कोविड संकटाच्या काळात एक नवी ‘उमेद’
नंदुरबार – कोविड संकटाच्या काळात रोजगाराचे प्रश्न निर्माण होत असताना जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समूहांनी ‘उमेद’ अभियानांतर्गत संसर्ग पसरू नये यासाठी वापरण्यात येणारे मास्क तयार करण्याचा उपक्रम हाती घेऊन रोजगार निर्मितीचा एक चांगला पर्याय निवडला आहे. याशिवाय घरपोच किराणा माल पोहोचविणे आणि भाजीपाला विक्रीतूनही समूहांनी उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या माध्यमातून ‘उमेद’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अभियानाची अंमलबजावणी प्रभाविपणे करण्यात येत आहे. एप्रिल 2020 अखेर एकूण 14 हजार 966 महिला स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून 1 लाख 47 हजार 961 कुटूंबाचा समावेश या अभियानात करण्यात आलेला आहे. समूहांना गावस्तरावर मार्गदर्शन करण्यासाठी अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून स्थानिक गावातील 1000 महिला कार्यरत आहेत. कोविड संकटाचा सामना विविध स्तरावर करावा लागत असताना त्याचे संधीत रुपांतर करण्याचा प्रयत्न अभियानाच्या माध्यमातून समूहातील महिलांनी केला. त्यातून मास्क तयार करण्याची कल्पना पुढे आली. आतापर्यंत 13 हजार मास्क तयार करून त्यातील आरोग्य विभागाला 10 हजार व इतर विभागांना 3 हजार देण्यात आले आहे. मास्क तयार करताना आरोग्य विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालनदेखील करण्यात येत आहे. 16 समूहांच्या 13 महिलांनी हे काम सुरू केले. काही महिला घरातच वैयक्तिक स्वरुपात व काही सामुहिक स्वरुपात कोरोनापासून सुती कापडाचे मास्क तयार करीत आहे. मास्कची किंमत 10 ते 30 रुपये एवढी आहे. उत्पन्नासोबत कोविडशी लढण्यासाठी आवश्यक वस्तूची निर्मिती करण्याचे समाधानही मिळत असल्याची महिलांची भावना आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा तालुक्यातील ग्रामपंचायत, व नंदुरबार ,नवापुर व शहादा तालुक्यातील विविध शासकीय विभागाकडूनही त्यांच्याकडे मास्कची मागणी होत...
Read More