Author: Ramchandra Bari

जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्या

राज्य समन्वयक म्हणून मुकाअ विनय गौडा यांची नियुक्ती नंदुरबार :- राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांना शासनाने परवानगी दिली असून, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने तर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संपूर्ण बदली प्रक्रियेच्या राज्य समन्वयक पदी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा जी सी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण राबविण्यात आले आहे . त्यानुसार सदर बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत होत्या. तथापि , कोविड -१ ९ च्या प्रादुर्भावामुळे या वर्षीच्या जिल्हांतर्गत बदल्या ह्या विहित कालावधीमध्ये करणे शक्य नसल्याचे शासनाच्या...

Read More

महिला लोकशाही दिनाचे 20 रोजी आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): समस्याग्रस्त व पीडीत महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 20 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून तक्रारदार महिलांनी लोकशाही दिनात प्रत्यक्ष उपस्थित न राहता आपले तक्रार अर्ज [email protected]  या ईमेलवर किंवा 9420372067 या व्हॉट्सॲप क्रमांकावर 20 जुलै  रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठविण्यात यावेत.   सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी,अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,रुम नंबर 226, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,टोकरतलाव रोड,नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210047) येथे संपर्क साधावा, असे सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नंदुरबार यांनी कळविले...

Read More

शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन 2020-2021 या वर्षांच्या खरीप हंगाम 2020 साठी कापूस, मका, भात, ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, मुग, उडीद, व तूर या पिकांसाठी लागू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  प्रतिकूल हवामान घटकांपासून पिकांची रेनणी किंवा लावणी न झाल्यामुळे नुकसान, पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग,वीज, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ,पावसाचे खंड किड व रोग तसेच नैसर्गीक कारणामुळे इत्यादीमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीस शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरुन निघावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 लागू केली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार  शेतकऱ्यांना ऐच्छिक राहील. तर अधिसूचीत क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदांराचे अतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत अर्ज  करू शकतात. शेतकऱ्यांनी 31 जुलै 2020 पर्यत ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अधिक माहितीसाठी व सर्व पिकांच्या हेक्टरी विमा हप्ता दरासाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तसेच तालुका कृषि अधिकारी,मंडळ कृषि अधिकारी, कृषि विभागातील क्षेत्रीय कर्मचारी किंवा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड यांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे. महसुल मंडळ निहाय अधिसूचित केलेली गावे व पीक पीक व तालुकानिहाय अधिसूचित मंडळे अशी नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार, कोरीट, खोंडामळी, रनाळा, धानोरा आष्टे,शनिमांडळ या मंडळासाठी ज्वारी,बाजरी,भुईमूग,सोयाबीन मूग उडीद,तुर,कापुस,मका तर भात पिकासाठी धानोरा व आष्टे यांना पीक विमा योजना लागू राहील.खोंडामळी येथील मंडळास सोयाबीन व रनाळा व शनिमांडळ येथील मंडळास उडीद...

Read More

प्रतिबंधीत क्षेत्रात संचारबंदीचे कठोरतेने पालन करा- ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्रात संचारबंदीची अंमलबजावणी कठोरतेने करावी आणि नागरिकांमध्ये या आजाराबाबत अधिक जनजागृती घडवून आणावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले. कोरोनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि अविश्यांत पांडा, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते. ॲड.पाडवी म्हणाले, प्रतिबंधीत क्षेत्रात संपर्क साखळीचा शोध आणि नियमांच्या अंमलबजावणीबाबत योग्य नियोजन करण्यात यावे. स्वॅब तपासणीसोबत संसर्गावर नियंत्रण आणणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने येत्या...

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट नाही ईमेलद्वारे निवेदन देण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना किंवा अभ्यागतांना जिल्हाधिकारी किंवा अन्य अधिकाऱ्यांची भेट घेता येणार नाही. नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे निवेदन द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. नागरीकांनी आपला अर्ज किंवा निवेदन [email protected] या ईमेलवर पाठवावे किंवा 8888137967 या क्रमांकावर व्हॉट्सॲप द्वारे सादर...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!