Author: Ramchandra Bari

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांचा नंदुरबार दौरा कार्यक्रम

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. बुधवार 10 जून  2020 रोजी नंदुरबार येथे  आगमन व राखीव. गुरुवार  11 जून रोजी राखीव व 12 जून 2020 रोजी सकाळी 10.45 वा.जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीसाठी आगमन. सकाळी 11 वाजता कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने तयारी व उपाययोजना याबाबत सर्व संबंधित विभागांचा आढावा व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा. त्यानंतर राखीव. 13 जून 2020 रोजी...

Read More

नंदुरबार येथील मेजवानी प्रकरणी चौकशी समिती

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  नंदुरबार येथे  विवाहाप्रित्यर्थ  आयोजित मेजवानीच्या वेळी 50 व्यक्तिंच्या मर्यादेचा भंग झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले असल्याने प्रस्तुत प्रकरणाची चौकशी करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड  यांनी दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांनी तहसीलदार नंदुरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांची संयुक्त चौकशी समिती  नेमली आहे. मेजवानीत स्वयंपाक करणारा खानसामा पॉझिटीव्ह आढळून आला आहे आणि  अनेक नागरिक सहभागी झाल्याच्या वृत्ताने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.  खानसामाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंना करोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे मेजवानीत सहभागी झालेल्या व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंनी स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी आरोग्य विभागामार्फत तात्काळ तपासणी करून घ्यावी. नागरीकांना अशा व्यक्तींची माहिती असल्यास किंवा मेजवानीचे कुठल्याही प्रकारचे छायाचित्रण अथवा व्हिडीओ उपलब्ध असल्यास तहसील कार्यालय नंदुरबार किंवा उपविभागीय कार्यालय नंदुरबार येथे सादर करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहनही श्रीमती पंत यांनी केले...

Read More

महिला लोकशाही दिनाचे 15 रोजी आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या न्याय हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 15 जून 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नंदुरबार यांनी कळविले...

Read More

रोजगार हमी योजनेच्या कामांचा चांगला दर्जा असावा- डॉ.अर्जुन चिखले

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत सुरु  असलेल्या कामांच्या ठिकाणी कामाची माहिती देणारे फलक लावावेत. मजुरांना मजुरी निर्धारित वेळेत उपलब्ध करुन द्यावीत. अपुर्ण असलेली  कामे ही या आठवड्यापर्यंत पुर्ण करावीत. ही कामे नियमानुसार तसेच दर्जेदार, असावीत असे प्रतिपादन नाशिक विभागाचे उपायुक्त (रोहयो) डॉ.अर्जुन चिखले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगाच्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी  सुधीर खांदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, सामाजिक वनीकरण  विभागाचे विभागीय वनअधिकारी ए.के. धानापुणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एन.पी.भागेश्वर आदी उपस्थित होते. यावेळी मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या सीसीटी, कम्पार्टमेंट बंडींग, फळबाग लागवड, शेततळे, दगडी बांध, इंदिरा आवास योजना, सिंचन विहीर अशा कामांचा आणि  विविध विभागाचा कामाचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. अपूर्ण  कामे वरिष्ठाशी समन्वय साधून त्वरीत पुर्ण करावीत अशा सूचना डॉ.चिखले यांनी दिल्या. बैठकीस तालुक्यातील सहायक कार्यक्रम अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपआयुक्तानी केली रोहयो कामाची पाहणी उपआयुक्त डॉ.अर्जुन चिखले यांनी  ग्रामपंचायत घोटाणे येथे सुरू असलेल्या सिंचन विहीर, तसेच ग्रामपंचायत आसाने येथे सुरु असलेले सलग समतल चर खोदणे या कामाची पाहणी केली. यावेळी वनक्षेत्रपाल  एम के रघुवंशी ,वनपाल भाबड, सरपंच चंद्रकांत पाटील,पी.टी.ओ नितीन पाटील, संदीप वाडीले, ग्राम रोजगार सेवक सागर पाटील उपस्थित...

Read More

जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांवर चर्चा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ.हिना गावीत यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सिमा वळवी, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पांडा,  दिशा समितीचे अशासकीय सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.रविंद्र बैसाणे, बबीता नाईक, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना जिल्हा कौशल्य विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत विविध व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्या सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी जिल्ह्यातील बँकानी मुद्रा बँक योजनेअंतर्गत त्वरीत कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना खासदार डॉ. गावीत यांनी  दिल्या. त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील धडगाव, मोलगी येथील दुर्गम भागात बँकाची संख्या पुरेशी नसल्यामुळे नागरिकांना जन धन योजना,उज्जवला योजना अशा अनेक केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ  घेता येत नाही. या भागात जास्तीत जास्त शाखा सुरु करण्यास पाठपुरावा करण्यात येईल. बँकेत गर्दी टाळण्यासाठी बँकांनी टोकन पध्दतीचा वापर करावा. लाभार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनाचे पैसे खात्यावर जमा झाल्यावर बँकेने या रक्कमेतून कोणत्याही प्रकारची वळती करू नये. जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनधन खाते उघडण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. दुर्गम भागात  प्राथमिक आरोग्य सेवा नियमित राहील याची काळजी घ्यावी. या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहावे, अशा सूचनाही त्यानी दिल्या. बैठकीत पुरवठा विभाग, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!