Author: Ramchandra Bari

बाहेरून आलेल्या नागरिकांना आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन

नंदुरबार : राज्यातील विविध भागातून किंवा परराज्यातून आलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी किंवा कामासाठी जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणी करून घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. कोविड-19 मुळे झालेल्या मृत्युच्या दोन्ही प्रकरणात रुग्णास आरोग्य तपासणी न करता आधी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. आजाराची लक्षणे वाढल्यावर त्यांची स्वॅब चाचणी करण्यात आली होती. वेळेवर आजाराचे निदान न झाल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला. ज्या रुग्णांची वेळेवर तपासणी करण्यात आली असे 9 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. इतर रुग्णांची प्रकृतीदेखील स्थिर आहे. त्यामुळे नागरिकांनी आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये व ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी  लक्षणे आढळताच जिल्हा  शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनीदेखील कोविडची लक्षणे आढळलेल्या रुग्णांची माहिती त्वरीत शासकीय यंत्रणेस द्यावी. त्यासाठी ‍जिल्हा रुग्णालयाच्या नियंत्रण कक्षास 02564-210135 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या तहसील कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले...

Read More

शहादा येथे स्वनिर्मित मास्कचे मोफत वितरण सौ.स्वाती चव्हाण यांचा अनोखा उपक्रम

नंदुरबार :- जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका समाजसेवी विचाराच्या दाम्पत्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजवंतांसाठी उच्च प्रतीचे तब्बल एक हजार मास्क तयार करण्याचा संकल्प केलाय. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक भूषण चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ. स्वाती चव्हाण यांनी संकल्प पुर्तीला सुरुवात केली असून, शहादा उपविभागीय पोलीस उपअधीक्षक श्री पुंडलिक सपकाळे यांना १०० मास्क देऊन या उपक्रमाला सुरुवात केली.      जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जसोदानगर येथील रहिवासी सौ. स्वाती भूषण चव्हाण यांनी जगभरात  झपाट्याने वाढत असलेल्या कोविड 19 सारख्या महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षक पती भूषण चव्हाण यांच्या प्रोत्साहनाने स्वनिर्मित 1000 मास्क मोफत वितरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचा शुभारंभ करत शहादा येथील उपविभागिय पोलीस उपअधीक्षक श्री.पुंडलीक सपकाळे यांच्या गस्त दरम्यांन  रस्त्यावर आढळणाऱ्या गरीब व गरजू लोकांना मोफत वितरण करण्यासाठी 100 मास्क भेट देण्यात आले. हे मास्क सौ स्वाती भूषण चव्हाण यांनी घरीच बनविले आहेत. त्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे कापड व इलास्टिक घेऊन त्याची कटिंग  श्रीमती मानिषा यांच्याकडून करून घेण्यात आली व सौ. चव्हाण यांनी स्वतः शिऊन घेतले. तयार करण्यात आलेले मास्क डिटर्जंटच्या पाण्यात धुऊन उन्हात वाळवले. त्यानंतर सर्व मास्कला इस्त्री करून निर्जंतुकीकरणासाठी त्यावर सेनेटराईजर स्प्रे केले आहेत.      कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मास्क वापरणे प्रत्येकाला आवश्यक आहे,  त्यासाठी पोलिस उप अधिक्षक श्री. पुंडलीक सपकाळे हे गरजूंना नेहमी स्वतः मास्क वाटप करत असतांना व मास्क वापराचे महत्त्व पटवून देत असतानाचे व्हिडिओ व अनेक बातम्या दिसत होत्या,  त्या प्रेरणेतून या सेवेत आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून शहादा तालुक्यातील कु-हावद जि. प. शाळेतील शिक्षक श्री भुषण प्रताप चव्हाण आणि त्यांच्या...

Read More

“बस बस घरात” गाणे सोशल मीडियावर व्हायरल लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर देवेन्द्र बोरसे यांची प्रस्तुती

नंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभर विविध उपाय योजना केल्या जात असताना, शासनाने लॉकडाऊनच्या माध्यमातून नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. तरी देखील बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना जिव्हाळ्याचा सल्ला म्हणून नंदुरबार येथील देवेंद्र बोरसे नामक शिक्षकाने नावाजलेल्या सैराट या चित्रपटातील झिंगाट गाण्याच्या चालीवर जनजागृती गीत सादर केले आहे. सध्या महाराष्ट्रभर नव्हे तर युट्युब, फेसबुक, व्हाट्सअप आणि ट्विटरच्या माध्यमातून हे गीत जगभर व्हायरल झाले आहे. चीनच्या वूहान शहरातून पसरण्यास सुरुवात झालेल्या कोरोना (covid-19) या विषाणूंचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात झाला आहे. संसर्गातुन पसरणाऱ्या या विषाणूने जगभरातील लक्षावधी नागरिकांचे प्राण घेतले आहेत. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने 23 मार्च पासून देशात...

Read More

मनरेगाच्या माध्यमातून 16 हजार मजूरांच्या हाताला काम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची विशेष मोहिम

नंदुरबार : कोविड-19 च्या संकटात ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 16 हजार 725 मजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मनरेगा अंतर्गत शेल्फवर 32 हजार कामे ठेवण्यात आली असून 31 हजार अपूर्ण कामे उपलब्ध आहेत. जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी करताच त्याला रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. एकूण 363 ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत. अक्कलकुवा तालुक्यात 3736, अक्राणी 3130, नंदुरबार 1977, नवापूर 3160, शहादा 2742 आणि तळोदा तालुक्यात 1980 मजूर कामावर आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क घालून कामे करण्यात येत आहेत. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दुर्गम भागातील आदिवासी मजूरांना  रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्तरावर प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. मजूर संख्येच्या बाबतीत जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर असून 40 हजार मजूरांना रेाजगार उपलब्ध करून देत जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. मजूरांना एका दिवसासाठी 238 रुपये मजूरी देण्यात येत आहे. जिल्ह्यात मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत 100 टक्के मजूरांच्या खात्यावर मजूरीची रक्कम थेट जमा करण्यात येते. आतापर्यंत दीड कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.  योजनेविषयी आणि उपलब्ध कामाविषयी माहिती देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कामांचे संनियंत्रण आणि येणाऱ्या अडचणी  दूर करण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. कृषी विभागातर्फे 73, वन विभागातर्फे 93, सामाजिक वनीकरण विभागातर्फे 23 आणि...

Read More

बारा लाख लाभार्थ्यांना धान्याचे वाटप लॉकडाऊनच्या काळात गरजू नागरिकांना मोठा दिलासा

नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांचे रोजगार धोक्यात आले असताना सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत  वितरीत करण्यात आलेले स्वस्त धान्य आणि  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील मोफत तांदळामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत  अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील 12 लाख 84 हजार 321 लाभार्थ्यांना  3097 मे.टन गहू आणि 10801 मे.टन तांदळाचे वितरण करण्यात आले आहे. यापैकी 6421 मे.टन तांदूळ मोफत वितरीत करण्यात आला आहे. अंत्योदय योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचे 95 टक्के तर प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 97 टक्के अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 98 टक्के मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. मे महिन्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांव्यतिरिक्त साधारण 3 लाख 27 हजार केशरी कार्ड सदस्यांकरिता गहू व तांदूळ दुकानदारांमार्फत वितरीत करण्यात येत आहे. याशिवाय अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति कार्ड 1 किलो डाळ मोफत देण्यात येणार आहे. त्याकरीता 106 मे.टन तूरडाळ व 106 मे.टन चनाडाळ प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात 1061 स्वस्त धान्य दुकानदार असून आतापर्यंत 11 स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी तीन दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धान्य वाटप करताना तलाठी, ग्रामसेवक, केंद्र अधिकारी यांचेद्वारा लक्ष ठेवण्यात येत आहे. विशेष पथकाद्वारे गोदामाचीदेखील तपासणी करण्यात येत आहे. शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना धान्याचा लाभ देण्यासाठी त्यांची ऑनलाईन नोंदणी तातडीने करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.के.सी पाडवी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनीदेखील मोहिमस्तरावर हे काम करण्याचे निर्देश दिले असून धान्य वितरणात कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. जिल्हाभरात शिधापत्रिका ऑनलाईन नोंदणीसाठी विशेष मोहिम...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!