Author: Ramchandra Bari

खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी रिक्तपदाची माहिती अद्ययावत करावी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक परप्रांतीय आपल्या  मूळ गावी  गेल्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्राच्या वेबपोर्टलवर रिक्तपदाची माहिती भरुन बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ.रा.म.कोल्हे यांनी केले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र कार्यालयामार्फत खाजगी व सार्वजनिक आस्थापनेची नोंदणी करुन रोजगाराच्या सेवा सुविधा पुरविल्या जातात. यात रिक्त पदे अधिसूचित करणे, बेरोजगार उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कुशल मुनष्यबळाची माहिती उपलब्ध करुन देणे, रोजगार मेळावा घेवुन रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमातून रिक्तपदे अधिसूचित करणे, कौशल्य विकास प्रशिक्षित उमेदवारांची माहिती, मनुष्यबळाची नोंदणी बाबतच्या सुविधेचा समावेश आहे. खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी आपल्या आस्थापनेतील रिक्त पदाची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर  ई-आर 1 या पर्यायावर क्लिक करुन भरावी. प्रत्येक तिमाही नंतर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत माहिती सादर करावी. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत (दूरध्वनी क्रमांक 02564-210026)  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड,तळ मजला रुम नंबर 27 नंदुरबार या कार्यालयांशी संपर्क...

Read More

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा- जिल्हाधिकारी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत प्रलंबित प्रकरणात कागदपत्राची पूर्तता करून ही प्रकरणे मंजूर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. दोन्ही योजनांच्या जिल्हास्तरीय कार्यबल समितीच्या सभेत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक जयंत देशपांडे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, आय.टी.आय चे गटनिदेशक एल.टी.गागुर्डे आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मागील वर्षांची तसेच चालू वर्षांच्या बँकेने नामंजूर केलेल्या  प्रकरणाबाबत लाभार्थ्यांसोबत समन्वय साधण्यात यावा. त्यांना त्रूटींविषयी माहिती देण्यात येऊन कागदपत्राची पूर्तता करुन घेत अशा प्रकरणांना मंजूरी द्यावी.  लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी येत असल्यास लाभार्थ्यांकडून ऑफलाईन अर्ज  घेवून ही प्रकरणे मार्गी लावावीत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उद्योग,व्यवसाय करु इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाते. प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल 50 लाख व सेवा उद्योग आणि कृषीपूरक उद्योग प्रवर्गातील प्रकल्पासाठी कमाल 10 लाख एवढ्या गुंतवणूकीचे प्रकल्प यासाठी पात्र आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण व शहरी भागामध्ये स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देवून स्थानिक युवक-युवतींना व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण निर्माण करुन बेरोजगार युवकांचे व पारंपारिक कारागिरांचे स्थलांतर थांबविणे आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, सुधारीत बीज भांडवल योजना, जिल्हा उद्योग केंद्र योजना,महाराष्ट्र राज्य समूह विकास योजना, केंद्र शासनाची सूक्ष्म,लघू उपक्रम समूह विकास योजना, महिला...

Read More

पीक कर्जाने दिली नवी आशा

शहादा तालुक्यात मौजे कुसुमवाडीच्या आदिवासी महिला कनीबाई सांबरसिंग ठाकरे यांना जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या पीक कर्ज मेळाव्यात 1 लाख 14 हजाराचे कर्ज अवघ्या तीन तासात मंजूर करण्यात आले. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परिसरातील गावातील शेतकऱ्यांनादेखील मेळाव्यात सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहादा तालुक्यातील म्हसावद येथे सेन्ट्रल बँकेने आयोजित केलेल्या मेळाव्याची माहिती तलाठी राजेंद्र रोकडे यांनी कोतवालामार्फत कुसुमवाडीत पोहोचविली. कनीबाई यांना घरपोच माहिती मिळणे हा सुखद धक्का होता. कनीबाई या 66 वर्षाच्या विधवा आहेत. त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी भावाच्या मुलाला काही वर्षापूर्वी दत्तक घेतले. स्वत:च्या पाऊणेदोन एकर जमीनीवर त्या स्वत: मुलासोबत राबतात. यापूर्वी 1993 मध्ये त्यांनी दीड लाखाचे कर्ज घेतले होते. त्यानंतर ते फेडता न आल्याने कर्ज घेता आले नाही. कष्टाने शेती करून त्यांनी आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला होता. मागील कर्जमाफी योजनेत त्यांचे जूने कर्ज माफ झाले. नव्याने कर्ज मिळण्याची आशा तर निर्माण झाली, मात्र अशिक्षित असल्याने कर्ज मिळविण्यासाठी बँकेत चकरा मारणे आणि आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणे त्यांच्यासाठी कठीण होते. गेल्यावर्षी लावलेल्या कापसापासूनही फारसे उत्पन्न मिळाले नाही. वर्षभराच्या 40 हजार उत्पन्नात 6 व्यक्तींचे कुटुंब सांभाळून शेतीसाठी बी-बियाणे आणि खत घेणे त्यांना कठीणच होते. अशात मेळाव्याची माहिती मिळाल्याने नवी आशा त्यांच्या मनात निर्माण झाली. सोमवारी म्हसावद येथील मेळाव्याला त्या आपल्या मुलासह  उपस्थित होत्या. त्यांच्याकडून कर्जासाठी अर्ज भरून घेण्यात आला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तीन तासात कर्ज रकमेचा धनादेश त्याच ठिकाणी त्यांना तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांनी सुपूर्द केला. कर्ज मंजूर...

Read More

वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण शासनाकडे 1 कोटी 71 लाखांची मागणी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तातडीने पूर्ण कले असून  नागरिकांना मदत देण्यासाठी शासनाकडे 1 कोटी 71  लाखाची मागणी करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात  घरांचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शहादा आणि तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात अधिक नुकसान झाले. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी वादळग्रस्त भागांना भेट देऊन तातडीने पंचनामे करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी विविध यंत्रणांना निर्देश दिले होते. कृषी आणि महूसल विभागातर्फे पंचनाम्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात येऊन प्रशासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे. शहादा तालुक्यात 87 तर तळोदा तालुक्यात 4 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. दोन्ही तालुक्यात अंशत: पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या 1110 आहे. यात 459 शहादा तालुक्यातील तर 648 तळोदा तालुक्यातील आहेत. तर तळोदा तालुक्यात एक दुधाळ जनावर मृत्यूमुखी पडले आहे. झालेल्या नुकसानाबाबत नागरिकांना मदत करण्यासाठी निकषानुसार 81 लाखाची मागणी  करण्यात आली आहे. शहादा तालुक्यात 319 तर तळोदा तालुक्यात 285 शेतकऱ्यांच्या 362 हेक्टरक्षेत्रावरील  बागायत पिकांचे  (फळपिके सोडून) 33 टक्क्यापेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. त्यासाठी निकषानुसार 49 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील 323 शेतकऱ्यांचे  फळपिकाखालील बाधित क्षेत्र 231 हेक्टर आहे. त्यासाठी 41 लाखांची मागणी करण्यात आली...

Read More

पुढील चार दिवस नंदुरबार शहरातील बाजार बंद नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे‍ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता 19 जून 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत नंदुरबार शहरातील बाजार व इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात यावेत. कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात नंदुरबार शहरातील उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप पोलीस अधिक्षक रमेश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन.डी. बोडके, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गट विकास अधिकारी अशोक पटाईत आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना व पेट्रोल पंप सकाळी 8 ते 12 या वेळेत सुरू राहतील. शासकीय कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहतील. औषधांची दुकाने व दवाखाने पूर्वीप्रमाणेच सुरू राहीतल. त्यासाठी वरील वेळेचे बंधन असणार नाही.  शहरातील नागरिकांना दुपारी 12 नंतर कोणत्याही कामासाठी घराबाहेर जाऊ नये. अत्यावश्यक कामांसाठी केवळ दिलेल्या वेळेतच बाहेर पडावे.  मास्क न घालणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करावे. त्यासाठी नगरपालिकेने पथकांची संख्या वाढवावी. जिल्ह्याच्या सीमेवर कडकपणे तपासणी करण्यात यावी. मुंबईहून येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश देऊ नये. आरोग्य विषयक कारणाने आले असल्यास विलगिकरण कक्षात ठेवण्यात यावे.  विना परवाना आलेल्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. चारही दिवस शासकीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी वगळता कोणालाही बाहेर फिरता येणार नाही. प्रतिबंधात्मक क्षेत्रात नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करावी व नागरिकांना त्याबाबत ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती देण्यात यावी. या...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!