Author: Ramchandra Bari
सोयाबीनच्या स्वउत्पादित बियाण्याचा वापर करण्याचे आवाहन
Posted by Ramchandra Bari | Sep 23, 2020 | कृषी |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 मध्ये सोयाबीनच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ग्रामबिजोत्पानातून स्वउत्पादित बियाण्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम 2020 मध्ये 20 हजार 990 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली असून खरीप हंगाम 2021 मध्ये 21 हजार 510 हेक्टरवर सोयाबीनचे पेरणी क्षेत्र निश्चित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये सोयाबीन बियाणाच्या विक्री केंद्रावर तुटवडा होण्याची शक्यता असल्याने कृषी आयुक्तालयाने ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सोयाबीन बियाणे ग्रामपातळीवरच उपलब्ध करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. कृषी विभागामार्फत गावोगावी माहिती देऊन ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमातुन सोयाबीन बियाणे प्रक्षेत्र भेटी, काढणी, मळणी, साठवणुकबाबत उत्पादक शेतकरी यांचेशी समन्वय आदी माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे. तरी शेतकरी बांधवानी ग्रामबिजोत्पानातुन स्वउत्पादित सोयाबीन बियाणे पुढील खरीप हंगामासाठी साठवणूक करुन ठेवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी केले...
Read Moreमौजे पळाशी येथे 242 व्यक्तींची स्वॅब तपासणी
Posted by Ramchandra Bari | Sep 22, 2020 | आरोग्य, कोरोना |
नंदुरबार – नंदुरबार तालुक्यातील मौजे पळाशी येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.आर.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना जनजागृती कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणी शिबीरात 242 व्यक्तींची स्वॅब तपासणी करण्यात आली. तालुका प्रशासनातर्फे सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्यात येत आहे. त्यासोबतच कोरोना संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी फिरत्या पथकाद्वारे अधिकाधिक स्वॅब तपासणीवर भर देण्यात येत आहे. पळाशी येथील सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने फिरत्या पथकाद्वारे स्वॅब तपासणी करण्यात आली. डॉ.दिपाली पाडवी यांनी कुठल्याही प्रकारची विश्रांती न घेता 242 व्यक्तींचे स्वॅब घेतले. त्यांना डॉ.सतीश नांद्रे, डॉ.जितेंद्र सोनवणे, डॉ.योगेश पटेल, आरोग्य सेवक अमृता पाटील आणि श्री.खेडेकर यांनी सहकार्य...
Read Moreनंदुरबारचे मित्तल कोविड सेंटर गरीबांसाठी आशेचा किरण
Posted by Ramchandra Bari | Sep 21, 2020 | आरोग्य, कोरोना, व्हिडीओ |
कालमर्यादेत आरोग्य तपासणीचे काम पूर्ण करा-डॉ.राजेंद्र भारुड
Posted by Ramchandra Bari | Sep 21, 2020 | आरोग्य |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत प्रत्येक घराला भेट देऊन कालमर्यादेत आरोग्य तपासणीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. मोहिमेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, दररोज किमान 50 घरांना भेट देऊन माहिती ॲपवर अपलोड करावी. एका दिवसात साधारण 24 हजार कुटुंबांची माहिती संकलीत करावी. कोरोनासोबत इतर गंभीर आजाराबाबतही माहिती घेण्यात यावी. स्थानिक लोकप्रतिनिधींना सर्वेक्षणात सहभागी करून घ्यावे. स्वॅब चाचणीचे प्रमाण वाढविण्यात यावे. एखाद्या भागात बाधित व्यक्ती...
Read More