Author: Ramchandra Bari

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड  यांनी  20 जुलै 2020 रोजी  सकाळी 6 वाजल्यापासून 3 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात...

Read More

नंदुरबार आणि शहादा शहरात रविवारी कडक संचारबंदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार आणि शहादा शहरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून पुढील आदेश येईपर्यंत दोन्ही शहरात प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी 9 वाजेपर्यंत बाहेर पडण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहतील. सर्व प्रकारची दुकाने, पेट्रोलपंप आदी आस्थापना व शासकीय कार्यालये या दिवशी बंद असल्याने रविवारी कोणीही बाहेर पडू नये. वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडताना रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवावे. दोन्ही शहरात इतर दिवशी सर्व आस्थापना व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहील. संसर्ग रोखण्यासाठी विषाणूची संपर्क साखळी खंडीत करणे  आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी शारिरीक अंतराचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत प्रत्येक रविवारी सवयीचा भाग म्हणून या पद्धतीने संचारबंदीचे पालन करावे. या कालावधीत अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.  नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आदल्या दिवशी करावी व संचारबंदीचे  पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले...

Read More

मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची चर्चा

मुंबई  : मराठाआरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला.  यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या संदर्भात माहिती दिली.  बैठकीस सदस्य मंत्री सर्वश्री. एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील तसेच महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुख्य सचिव संजय कुमार, विधि विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा, सचिव राजेंद्र भागवत  यांची उपस्थिती होती. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून 27 जुलै पासून न्यायालयात दररोज अंतिम सुनावणी सुरु होणार आहे.  राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.  सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणीमध्ये शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्यासंदर्भात या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सूचना...

Read More

सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्प अतिरिक्त भूसंपादन सरळ खरेदीस मान्यता

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाच्या अतिरिक्त भूसंपादन केलेल्या जमिनीची सरळ खरेदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. डॉ.भारुड यांच्या उपस्थितीत जमीन खरेदीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, सरकारी अभियोक्ता सुशिल पंडीत, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर उपस्थित होते. सरळ खरेदी प्रक्रीयेसाठी साधारण सव्वा कोटीचा निधी अपेक्षित असून 90 लाख रुपये संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून दिले आहे. उर्वरीत रक्कम तातडीने उपब्ध करून देण्याचे निर्देशही डॉ.भारुड यांनी दिले. सरळ खरेदी प्रक्रीयेमुळे खरेदी प्रक्रीया लवकर होऊन शेतकऱ्यांना शासकीय दराच्या पाचपट रक्कम प्राप्त होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांची रक्कमदेखील लवकर मिळणार आहे. सारंगखेडा प्रकल्पांतर्गत टेंभा, कमखेडा आणि तोरखेडा येथील 16 शेतकऱ्यांच्या 6.90 हेक्टर  जमिनीचे अतिरिक्त भूसंपादन करण्यात आले होते. 2006 पासून जमीन खरेदी प्रक्रीयेचे प्रकरण प्रलंबित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला लवकर मिळावा यासाठी लवकर खरेदी करण्यात यावी, असे निर्देश दिले...

Read More

पी. जी. स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

नंदुरबार (प्रतिनिधी) :- तालुक्यातील चौपाळे येथील पी . जी . पब्लिक स्कूलचा इ १० वी सी . बी . एस . ई बोर्डाचा निकाल आज दिनांक जाहिर करण्यात आला. यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सिबीएससी बोर्डाचा इयत्ता १० विचा निकाल आज जाहीर झाला असून, पी जी पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी त्यात घवघवीत यश संपादिले आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षा पासून या शाळेत इ . ११ वी सायन्स व कॉमर्सची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री . पुष्पेंद्र रघुवंशी , श्री . सिध्दार्थ रघुवंशी, अॅड , रूद्रप्रताप रघुवंशी...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!