध्देश्वर माळी यानी जीवाची...

Read More

राज्य सीमेवर मजुरांचे रास्ता रोको

शिरपूर (वृत्तसंस्था) :- महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर फाटा येथे हजारो युपी बिहारी मजुर दोन दिवसापासून अडकून पडले आहेत. आपल्याला आपल्या घरी जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी या मजुरांनी आज मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील आधीच तुरळक स्वरूपात सुरू अस्लरली अत्यावश्यक सेवेची वाहतूक बराच वेळ खोळंबली. लॉक डाऊन थ्री नंतर महाराष्ट्रातील शेकडो परप्रांतीय मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी धडपडत आहेत. वाहनांची सोया नसल्याने हे मजूर पायीच आपल्या गावासाठी रवाना झाले होते. यांच्यासोबत दोन – दोन, तीन – तीन वर्षाची बालके तसेच ऐंशी वर्षाचे वृद्ध सुद्धा आहेत. मात्र एमपी पोलिसांतर्फे यांना दोन दिवसांपासून पळासनेर फाटा येथे राज्य सीमेवर रोखण्यात आले असून, पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांची स्क्रीनिंग करून पुढील प्रवासासाठी पाठवण्याची सोय करण्यात येणार आहे. मात्र दोन दिवसांनंतरही कुठलीही व्यवस्था न झाल्याने या मजुरांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान या मजुरांनी एमपी सरकारद्वारे आपल्याला आपल्या स्वगृही परत जाण्याची परवानगी मिळनेसाठी विनंती केली. शासकीय काम हे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची खंतदेखील या मजुरांनी व्यक्त केली. स्थानिक आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी त्यांची जेवणाची व पाण्याची व्यवस्था केली. मात्र, वाढता मजुरांचा आकडा पाहता ती मदत तोकडी पडली. प्रशासनाच्या पुढील आदेशावर या मजुरांचे भविष्य अवलंबून असून, लवकरात लवकर यांना स्वगृही परत जाण्याची परवानगी मिळावी, म्हणून या मजुरांनी मध्यप्रदेश शासनाकडे मागणी केली आहे. राज्य सीमेवर मजुरांचे रास्ता रोको शिरपूर (वृत्तसंस्था) :- महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर फाटा येथे हजारो युपी बिहारी मजुर...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!