Author: Ramchandra Bari

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित...

Read More

राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात पाणीसाठ्याचे पुनरुज्जीवन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 1263 पाणी साठ्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून 86 कामे प्रस्तावीत करण्यात आली आहेत. नवे जलस्त्रोत विकसीत करण्यात व त्याद्वारे पाणीसाठा करण्यात येणाऱ्या अडचणी  लक्षात घेता अस्तित्वात असलेल्या पाणीसाठ्याचे पुनरुज्जीवन करून पाणीसाठ्याची क्षमता वाढविण्याचे निर्देश राष्ट्रीय हरीत लवादाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात पुनरुज्जीवन झालेल्या कामांची माहिती संकलीत करण्यात आली व काही नवी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. कृषी विभागातर्फे 1032 कामे करण्यात आली  आहेत. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातर्फे 221 कामे करण्यात आली असून 77 काम प्रस्तावित करण्यात आली आहेत. नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागातर्फे 6 कामे करण्यात आली असून 9 नवीन कामे प्रस्तावित करण्यात आली आहे, तर मृद व जलसंधारण विभागातर्फे 4 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. प्रत्येक गावात किमान पाणीसाठा पुनरुज्जीवनाचे एक काम करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी  दिले आहे. पुनरुज्जीवन कामामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन त्याचा लाभ ग्रामीण जनतेला होणार...

Read More

जिल्ह्यातील आंतरराज्य स्थलांतरीत कामगारांचे सर्वेक्षण पूर्ण

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या संदर्भात केंद्र सरकारच्या कामगार  व रोजगार विभागाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आंतरराज्य स्थलांतरीत कामगारांची माहिती सर्वेक्षणाद्वारे संकलीत करण्यात आली आहे. सर्वेक्षणानुसार 36 हजार 795 कामगार परराज्यातून जिल्ह्यात परतले आहेत. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी बैठक घेऊन सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तीन स्तरावर ही माहिती संकलीत करण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे नोंदणीकृत आस्थापनांमधील कामगारांची माहिती एकत्रित करण्यात आली. तर नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर शहरातील व पंचायत समिती स्तरावर ग्रामीण भागातील माहिती संकलीत करण्यात आली. सर्व माहितीचे एकत्रित संकलन जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रातून परराज्यात गेलेल्या तथापि आता परत महाराष्ट्रात आलेल्या कामगारांची संख्या 36 हजार 795 तर रोजगारासाठी परराज्यातून महाराष्ट्रात आलेल्या व परराज्यात न जाता लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातच राहिलेल्या कामगारांची संख्या 374 आहे. महाराष्ट्रात आलेल्या कामगारापैकी अक्कलकुवा तालुक्यातील 3590, अक्राणी 5973, नंदुरबार 8256, नवापूर 3823, शहादा 9964 आणि तळोदा तालुक्यातील 5189 कामगार आहेत. तर लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातच राहिलेले अक्कलकुवा तालुक्यातील 29, नंदुरबार 131, नवापूर 138 आणि शहादा तालुक्यातील 76  परराज्यातील कामगार आहेत. सर्वेक्षणासाठी संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी, जि.प. शाळेतील शिक्षक आदींनी सहभाग घेतला. सर्वेक्षणात कामगाराचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती आदी विविध 30 मुद्यांची माहिती संकलीत करण्यात आली. जिल्ह्यात अत्यंत वेगाने हे काम पूर्ण करण्यात आले. सर्वेक्षणातून प्राप्त माहिती असंघटित कामगार विकास आयुक्तांना पाठविण्यात आली...

Read More

संचार बंदी काळात दूध विक्रेत्यांना पेट्रोल भरण्याची मुभा देण्याची मागणी

 नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनातर्फे जारी करण्यात आलेल्या आठ दिवसाच्या  कडक संचारबंदी काळात दूध  विक्रेत्यांना आपल्या वाहनात पेट्रोल भरण्याची मुभा देण्याची मागणी  जिल्ह्यातील दूध व्यावसायिक वाहनधारकांनी केली आहे.  यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनातर्फे दिनांक 22 ते 30 जुलै पर्यंत नंदुरबार सह शहादा तळोदा आणि नवापूर या शहरांमध्ये कडक संचारबंदी जारी करण्यात आली आहे . यात वृत्तपत्रे आणि दूध विक्रेत्यांना सूट देण्यात आली त्याबद्दल प्रशासनाचे दूध व्यवसायिकांनी  आभार मानले आहे.  परंतु जारी केलेल्या आदेशात संचार बंदी काळात केवळ कोरोना विषयी कामकाज करणारे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनाच पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचे  आदेशात नमूद केले आहे. जीवनावश्यक बाब म्हणून दूध विक्रेते वाहनधारकांना  इंधनाची गरज असते.  याबाबत संबंधित  पेट्रोल पंप चालकांना  दूध व्यवसायिक  वाहनधारकांना  पेट्रोल भरून देण्याबाबतच्या सूचना करण्यात याव्यात. जिल्ह्य़ातील सर्व दुध विक्रेत्यांना आपल्या वाहनात पेट्रोल भरण्याची मुभा देण्याची मागणी  जिल्ह्यातील सर्व दूध व्यवसायिक वाहनधारकांतरफे विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल भटू लगडे तसेच गवळी समाज महासंघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी निवेदनाद्वारे केली...

Read More

शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाभर पोस्टर आंदोलन

नंदुरबार (प्रतिनिधी) :- शालेय शिक्षण विभागाने जारी केलेली अधिसूचना रद्द करण्यासाठी शिक्षक भारतीच्या वतीने बुधवार दिनांक २२ जुलै २०२० रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी पोस्टर आंदोलनात नंदुरबार जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. जुनी पेन्शन मिळण्याचा आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी  महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील मसुद्यात बदल सुचवणारी अधिसूचना रद्द करावी, तसेच १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन आदेशानुसार विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित अनुदान दयावे, या मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी यांच्याद्वारा शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले. याबाबत शिक्षक भरती तर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लाॅकडाऊनमुळे अनेक शिक्षक घराबाहेर पडू शकले नाहीत. त्यांनी पण घरात राहून कार्ड पेपरवर अधिसूचना रद्द करा,...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!