संकटकाळातील शैक्षणिक प्रगतीबद्दल निती आयोगातर्फे जिल्ह्याचे कौतुक
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) – कोरोनासारख्या संकटाचा सामना करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे निती आयोगाने कौतुक केले आहे. आकांक्षित जिल्ह्याच्या फेब्रुवारी ते जून या कालावधीतील शैक्षणिक प्रगती संदर्भात देशातील आकांक्षित जिल्ह्यापैकी नंदुरबारचा चौथा क्रमांक आला आहे. विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थलांतर, बालरक्षक कार्यशाळेचे आयोजन, शिक्षण हमी कार्ड वितरण, मुलींना उपस्थिती भत्ता देणे व मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वाटपात जिल्ह्याने चांगली कामगिरी करीत प्राथमिक ते उच्च प्राथमिक वर्गात 99.59 गुण तर उच्च प्राथमिक ते माध्यमिक वर्गात 93.33 गुण मिळविले आहेत. आंकाक्षित जिल्हा अंतर्गत 62 शाळांना 65 स्वच्छतागृह मंजूर करून पुर्ण करण्यात आले आहेत. एनएएसच्या धर्तीवर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत...
Read More