Author: Ramchandra Bari

दुर्गम भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष दक्षता घ्या- राधाकृष्ण गमे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 15:   कोरोना प्रतिबंधात्मक उपायाच्या संदर्भात प्रशासनाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून यापुढील काळात जिल्ह्याच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी, असे प्रतिपादन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पंडा, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शैखर रौंदळ, आदी उपस्थित होते.             श्री. गमे म्हणाले, प्रतिबंधीत क्षेत्रात अतिजोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात यावे. प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांकडून नियमाचे कटाक्षाने पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. कोरोना बाधीत व्यक्तिंच्या संपर्कातील व्यक्तिंची त्वरीत स्वॅब चाचणी घेण्यात यावी. ग्रामीण भागातील स्थानिक डॉक्टरांकडील तापाच्या रुग्णाची माहिती घ्यावी. मास्क न घालणाऱ्या व सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या व्यक्तीं विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.  रुग्णासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा रिक्तपदाचा आढावा घेऊन कंत्राटी तत्वावर आवश्यक ती पदे त्वरीत भरण्यात यावीत. दुर्गम भागात आवश्यकतेनुसार ॲन्टीजन टेस्टचा उपयोग करावा. दररोज किमान 500 व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात यावी. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या कारणाचे विश्लेषण करुन मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे श्री.गमे म्हणाले. जिल्ह्याचे महसूली कामकाज समाधानकारक कोरोना संकटाच्या परिस्थितीत जिल्ह्यातील महसूली कामकाज समाधानकारक असल्याचे श्री.गमे म्हणाले. मनरेगा अंतर्गत अधिकाधिक कामे घेण्यात यावीत. सिंचन विहीरीची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. मंजूर असलेले घरकुलाची कामे सुरु होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. पाणंद व शिवार रस्त्यांच्या...

Read More

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ मोहिमेचा विभागीय आयुक्ताच्या हस्ते शुभांरभ

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :   नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या नंदुरबार जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते. श्री.गमे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार या मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. मोहिमेच्या माध्यामातून ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरीक व अतिजोखमीच्या व्यक्तींची माहिती घेण्यात येणार आहे. नागरिकांनी आरोग्य पथकाला योग्य माहिती द्यावी आणि आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करावे. कोरोनासाठी प्रशासनातर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी...

Read More

नंदुरबार जिल्हा रुणालयात आहार सेवेत मोठा आर्थिक घोटाळा !

नंदुरबार (प्रतिनिधी) :– येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्ण व सोबतच्या एका नातेवाईकास पुरविण्यात येत असलेल्या आहार खर्चात जास्तीची बिले  काढत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले असून, याबाबत श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, नाशिक या संस्थेचे  चेअरमन पंढरीनाथ शिवराम भोये,  व्हा. चेअरमन काशिनाथ माधव ढोमसे,  संस्थेचे प्रतिनिधी शरद बाळासाहेब देवरे व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याविरुद्ध आरटीआय कार्यकर्ते भरत देशमुख यांनी पुराव्यानिशी तक्रार केली आहे. याबाबत सविस्तर असे कि, जिल्हा रुग्णालय आहार सेवेचे कंत्राट घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्था नाशिक या संस्थेला जिल्हा रुग्णालय नंदुरबार व सर्व ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल रुग्णांना व त्याच्या...

Read More

नंदुरबार येथे पत्रकारांसाठी कोरोना चाचणीचे आयोजन

               नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा माहिती कार्यालय नंदुरबार व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारासाठी छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर नंदुरबार येथे मोफत कोविड 19 चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.            यावेळी रणजित राजपूत, हिरालाल चौधरी, जगदीश जयस्वाल, निलेश पवार, मनोज शेलार, राकेश कलाल, महादु हिरणवळे, सुनिल कुळकर्णी, धनराज माळी, अविनाश भामरे, किशोर गवळी, भावेश मराठे, अतुल थोरात, अमित कापडणे, मनोज कुलथे, वैभव करवंदकर, ज्ञानेश्वर माळी, भिकेश पाटील, गौतम बैसाणे आदी उपस्थित होते.             या शिबिरात एकूण 38 व्यक्तिंची कोविड चाचणी करण्यात आली.  यात पत्रकार, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींचा समावेश होता. जिल्हा शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधिकारी पथक डॉ. मनीष नाद्रे, डॉ.अश्विनी देसले, डॉ.जागृती परमार,परिचारीका ए.एस.गवळी यांनी...

Read More

‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’साठी 50 उमेदवाराची निवड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यासाठी 11 महिनाच्या कालावधीच्या ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ साठी अंतिम छाननी व मुलाखतीअंती 50 उमेदवाराची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या 1065 उमेदवारापैकी दूरध्वनीवरील समूह चर्चा आणि वैयक्तिक मुलाखती सहभागातून 200 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. त्यातून 113 उमेदवाराची पुढील मुलाखतीसाठी निवड करण्यात आली.  मुलाखती व ग्रुप चर्चेद्वारे  50 उमेदवाराची डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे. 15 उमेदवार प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 10 उमेदवार,जिल्ह्याव्यतिरिक्त 20 उमेदवार, महाराष्ट्राबाहेरील 20 उमेदवाराची निवड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिपसाठी करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवाराची यादी www.nandurbar.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!