Author: Ramchandra Bari

महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपातर्फे आंदोलन

नंदुरबार (प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ नंदुरबारला भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. कोरोना विषाणुचा महामारीचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असुन या वाढत्या फैलावामुळे राज्यातील व्यापारी, शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, आदिवासी,दलित संचारबंदीच्या संकटात सापडले आहे. राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नसल्याने पोलीस प्रशासन व डॉक्टर यांच्यावर समाजकंटकाकडुन हल्ले होत आहे. केंद्र सरकार विस्तारीत स्वरूपात मदत कार्य करीत असताना महाविकास व आघाडीच्या राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत राज्यातील जनतेला केली जात नसल्याने कोरोनाच्या संचारबंदीत लॉकडाऊन झालेली जनता अडचणीत आहे. यावरूनच भाजपने आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदशर्नाखाली येथील भाजप जिल्हा कार्यालयावर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत काळया फिती लाऊन जिल्हा कार्यालयाबाहेर निषेधाचे फलक हातात घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केंद्रातील मोदी सरकार प्रमाणेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने देखील पॅकेज दयावे. नंदुरबार जिल्हयातील आदिवासी जनतेला खावटी कर्ज दयावे, 100 टक्के अनुदानावर विविध योजना सुरु कराव्यात, नंदुरबार जिल्हयातील शेतकऱ्यांची संपुर्णपणे कर्जमुक्ती करण्यात यावी, जिल्हयातील बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता मिळावा, पोलीस व डॉक्टरांवरील हल्ले त्वरित थांबवावे, अशी मागणी केली. यावेळी निलेश माळी,  माणिक माळी,  केतन रघुवंशी,  नरेंद्र माळी, हर्षल पाटील,  जयेश चौधरी,  संजय साठे,  योगिता बडगुजर आदी उपस्थित...

Read More

१० दुकादारांना ४२ हजार दंड

नंदुरबार (प्रतिनिधी):- शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रात दुकाने सुरु ठेवणाऱ्या १० दुकानदारांना न्यायालयाने तब्बल ४२ हजार रुपये दंड ठोठावला आहे.कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी व नियंत्रण आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचे आदेश पारीत केलेले असतांना व पुढील आदेशापावेतो दुकाने सुरु ठेवणार नाही, असे आदेश दिलेले आहेत, असे माहिती असतांना देखील दुकाने सुरु ठेवुन प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करतांना दि .१९ मे २०२० रोजी महसुल, नगरपालिका अधिकारी, कर्मचारी, नंदुरबार शहर पोलीस यांचे संयुक्त कारवाईत १९ दुकानांत मालक व कामगार मिळुन आले होते.या कारवाईत बॉम्बे ट्रेडर्स, ओम शांती मॅचिंग, आनंद गिफ्ट हाऊस, मोदी हॅण्डलुम, अंबर मॅचिंग, अरीहत कलेक्शन, सिध्दार्थ सिलेक्शन, कुशल कलेक्शन, बालाजी साडी आणि जगदंबा कलेक्शन ही दुकाने प्रतिबंधीत क्षेत्रात सुरु असल्याचे आढळुन आले होते. त्यांच्याविरुध्द नंदुरबार शहर पोलीस टाणेत भा.द.वि.क .१८८, २६८, २६९, २९०, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील दुकान मालक व त्यात काम करणारे आरोपी बॉम्बे ट्रेडर्स मधील विनोद चंदरमल मंदाणा, (मालक) विक्रम बजाज, सतिष माळी, गोपाल बागले, हर्षल परदेशी, अनिल वासवाणी, शंकर मंदाणा, आनंद गिफ्ट मधील राम गुरुबक्षाणी, ओमशांती मॅचिंग मधील अशोक जैन (मालक), बालाजी साडी व जगदंबा कलेक्शन मधील शंकर हरगुनदास तररेजा, रोहीत शत्रुघ्न गेही, आदनेश किरण सौपुरे, दलपतसिंह सवाईसिंह राजपुत, गुलाबसिंह सवाईसिंह राजपुत आणि मोदी हॅण्डलुम, अंबर मॅचिंग, अरीहंत कलेक्शन, सिध्दार्थ सिलेक्शन, कुशल कलेक्शन मधील कुंदन मोहनलाल कटारीया, सोनलकुमार विपीनचंद्र वाणी, विशाल मोतीराम शिंदे, गीतमचंद पुखराज जैन, सिध्दार्थ गौतमचंद जैन, सुनिलकुमार शंकरलाल देसरडा, शैलेश नरेंद्र जैन यांचा समावेश होता.त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस . ए...

Read More

नंदुरबार जिल्हा परिषदेतर्फे स्वच्छाग्रहींना सॅनिटाईझर, मास्कचे वाटप

नंदुरबार (प्रतिनिधी ) – कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामपातळीवर काम करीत असलेल्या स्वच्छाग्रहीच्या सुरक्षिततेसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲङ. सिमा पद्माकर वळवी यांचे हस्ते सॅनिटाईझर, मास्क व हॅन्डग्लोज यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी. सी., जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रतनदादा पाडवी, बांधकाम सभापती अभिजित पाटील उपस्थित होते.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख व जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून विविध उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविले जात आहेत.कोरोना विरुद्धच्या या लढाईत ग्रामपंचायत स्तरावर पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ ,पंचायत समितीचे सर्व गटविकास अधिकारी, जिल्हा व तालुका कक्षातील कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताग्रही सक्रिय झालेले असून त्यांचेमार्फत ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामस्तरावर कोरोनाबाबत जाणीव जागृती केली जात आहे.ग्रामपातळीवर काम करीत असलेल्या स्वच्छाग्रहींची सुरक्षितता व त्यांचे आरोग्य जपणे यासाठी राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दि.20 एप्रिल 2020 च्या शासननिर्णयादवारे ग्रामपंचायत स्तरावर कोरोना आजाराच्या प्रतिबंधसाठी काम करणाऱ्या स्वच्छाग्रहींना जागतिेक बँक प्रोत्साहन अनुदान अंतर्गत हँन्डग्लोज, सॅनिटाईझर तसेच मास्क आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देणेबाबत सूचित केले होते.त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कोरेानाचा प्रादुर्भाव झालेल्या ग्रामपंचायती व शहराजवळील असलेल्या ग्रामपंचायतीतील एकूण 310 स्वच्छाग्रही यांचेसाठी हँन्डग्लोज, सॅनिटाईझर तसेच मास्क वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार आज दि.22 रोजी जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲङ. सिमा पद्माकर वळवी यांचे हस्ते नंदुरबार तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीतील स्वच्छाग्रहींना सॅनिटाईझर, मास्क व हॅंन्डग्लोज यांचे वाटप करण्यात आले....

Read More

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नंदुरबार : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड  यांनी 22 मे चे 00.01 वाजेपासून ते 5 जून,2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम, आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू...

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा

नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत  ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिना’ निमित्त दहशतवाद व हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.  या प्रसंगी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत,अविश्यांत पांडा, तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, कैलास कडलग यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी दहशतवादविरोधी प्रतिज्ञा घेतली. अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!