‘मिशन बिगीन अगेन’च्या पहिल्या टप्प्यास सुरुवात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश
नंदुरबार : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर करोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसोबतच जनजीवन सामान्य करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले असून ‘मिशन बिगीन अगेन’ च्या पहिल्या टप्प्यास 3 जुनपासून सुरुवात होत आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले असून त्यानुसार सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शारीरिक अंतर आणि करोना प्रतिबंधक सूचनांचे पालन न करणारी दुकाने अथवा संकुल तात्काळ बंद करण्यात येणार आहे. जिल्ह्यांतर्गत बससेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहणार असून आंतरजिल्हा बससेवेबाबत नंतर आदेश निर्गमित करण्यात येतील. आंतरराज्य बससेवादेखील बंद राहील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये सुरू राहतील. टॅक्सी, कॅब आणि रिक्शा सुरू राहतील, तथापि केवळ वाहनचालक आणि इतर दोन प्रवासी नेण्यास अनुमती राहील. चारचाकी वाहनाने देखील वाहनचालक व इतर दोन प्रवाशांना अनुमती असेल. दुचाकी वाहनावर केवळ चालकाला (एका व्यक्तीस) अनुमती असेल. सर्व प्रकारच्या मालवाहतूकीस अनुमती असेल. शहरी आणि ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यासदेखील अनुमती असेल. शहरातील सर्व दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, जीवनावश्यक व इतर वस्तूंसाठीची ई-कॉमर्स सेवा, खाजगी कार्यालये, शेती संदर्भातील कामे, बँक, कुरीअर आणि डाक सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, घरपोच सेवा देणारे हॉटेल्स, उपनिबंधक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालये सुरू ठेवण्यास अनुमती असेल. शासकीय कार्यालयात 100 टक्के उपस्थिती ठेवता येईल. प्रेक्षकाशिवाय वैयक्तिक व्यायामासाठी क्रीडांगणे सुरू ठेवण्यासही अनुमती राहील. मात्र इनडोअर उपयोगास अनुमती असणार नाही आणि समुह किंवा गट यांना अनुमती नसेल. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. हॉटेलमधील पार्सल सेवेलाच केवळ अनुमती असेल. शॉपींग...
Read More