Author: Ramchandra Bari

तृप्ती धोडमिसे सहाय्यक जिल्हाधिकारी पदी रुजू

नंदुरबार (प्रतिनिधी) – भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तृप्ती धोडमिसे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. त्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१९ बॅचच्या अधिकारी असून परीक्षेत भारतात १६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. मूळच्या पुणे येथील असलेल्या श्रीमती धोडमिसे पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील बी.टेक.झाल्या असून यापूर्वी त्यांनी एल अँड टी मध्ये इंजिनिअर आणि महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात सहायक आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय प्रबोधिनीतुन त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. नंदुरबार आकांक्षीत जिल्हा असल्याने काम करण्याची चांगली संधी आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अनुभव पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असे श्रीमती धोडमिसे यांनी म्हटले...

Read More

नंदुरबारात उरले ४ कोरोना बाधित

नंदुरबार (प्रतिनिधी) – जिल्ह्यासाठी आजचा दिवस आणखीन दिलासादायक ठरला असून आज ६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आज या सर्वांचा दुसरा तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना रुग्णालयातुन डिस्जार्च मिळाला. यामुळे आता नंदुरबारच्या कोरोना उपचार केंद्रात ४ रुग्ण शिल्लक राहिले आहेत. हि संख्या शून्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत जिल्हातील २१ जणांचा कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक आला होता. यातील दोघांचा मृत्यु झाला असून या आधी ०९  जन कोरोना मुक्त झाले होते. आज आणखीन ०६ जन कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. आता जिल्हा सामान्य रुग्णालयात उर्वरित ०४ जणांवरच उपचार सुरु आहे. आज घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये शहाद्यातील ५ तर अक्कलकुवा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. आज घरी सोडण्यात आलेल्या ९ जणांवर  रुग्णालयातुन बाहेर जांतांना फुलांची उधळण करण्यात आली. आज कोरोनामुक्त होवुन परतलेल्या रुग्णांमध्ये एका अॅम्ब्युलंन्स चालकांचा देखील समावेश होता. माजी सैनिक असलेल्या रुग्णवाहीका चालकाचा निरोपाच्या वेळेचा उत्साह पाहण्याजोगा होता.  आज माजी सैनिक असल्यासारखे भासत असल्याचे सांगत सर्व कोरोना बाधीतांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वोत्तम उपचार होत असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार देखील मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा देखील या चालकाच्या स्वागतासाठी आवर्जुन उपस्थित...

Read More

धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सिंचनाचा लाभ घ्यावा

नंदुरबार   : मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार विभागामार्फत जिल्ह्यातील शिवण मध्यम प्रकल्प, कोरडी मध्यम प्रकल्प,नागन माध्यम प्रकल्प, लघु पाटबंधारे योजना या चारही प्रकल्पातुन नदी व कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सिंचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता वि.गं. खैरनार यांनी केले आहे. शिवण मध्यम प्रकल्पातून विरचक, बिलाडी, सुंदर्द, खामगाव, नारायणपुर, करणखेडा, बद्रिझिरा, गुजरभवाली, राजापूर, व्याहूर, धुळवद, ढेकवद, बालआमराई, काळंबा या गावांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. या गावातील शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरुन देण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक के.डी.बागुल (भ्रमणध्वनी 7769859387) यांच्याशी संपर्क साधावा. नागन मध्यम  प्रकल्पातून नवागाव, दुधवे, सोनारे, तारपाडा, देवळीपाडा,भरडू, महालकडू या गावासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. या गावातील शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरुन देण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आर.आर.पाटील (भ्रमणध्वनी 9657573915) यांच्याशी संपर्क साधावा. कोरडी मध्यम प्रकल्पातून पळशी, पळसुन, डोंग, सागाळी, वडदा, खातगांव, वडफळी, बिलदा, जामदा, मळवाण, खडकी, छिर्वे, चोरविहीर, कडवान, वडसात्रा, चितवी या गावात पाणी सोडण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आर.जी.शिंदे (भ्रमणध्वनी 9890298318) यांचेशी संपर्क साधावा.  लघु पाटबंधारे योजना भुरीवेल प्रकल्पातून भुरीवेल, धुवा, आमपाडा या गावात पाणी सोडण्यात येणार आहे. या गावातील  लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरुन देण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी आर.झेड गावीत (भ्रमणध्वनी 9423313688) यांच्याशी संपर्क साधावा. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचे पाणी अर्ज भरून संबधित कर्मचाऱ्याकडे जमा करावेत. हे अर्ज गावातच नियुक्त कर्मचाऱ्याकडून भरून घेतले जातील. ग्रामपंचायतींनीदेखील पाणी  मागणी अर्ज भरुन नियुक्त कर्मचाऱ्याकडे...

Read More

डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

नंदुरबार  :  डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी डासांची उत्पत्ती ठिकाणी परिसरात निर्माण होऊ देऊ नये, तसेच आवश्यक दक्षता बाळगून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी आर.बी.ढोले यांनी केले आहे. किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 2019 मध्ये एकूण 2002 रक्त जल नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 153 डेंग्यू निश्चित रुग्ण तसेच खाजगी रुग्णालयातील 298 असे 451 रुग्ण एन.एस.1 चे  आढळून आले आहेत. माहे एप्रिल 2020 मध्ये एकूण सरकारी रुग्णालयातील 163 रक्त जल नमुन्याची तपासणी करण्यात आली होती. त्यात 6 डेंग्यू निश्चित रुग्ण तसेच खाजगी रुग्णालयातील 6 असे 12 रुग्ण एन.एस.1 चे आढळून आले आहेत. मागील दोन वर्षांत डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येते. डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस या डासांच्या चावण्यापासून होत असल्याने तसेच या डासांची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते. नागरीकांनी आपल्या घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करुन भरावे एक दिवस कोरडा पाळण्यात यावा.आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.  घराजवळ असलेली नाले वाहते करुन डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत. नष्ट करता न येणाऱ्या मोठ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्यात यावीत.अंगभर कपडे घालावेत, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, डास पळवून लावणाऱ्या क्रीम व कॉईल चा वापर करावा जेणे करुन डासोत्पत्तीला व आजार प्रसाराला प्रतिबंध होईल व डेंग्यू आजाराला टाळता येईल. डेंग्यू हा आजार नोटिफायबल आजार असल्यामुळे जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व खाजगी प्रयोगशाळांनी  रुग्णालयामध्ये डेंग्यू दुषित रुग्ण आढळून आल्यास त्याची सूचना त्वरीत जिल्हा हिवताप अधिकारी  कार्यालयास द्यावी. डेंग्यू या...

Read More

जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा – डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार – राष्ट्रीय हरीत लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील जैव वैद्यकीय कचऱ्याचे योग्य पद्धतीने विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जैव वैद्यकीय कचरा विघटनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाटील आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, उपचार, निदान, विलगीकरण दरम्यान तयार होणारा जैव वैद्यकीय कचऱ्याचे संकलन पिवळ्या पिशवीत आवश्यक दक्षता घेऊन करण्यात यावे. वैयक्तिक स्तरावर वापरण्यात येणाऱ्या पीपीई कीट, मास्क आणि ग्लोव्हजचे संकलन  व्यवस्थितपणे होण्यासाठी घंटागाडी चालकांना सुचना देण्यात यावी. हा कचरा इतर कचऱ्यात मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी. तालुका स्तरावर राष्ट्रीय हरीत लवादाच्या सूचनांनुसार कचरा संकलन करण्यात यावे. संबंधित विभागाने यासाठी समन्वयक अधिकारी नेमावा. होम क्वॉरंटाईन व्यक्तीच्या घरातील जैव वैद्यकीय कचऱ्याचे योग्यरितीने संकलन होईल याची दक्षता स्थानिक स्वराज्य संस्थेने घ्यावी, असे त्यांनी सांगितले. बैठकीत श्रीमती पाटील यांनी राष्ट्रीय हरीत लवादाच्या सुचनांची माहिती दिली. श्री.काकडे यांनी सादीकरणाद्वारे जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबतची माहिती दिली. बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि इतर संबंधीत अधिकारी उपस्थित...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!