Author: Ramchandra Bari

तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)–तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. सायंकाळी 7 वाजेपासून नदीत पूरस्थिती निर्माण होणार असून पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रकाशा बॅरेजच्या अधोबाजूने गोमाई नदीत सुमारे दीड मीटर उंचीने पाणी वाहत आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे उघडले असून 31364 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले असून 37 हजार क्युसेक्स विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील बोरी नदीला पूर आल्याने या नदीतील पाणी काही कालावधीत तापी नदीत दाखल होण्याची शक्यता असल्याने पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा बॅरेजचे 6 द्वारे 2 मीटर उंचीने उघडण्यात आले असून 35165 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर सारंगखेडा बॅरेजचे 5 द्वारे 3 मीटर उंचीने उघडण्यात आले असून 45498 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्याकरिता विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 72 तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले...

Read More

रेशन दुकानदार व गॅस एजन्सीसाठी बँक सुविधा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा शहरात असलेल्या सर्व बँकांची आस्थापना कार्यालयीन वेळेत अंतर्गत कामकाज, सरकारी भरणा, स्वस्त धान्‍य दुकान भरणा व गॅस एजन्सी, पेट्रोलपंप धारकांची रोख रक्कम व आरटीजीएस व्यवहारासाठी सुरू राहील. इतर बँक ग्राहकांसाठी व्यवहार बंद राहतील. ग्रामीण भागातील सर्व बँक शाखा नियमीत वेळेनुसार शासनाने कोविड संदर्भात निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून सुरू ठेवावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले...

Read More

श्रीजी रेसिडेन्सी आणि आदर्श लॉजला क्वॉरंटाईन रुमसाठी मान्यता

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शहरातील श्रीजी रेसिडेन्सी  लॉजमधील 20 खोल्या आणि आदर्श लॉजमधील 15 खोल्या स्वखर्चाने लॉज क्वॉरंटाईन होण्यास तयार असलेल्या रुग्णांसाठी क्वॉरंटाईन रुम म्हणून देण्यास सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी मान्यता दिली आहे. क्वॉरंटाईन रुम म्हणून देण्यापूर्वी खोली, इमारत, जिना निर्जंतुकीकरण व साफसफाई करण्याची जबाबदारी मालकाची राहील. सर्व खोल्यांमध्ये स्वच्छता कीट असणे आवश्यक आहे. स्वच्छता कर्मचारी व लॉजचे इतर कर्मचारी यांना सर्व सुरक्षा साधने पुरविण्याची जबाबदारी मालकाची राहील. लॉजमधून बाहेर पडणारे बायो मेडीकल वेस्टेज निर्धारीत ठिकाणी टाकण्यात यावेत. वैद्यकीय अधिकारी संशयिताची तपासणी करण्यास आले असताना त्यांना विनाअट प्रवेश देणे आवश्यक राहील. श्रीजी लॉजसाठी प्रती दिवस एका दिवसासाठी साधी...

Read More

धनगर प्रवर्गातील नागरिकांसाठी ग्रामीण भागात घरकूल योजना

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील ग्रामीण भागातील विकासापासून दूर असलेल्या विमुक्त जाती, भटक्या धनगर प्रवर्गातील समाजाच्या नागरिकांसाठी ग्रामीण भागात घरकुल योजना राबविण्यात येत आहे.             ही योजना वैयक्तीक सामुहिक लाभाची आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या धरतीवर ग्रामीण क्षेत्रात वास्तव्य करीत असलेल्या व मागील किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असलेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या बेघर कुटुंबांना घरकूल बांधून देण्यासाठी ही योजना आहे.             या योजनेच्या लाभासाठी पात्रताधारक लाभार्थ्यांनी अटी शर्तींच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन टोकरतलावरोड नंदुरबार येथे सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राकेश महाजन यांनी केले...

Read More

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी नामांकीत शाळेत प्रवेश

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत धनगर समाजाचे विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडू नयेत तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थतीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे यासाठी या समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.             यासाठी जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या निवासी शाळांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार विहीत नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक ते कागदपत्र व छायाचित्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन टोकरतलावरोड नंदुरबार येथे सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राकेश महाजन यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!