Author: Ramchandra Bari

कोविडबाबत माहिती आता जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर कोविड-19 बाबत सविस्तर माहिती देणारी सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयातील सूचना विज्ञान केंद्रातर्फे (एनआयसी) विकसीत करण्यात आली आहे. या सुविधेमुळे जिल्ह्यातील कोविडच्या स्थितीबाबत वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त होणार आहे.  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या संकेतस्थळावर ‘कोविड-19 अपडेट’ या नावाने टॅब तयार करण्यात आला आहे. nandurbar.gov.in/covid-19-updates/  ही लिंक क्लिक केल्यास जिल्ह्यातील कोविडबाबत माहिती प्रदर्शित होते. या अंतर्गत आरोग्यदर्शक नकाशे,कोविड-19 डॅशबोर्ड, महत्वाचे आदेश आणि महत्वाचे दूरध्वनी क्रमांक व विविध सुविधांसाठी लिंक्स देण्यात आल्या आहेत. ‘आरोग्यदर्शक मॅप’ अंतर्गत उपलब्ध बेड्सची माहिती, प्रतिबंधीत क्षेत्र आणि  रुग्णालयांची मा‍हिती त्यांच्या लोकेशनसह प्रदर्शित केली जाते. सबंधित लोकेशनजवळ त्या संदर्भातील सविस्तर माहिती...

Read More

शेतकरी आत्महत्या निर्मुलन समितीची बैठक संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शेतकरी आत्महत्या निर्मुलन व सहाय्यता  समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक अशोक चाळक आदी उपस्थित होते. बैठकीत शहादा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे चार प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी एक प्रस्ताव पात्र तर तीन प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले. पात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाच्या प्रचलित नियमानुसार मदत देण्याच्या सूचना यावेळी डॉ.भारुड यांनी...

Read More

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेश 6 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेत 2020- 2021 या शैक्षणिक सत्रात तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता महाराष्ट्र राज्यातून बरगड (ओडिशा) येथे 13 व वेंकटगिरी येथील 2 जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या निवडीसाठी  प्रादेशिक उपायुक्त  वस्त्रोद्योग नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज 17 जुलै 2020 पर्यंत मागविण्यात आले होते. तथापी आय.आय.एच.टी बरगढ यांनी अर्ज सादर करण्यास 6 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रवेश अर्जाचा नमुना व अनुषांगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे संकेतस्थळ http://www.dirtexmah.gov.in  वर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी  खोडे चवरे यांनी कळविले...

Read More

सुशिक्षित बेरोजगारांना आधार क्रमांकाची माहिती भरण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ऑनलाइन नाव नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी तात्काळ आधार क्रमांक प्रोफाईलमध्ये नमूद करून प्रोफाईल अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे. जिल्ह्यातील उमेदवारांची नाव नोंदणी 2013 पासून https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सुरू आहे. उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर त्यांना यूजर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने संकेतस्थळावर उपलब्ध सुविधा आणि माहितीचा लाभ घेता येतो. उमेदवारांनी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक संकेतस्थळावर आपल्या प्रोफाईलमध्ये भरावा. प्रोफाईल अद्ययावत न केल्यास नाव नोंदणी 31 ऑगस्ट 2020 अखेर रद्द होईल. अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व...

Read More

‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ साठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यासाठी 11 महिनाच्या कालावधीकरीता ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ सुरु करण्यात येत असून युवकाना 27 जुलै 2020 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ अंतर्गत  आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमासाठी  नीती आयोगद्वारे निर्धारीत करण्यात आलेले उद्दिष्ट आणि संकेतांक प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासाठी या युवाशक्तीचा उपयोग करुन घेणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या फेलोशिपचे नियोजन व संचालन करण्यासाठी पिरामल फाऊंडेशन या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. फेलोशिपच्या माध्यमातून प्रतिभावंत युवकांना जिल्हास्तरावर  काम करण्याची संधी मिळणार आहे. फेलोशिपचा अर्ज करण्यासाठी युवक भारतीय नागरीक असावा. महाराष्ट्रातील युवकांना प्राधान्य देण्यात येईल. अर्जदार 21 ते...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!