Author: Ramchandra Bari

बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीची बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.             कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.             सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावीत. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.             प्रतिबंधित क्षेत्रामध्ये...

Read More

आळींबी प्रक्रिया उद्योग इतर शेतकऱ्यांस प्रेरणादायी ठरेल – कृषीमंत्री दादाजी भुसे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आळींबी प्रक्रिया उद्योग इतर शेतकऱ्यांस  निश्चित प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. एकात्मीक फलोत्पादन अभियान अंतर्गत शहादा तालुक्यातील कहाटूळ येथे घनश्याम रतिलाल पाटील यांच्या आळींबी उत्पादन केंद्राच्या पाहणी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळा गावीत,उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार उल्हास देवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, उप विभागीय कृषी अधिकारी व्ही.बी.जोशी, तालुका कृषी अधिकारी किशोर हाळपे आदी उपस्थित होते. श्री.भुसे म्हणाले, हा प्रकल्प नाविन्यपूर्ण असून भविष्यकाळाचा वेध घेणारा आहे. अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने मशरुम निर्मिती या ठिकाणी केली जात असून ते विक्रीसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे...

Read More

पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे-दादाजी भुसे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे आणि बँकेत येणाऱ्या शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करावे, असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार मंजुळा गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जि.प.उपाध्यक्ष राम रघुवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर आदी उपस्थित होते. श्री.भुसे म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळावे व तो संकटातून सावरावा यासाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे....

Read More

टपाल विभागातर्फे बंद जीवन विमा पॉलिसी सुरू करण्याची संधी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सतत पाच वर्षे भरणा न केल्यामुळे बंद डाक विमा पॉलिसींचे पुनरुज्जीवन करण्याची संधी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर या पॉलिसींचे पुनरुज्जीवन करण्यात येणार नाही. यासाठी पॉलिसीधारकाच्या चांगल्या आरोग्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता राहील. पॉलिसीधारकांनी अधिक माहितीसाठी जवळच्या टपाल कार्यालयात किंवा टोल फ्री क्रमांक 18001805232 वर संपर्क साधावा, असे प्रवर अधीक्षक प्रतापराव सोनवणे यांनी कळविले...

Read More

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकार्य करावे- डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणि  बाधित व्यक्तिंवर उपचार करण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रतिनिधीसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार राजेश पाडवी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, अतिरिक्त शल्य चिकीत्सक डॉ.कांतराव सातपुते, डॉ.राजेंद्र चौधरी,आयएमएचे डॉ.शिरीष शिंदे, दिपक पटेल, राकेश पटेल आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, अधिकाधीक व्यक्तिंचे स्वॅब घेतले जावेत यासाठी नंदुरबार येथे चार आणि शहादा येथील दोन ठिकाणी स्वॅब घेण्याची सुविधा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनी अशा जागा सुचविल्यास व लक्षणे असलेल्या रुग्णांना निश्चित वेळी त्याठिकाणी...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!