Author: Ramchandra Bari

वादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे त्वरीत करा- ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या वादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे त्वरीत करून मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा. घराचे नुकसान झालेल्यांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले. वादळाने नुकसान झालेल्या शहादा तालुक्यातील डोंगरगाव, सोनवल,तसेच तळोदा तालुक्यातील  बोरद आणि मोड गावांची पाहणी केल्यानंतर  तळोदा येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, माजी मंत्री पद्यमाकर वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,  उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता आर.एम.चव्हाण, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी,  पंकज लोखंडे , मुख्याधिकारी सपना वसावा, गट विकास अधिकारी सी.टी.गोसावी, सावित्री खर्डे, जि.प.सभापती अभिजित पाटील, रतन पाडवी आदी उपस्थित होते. ॲड. पाडवी म्हणाले, वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात यावे. शेतपीकांच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे त्वरीत करावे. ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत राहील याकडे विशेष लक्ष द्यावे. जखमी व्यक्तींना आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी करता येईल यादृष्टीने प्रयत्न करावे. पाणी साचलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन पावसाळ्यात अशा समस्या येऊ नये यासाठी त्वरीत उपाययोजना करावी, असे निर्देश त्यांनी दिले. ते म्हणाले, वादळग्रस्तांना अन्नधान्य खराब झाले असल्यास पुरवठा विभागाअंतर्गत धान्य पुरविण्यात यावे. घराची पडझड झाली असल्यास शबरी आवास योजनेतंर्गत घरकुल देण्यात यावेत. न्यूक्लियस बजेट योजनेतून वादळग्रस्ताना पत्रे देण्याबाबत विचार असून त्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. विद्युत विभागाने वादळग्रस्त भागातील पडलेले विद्युत खांब, विद्युत रोहित्राची (डीपी) त्वरीत दुरुस्ती करावी.जुने झालेले खांब व विद्युत तारा बदलुन घ्याव्यात. वादळामुळे नुकसान झालेल्याना  शासनाच्या नियमानुसार जास्तीत...

Read More

गावातील जलसाठ्याचे पुर्नजीवन करा- डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय हरित लवादाने प्रत्येक गावात एक तळे, गाव तलाव, पाझर तलाव, यासारख्या जलसाठ्याचे पुर्नजीवन करण्याचे आदेश दिले असल्याने गावात अस्थित्वात असलेल्या एका जलसाठ्याचे पुर्नजीवन करावे, पुर्नजीवनाचे काम झाले असल्यास  त्याची माहिती त्वरीत सादर करावी. असे प्रतीपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित हरित लवादा संदर्भातील बैठकीत ते बोलत होते,बैठकीत अपर जिल्हाधिकारी महेश पाटील,उपजिल्हाधिकारी बबन काकडे,सुदीर खांदे,उपवनसरंक्षक सुरेश केवटे, आदि उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आणि भूजल पातळी कायम ठेवण्यासाठी ही कामे महत्वाची आहे. जलयुक्त शिवार, लोकसहभाग,आणि मनरेगाच्या माध्यमातुन अशी कामे जिल्ह्यात झाली आहेत. एखाद्या गावात झाली नसल्यास ती मनरेगा आणि लोकसहभागाच्या माध्यमातुन करण्यात यावीत. झालेल्या सर्व कामाची माहिती त्वरीत सादर करावीत असे त्यांनी सांगितले. श्री.काकडे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून हरित लवादाच्या निर्देशाची माहिती...

Read More

पीक कर्ज वाटपासाठी मेळाव्याचे आयोजन करा – डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या तसेच नवीन पीक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरीत खरीप पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी ‘कृषी कर्ज वितरण मेळाव्याचे’ आयोजन करावे, असे निर्देश  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँक प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ‘नाबार्ड’ चे जिल्हा व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपाडे उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, जिल्ह्यातील सर्व बँक शाखांनी पीक कर्ज वाटपाचे 90 टक्के उद्दीष्ट जूनअखेरपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या जास्त असलेल्या गावातील एक मोठे गाव  निवडून तेथे मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. या मेळाव्यात कर्ज मंजूर करणारे कर्मचारी आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांसह गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची माहिती द्यावी आणि अर्ज भरुन देण्यासाठी मदत करावी.  आजपर्यंत पीककर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे त्यांनी सांगितले. बैठकीस विविध शाखाचे बॅक प्रतिनिधी उपस्थित...

Read More

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेश 17 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील 2020- 2021 या शैक्षणिक सत्राकरीता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता महाराष्ट्र राज्यातून बरगड (ओडिशा) येथे 13 व वेंकटगिरी येथील 2 जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या निवडीसाठी  प्रादेशिक उपायुक्त  वस्त्रोद्योग नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज 17 जुलै 2020 पर्यंत मागविण्यात येत आहेत. प्रवेश अर्जाचा नमुना व अनुषांगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे संकेतस्थळ http://www.dirtexmah.gov.in  वर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी  खोडे चवरे यांनी कळविले...

Read More

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीवर अधिक भर द्या- ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात विविध विभागाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात यावा. विशेषतः वन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी  विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पांडा, तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील आदी उपस्थित होते. ॲड.पाडवी म्हणाले, मनरेगा अंतर्गत ग्राम रोजगार सेवकांना नवे जॉबकार्ड तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शेताच्या बांधावर फळझाडे लागवडीमुळे होणाऱ्या लाभाची माहिती द्यावी. चारोळी, महूची लागवड करून त्याच्या व्यावसायिक उपयोगाबाबत विचार व्हावा. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याबाबत आराखडा तयार करावा. आमचूर उत्पादनासाठी उपयुक्त आंब्याच्या जातींची लागवड करावी व कृषी विभागाने अशा जातींच्या नर्सरी तयार कराव्या. औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीतील उद्योगात असलेल्या संधीची माहिती युवकांना द्यावी. जिल्ह्यात अधिकाधिक वन धन केंद्र सुरू करण्यासाठी नियोजन करावे. सामाजिक वनीकरण विभागाने रोपवाटिकांची संख्या वाढवावी. मनरेगा अंतर्गत 65 हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ???????????????????????????????????? शिधापत्रिका नसलेल्यांची नोंदणी करावी आदिवासी प्रकल्प कार्यालयाने नव्या शासन निर्णयानुसार शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबाच्या नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठीचा खर्च न्यूक्लिअस बजेटमधून करावा. अशा कुटुंबाना शिधापात्रिका मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करावे. गेले दोन महिने बाहेरगावी असलेल्या मजुरांना त्या महिन्याचे धान्य मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. पावसाळयात दुर्गम भागात अन्नधान्य वेळेत पोहोचेल याकडे लक्ष...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!