Author: Ramchandra Bari

नंदुरबार जिल्हा होतोय हॉट स्पॉट आज ३८ अहवाल पॉझिटिव्ह

नंदुरबार :- जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, आज शहरातील २५ रुग्णांसह जिल्ह्यातील तब्बल ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १४५ एवढी झाली आहे. आठवडाभरात जिल्ह्यात कोरोनाचा बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज आढळुन आलेल्या रुग्णांमध्ये तळोदा येथील मीना कॉलनीतील २ जण त्यात १ पुरुष ५८, १ महिला ५२, शहादा येथील गणेश नगरमधील २ रुग्ण त्यात १ पुरुष ४०, १ महिला १० यांचा समावेश आहे. तसेच नंदुरबार शहरामध्ये २७ रुग्ण आढळले आहेत. त्यात ज्ञानदीप सोसायटी २ पुरुष ३१, ६१ गिरीविहार सोसायटी ५ पुरुष ८,२४,३७,३८,६७ तर १ महिला ६७ यांचा समावेश आहे. तसेच मंगळ बाजार सिद्धिविनायक चौक परिसरातील १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात ४ पुरुष २०,४८,४९,५९ तर ६ महिला २,३८,३८,४३,१६,४५ यांचा समावेश आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यात ४ पुरुष २८,३१,४२,४४ व १ महिला २५ यांचा समावेश आहे. नंदुरबार तालुक्यातील सैताणे येथील ७ रुग्णांचाही आजच्या अहवालांत समावेश आहे. त्यात ५ पुरुष १८,१९,२३,४३,७० तर २ महिला ३५,६० यांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्नांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असून, ती आता १४५ एवढी झाली आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतराचे नियम पाळून अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, परगावाहून आलेल्या व्यक्तींबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले...

Read More

पुन्हा ५ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह

नंदुरबार (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा पाचने वाढून १०७ एवढी झाली आहे. आज सायंकाळी प्राप्त १३ पॉझीटीव्ह अहवालांनंतर पुन्हा ५ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आजची रुग्णसंख्या १८ झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोणा विषाणु बाधीतांच्या संख्येत दररोज वाढ होत असुन जिल्ह्यातील कोरोणा बाधीतांची संख्या आता १०७ झाली आहे. आज सायंकाळी १३ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. रात्री पुन्हा ५ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आता ही संख्या१०७ वर पोहचली आहे. यातील ५२ जण उपचार घेवुन परतले असुन ४७ जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर दोघांवर धुळे येथे उपचार सुरु आहे. तर यातील ०६ जणांचा मृत्यु झाला आहे. आज आढळलेल्या १८ रुग्णांमध्ये मोलगी येथील २ रुग्णांमध्ये पुरुष ४०. महिला ७, नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील १ पुरुष ४३, तर तळोदा येथील ५ पुरुष ३३,२९,५४,५१,४५ तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील ६ पुरुष २७,२९,३०,३०,३२, ३० आणि ४ महिला ३०,२९,४१,३१ अशांचा समावेश...

Read More

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या शंभरी पार

नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्ह्यात कोरोणा विषाणु बाधीतांच्या रुग्णांच्या संख्येने आता जोर धरला असुन जिल्ह्यातील कोरोणा बाधीतांची संख्येने शंभरी पार केली आहे. आज जिल्ह्यातील तब्बल १३ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोणा बाधीतांची संख्या ही १०२ वर पोहचली आहे. यातील ५२ जण हे उपचार घेवुन परतले असुन ४२ जणांवर जिल्हा सामांन्य रुग्णालयात तर दोघांवर धुळे येथे उपचार सुरु आहे. तर यातील ०६ जणांचा मृत्यु झाला आहे. आज सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कोरोणा वॉरियर्स असणारे जिल्हा सामान्य रुग्णालयातील तब्बल ०८ कर्मचाऱयांचा अहवाल हे पॉझीटीव्ह आले आहे. गेल्या पंधरा दिवसात तब्बल ६२ नवे कोरोणा बाधीत रुग्ण आढळुन आल्याने ही जिल्ह्यासाठी आता खऱया अर्थाने धोक्याची घंटा मानली जात...

Read More

आश्रमशाळा मुख्याध्यापकांकडून सैनिक सहायता निधीसाठी 1 लाखाचा निधी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : देशातील सैनिकाच्या कल्याणासाठी शासकीय आश्रमशाळा तोरणमाळ  येथील मुख्याध्यापक प्रदीप गणेश पाटील यांनी स्वत:च्या वैयक्तिक पगारातून 1 लाखाचा निधी  जिल्हा सैनिक कार्यालयास सैनिक सहायता निधीसाठी दिला आहे. त्यांनी पत्नी सुजाता व कन्या मधुरा यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचेकडे धनादेश सुपूर्द केला. श्री.पाटील यांची कृती इतरांसाठी आदर्श व प्रेरक असल्याचे डॉ.भारुड म्हणाले. देशासाठी आपल्याला काही देणे लागते.आपण दिलेल्या निधीतून देशासाठी शहीद झालेल्यांच्या विधवा पत्नी व पाल्यांना मदत होईल होईल अशी भावना श्री.पाटील यांनी व्यक्त...

Read More

मंगल कार्यालयात लग्न समारंभास परवानगी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह किंवा घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्नसमारंभ पार पाडण्यासासाठी नागरिकांकडून मागणी आल्यास त्यास परवानगी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. उपविभागीय अधिकारी नंदुरबार, शहादा व तळोदा आणि कार्यकारी दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर नवापुर, अक्कलकुवा, अक्राणी यांनी त्यांच्यास्तरावरून ही परवानगी द्यावी आणि परवानगी दिलेल्या लग्नसमारंभाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावी, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!