Author: Ramchandra Bari

कोरोना लढ्यात ग्रामपंचायतींचा पुढाकार

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतीनी पुढाकार घेऊन रुग्णांच्या वाहतूकीसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांना स्वॅब देण्यासाठी तसेच स्वॅब पोहचविण्यासाठी, कोविड सेंटर मधुन उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णाना घरी पोहचविण्यासाठी, तसेच आवश्यक वैद्यकीय साहित्याची ने-आण इत्यादी कामासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने यासाठी पुढाकार घेतला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी रुग्णवाहिकेसाठी ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून खर्च करण्यास परवानगी दिली आहे. यात सारंगखेडा, म्हसावद, मंदाणा, रनाळा, खोंडामळी, विसरवाडी, खांडबारा, अक्कलकुवा, खापर, मोलगी, प्रकाशा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ही सर्व वाहने भाडे तत्वावर घेण्यात आली आहेत. वाहनांमध्ये आवश्यक ते बदल करुन हे वाहन दोन दिवसात प्रत्यक्ष उपयोगात आणले जाणार आहे. या वाहनातील वाहनचालकांस पीपीई किट त्याचबरोबर आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा केला जाईल. हे वाहन जरी ग्रामपंचायतीच्या खर्चातून लावली जाणार असले तरीही त्यावर गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण  राहील. आवश्यकतेनुसार तातडीच्या प्रसंगी यावाहनाचा उपयोग करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत व परिसरातील इतर गावातील बाधित व्यक्तींसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार...

Read More

कोरोना विरोधातील लढ्यात आपला उत्साह कायम ठेवा- डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विरोधातील लढ्यात अधिकारी-कर्मचारी चांगली कामगिरी करीत असून जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी  येत्या काळात कोरोना योद्ध्यांनी असाच उत्साह कायम ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. डॉ.भारुड म्हणाले, जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा असताना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यात प्रत्येक कर्मचाऱ्याची भूमीका महत्वाची आहे. सर्वांनी चांगले योगदान दिल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार मर्यादीत ठेवणे शक्य झाले आहे आणि कोरोना योद्ध्यांमुळे जिल्हा सुरक्षित आहे, अशा शब्दात त्यांनी कोरोना योद्ध्यांचा उत्साह वाढविला. आरोग्य कर्मचारी रुग्णसेवा करताना सात दिवस विलगीकरणात आपल्या कुटुंबापासून, मुलांपासून दूर राहून  आपली जबाबदारी  पार पाडतात. त्यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून या सर्व कर्मचाऱ्यांनी आपले सेवाकार्य सुरू ठेवले आहे. त्यांच्या कार्याची जाणीव प्रत्येकाने मनात ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य कर्मचारी गंभीर रुग्णांवर कशाप्रकारे उपचार करतात या विषयी आणि त्यांच्या समस्यांयाविषयी  जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. रुग्ण बरे होऊनच  घरी जावेत यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे आणि रुग्णसंख्या वाढल्याने धावपळ वाढली असल्याचे परिचारिकांनी सांगितले. प्रशासनाने कोरोनाबाधितांवर उपचारासाठी आरोग्य सुविधांची निर्मिती वेगाने केल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणतीही समस्या असल्यास त्वरीत आपल्याशी संपर्क साधावा असे सांगून काही कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना संसर्ग होऊनही न डगमगता त्यांनी बरे झाल्यावर सेवाकार्य सुरू ठेवल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. नंदुरबार आणि शहादा तहसीलदार आणि नंदुरबार तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कोरोनावर मात करून तातडीने आपले कामकाज सुरू केल्याचा त्यांनी विशेष उल्लेख...

Read More

बालकल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या बालशक्ती व बाल कल्याण पुरस्कार 2021 साठी 15 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावयाचे आहे.  बालशक्ती पुरस्कार पाच पेक्षा अधिक व 18 वर्षांपर्यंत वयाच्या आणि शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नावीण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य, शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेल्या मुलांना दिला जातो. बालकल्याण पुरस्कार हा मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी भावनेतून किमान सात वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. तसेच बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला देखील हा पुरस्कार दिला जातो. ही संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान दहा वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी. बालशक्ती पुरस्कार 2021 व बाल कल्याण पुरस्कार 2021 पुरस्कारासाठी www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सु.शं.इंगवले यांनी केले...

Read More

आज 308 व्यक्ती कोरोनामुक्त

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोनाबाधितांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत असून आज दिवसभरात 308 बाधित उपचाराअंती बरे होऊन घरी परतले. बुधवारी देखील 123 बाधितांना कारोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले होते. जिल्ह्यात आतापर्यंत 2833 कोविड पॉझिटीव्ह आढळले असून त्यापैकी 1706 बरे झाले आहेत. 1044 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 78 बाधितांचा मृत्यू झाला आहे. स्वॅब चाचणी वाढल्याने मृत्यू दरातही सुधारणा होत आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा होऊन तो 60 टक्क्यापर्यंत पोहोचला असून मृत्यू दर 5.5 टक्क्यावरून 2.8 टक्क्यावर आला आहे. यात आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न प्रशासन स्तरावर करण्यात येत आहे. कोरोना आजाराची लक्षणे असल्यास त्वरीत स्वॅब घेऊन चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. स्वॅब चाचण्यांची संख्या 10 हजारावर पोहोचली आहे. त्यासाठी तालुका स्तरावर मोबाईल टीम नेमण्यात आल्या आहेत. तीव्र लक्षणे असणाऱ्यांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रॅपीड अँन्टीजन टेस्टची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वॅब चाचणीचे प्रमाण वाढल्याने आणि नंदुबार येथेच लॅब सुरू झाल्याने वेळेवर उपचार करणे शक्य झाले आहे. जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय येथील कोविड रुग्णालयात तीव्र लक्षणे असलेल्या बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. याठिकाणी ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरची सुविधा आहे. तर लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल नंदुरबार, शहादा, नवापूर आणि सलसाडी येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार करण्यात येत आहे. नंदुरबार आणि नवापूर येथे प्रतयेकी दोन खाजगी रुग्णालयात देखील शासनाने निश्चित केलेल्या शुल्का नुसार कोविड बाधितांवर उपचाराची सुविधा आहे. बाधित रुग्णांची संपर्क साखळी शोधून त्यांची स्वॅब चाचणीदेखील वेळेवर करण्यात येत...

Read More

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निमुर्लन त्रैमासिक समिती बैठकीचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय कर्मचाऱ्याविरुध्द प्राप्त होणारे तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र  भारुड यांच्या अध्यक्षतेखाली 8 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 12 वाजता जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निमुर्लनाची त्रैमासिक समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!