एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेश प्रक्रिया
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार अंतर्गत नंदुरबार,नवापूर व शहादा या कार्यक्षेत्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलची शैक्षणिक वर्ष सन 2020-2021 साठीची ऑनलाईन प्रवेश परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली असून मागील पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड होणार आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष सन 2019-2020 मधील सर्वकक्ष मुल्यमापन पद्धतीचा अवलंब करुन करण्यात आलेल्या आकारीक व संकलित मुल्यमापनद्वारे तयार केलेल्या प्रथम सत्राच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये सहाव्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी व सातवी ते नववीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरीता शैक्षणिक वर्ष सन 2019-2020 च्या प्रथम सत्राच्या एकूण 900 गुणांची गुणपत्रिका विद्यार्थी किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांनी www.mtpss.org.in या लिंकवर 15 सप्टेंबर 2020 पर्यंत अपलोड करावयाची आहे. सहावी ते नववीपर्यंत ज्या इयत्तेत प्रवेश घ्यावयाचा आहे त्याच्या पूर्वीच्या इयत्तेचे प्रथम सत्राचे गुणपत्रक अपलोड करावे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश हे त्यांच्या पालकांच्या मूळच्या राहण्याच्या पत्त्यानुसार प्रकल्प कार्यालयाअंतर्गत कार्यान्वयीत असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये देण्यात येईल. ज्या प्रकल्पांतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल नाहीत अशा प्रकल्पातील विद्यार्थ्यांना लगतच्या प्रकल्पात कार्यान्वयीत असलेल्या शाळेत प्रवेश देण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी कळविले...
Read More