Author: Ramchandra Bari

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोना संदर्भातील जनजागृतीसाठी आणि घरोघरी सर्वेक्षणासाठी शासनातर्फे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व सरपंच आणि ग्रामस्थांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा व जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी पत्राद्वारे केले. सरपंचांना लिहिलेल्या पत्रात ॲड.पाडवी म्हणतात, येत्या काळात कोरोना आजारासोबत राहावे लागणार आहे. या आजारापासून स्वत:चा बचाव करणे गरजचे झाले आहे. या आजारामुळे अनेक कुटुंबांना दु:खद प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. अर्थव्यवस्थेला हळूहळू रुळावर आणण्यासाठी दुकाने, बाजार, व्यवसाय परत सुरू करण्यावाचून पर्याय नसल्याने नागरिक म्हणून प्रत्येकाकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा आहे आणि लोकप्रतिनिधी या नात्याने सरपंचांची भूमीका महत्वाची आहे. ग्रामीण भागातील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता सर्वांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे व त्या अनुरूप नागरिकांचे वर्तन व्हावे यासाठी जनजागृती करावी लागणार आहे. यासाठी 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रणात लोकसहभागासाठी ही मोहिम आहे. या विशेष सर्वेक्षण आणि जनजागृती मोहिमेत आरोग्य शिक्षण, महत्वाचे आरोग्य संदेश, तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार यासारख्या आजार असणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण तसेच कोविड संशयीत रुग्ण शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने सरपंचांनी गावातील सर्व  ग्रामस्थांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे व कोरोनाला पराभूत करण्यासाठी महत्वाची भूमीका पार पाडावी. मोहिमेदरम्यान घर, कुटुंब, परिसर, गाव, शहर आणि राष्ट्राच्या हितासाठी फेस मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, वारंवार हात धुणे, कमीत कमी प्रवास करणे...

Read More

26 उमेदवारांना तलाठीपदावर नियुक्ती

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील  तलाठी भरती प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असुन सद्यस्थितीत 26 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक पध्दतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.  नंदुरबार तालुक्यातील पेसा क्षेत्रातील कोठली, पिंपळोद, पथराई, शिंदे यागावासाठी तर नॉन पेसाक्षेत्रातील रनाळे, वैदाणे गावासाठी सहा, नवापूर तालुक्यातील वडकळंबी,भादवड,धनराट गावासाठी तीन , तळोदा तालुक्यातील प्रतापपूर, चिनोदा, नळगव्हाण, शिर्वे, तसेच सरदार सरोवर प्रकल्प कार्यालयासाठी पाच, अक्कलकुवा तालुक्यातील मोरबा, उमरगव्हाण, सिदुरी गावासाठी तीन, अक्राणी तालुक्यातील धनाजेसाठी एक आणि शहादा तालुक्यातील वैजाली, डोंगरगाव, कुढावद, चिखली बु., कवळीथ  तर नॉन पेसाक्षेत्रातील कुकडेल, तोरखेडा, फेस या गावासाठी आठ तलाठी असे एकूण 26 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात  आले आहे. नंदुरबार तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षक विभाग वगळता कोणत्याही विभागाने पदभरती करु नये असे आदेश शासनाने दिल्यामुळे ही भरती पुर्ण होवूनदेखील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले नव्हते. महसूल विभागामार्फत सदर तलाठी भरतीची कार्यवाही विनाविलंब पुर्ण करण्याबाबत जिल्हा प्रशासनास कळविले होते. त्यानुसार पदभरतीसाठी मान्यता देताच उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात...

Read More

‘पोषण माह’चा शुभांरभ संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : पोषण अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे आयोजित पोषण माहचे उद्धाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत करण्यात आले.             यावेळी उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन बोडके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.             देशभरात 7 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत पोषण माह अभियान साजरा करण्यात येत आहे. पोषण माह अभियानांतर्गत कुपोषणाचे योग्य व्यवस्थापन व परसबाग फुलविने, त्याचबरोबर सर्व क्षेत्रातील गरोदर व स्तनदा माता व कुपोषित बालके यांच्या गृहभेटी देणे, 0...

Read More

मनरेगा अंतर्गत अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावी- डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अपूर्ण असलेली कामे संबंधित यंत्रणांनी त्वरीत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, वनसंरक्षक सुरेश केवटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे आदी उपस्थित होते. डॉ.भारूड म्हणाले, वन विभागाने अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात मनरेगाच्या कामांना गती द्यावी. वनकृषीसाठी स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन करावे. रोजगार आणि उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून दुर्गम भागात जंगल वाढविण्यावर भर द्यावा. नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी जंगल वाढविणे आणि उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे महत्वाचे आहे. सामाजिक वनीकरण विभागाने नर्सरीची कामे त्वरीत पूर्ण करावी...

Read More

तोंडाला मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी जिल्‍हा पोलीस दलामार्फत तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सींगचे पालन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोविड-19 विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असून गेल्या 8 ते 10 दिवसात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोविड-19 विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाने सर्व नागरिकांना मास्कचा वापर करण्याचे व सामाजिक अंतराचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.             जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये व त्यावर आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तोंडाला मास्क न लावणाऱ्या तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलीस दलामार्फत गुन्हे दाखल करण्यात येणार असून अशा व्यक्तींना प्रत्येकी 2 हजारपर्यंत द्रव्य दंड किवा 5 दिवसाची कैद अशी शिक्षा होऊ शकते. कारवाई टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे,  असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!